एक्स्प्लोर

Team India Coach Update: प्रशिक्षक पदासाठी राहुल द्रविडला मिळणार घसघशीत मानधन, 2023 पर्यंत असणार कोच

Team India Coach Update: राहुल द्रविडला मानधन म्हणून 10 कोटी रुपये मिळणार आहेत. आतापर्यंतच्या इतिहासात प्रशिक्षकांना मिळणारं हे सर्वाधिक मानधन असल्याचं बोललं जात आहे.

Team India Coach Update:  भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी महत्वाची बातमी आहे. भारतीय संघाच्या पुढच्या प्रशिक्षक पदासाठी टीम इंडियाचा माजी कर्णधार राहुल द्रविडचं नाव चर्चेत आहे. द्रविड टीम इंडियाचा कोच होण्यासाठी तयार असल्याची माहिती आहे.  भारतीय क्रिकेट टीमच्या प्रशिक्षकपद आता राहुल द्रविडकडे (Rahul Dravid) येणार असल्याची शक्यता आहे.. राहुल द्रविड टीम इंडियाचा कोच होण्यास तयार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याला 2023 पर्यंतचं कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. राहुल द्रविडला मानधन म्हणून 10 कोटी रुपये मिळणार असल्याची माहिती आहे. आतापर्यंतच्या इतिहासात प्रशिक्षकांना मिळणारं हे सर्वाधिक मानधन असल्याचं बोललं जात आहे. मात्र अद्याप याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.  

सूत्रांच्या माहितीनुसार दुबईत झालेल्या आयपीएल फायनल सामन्यादरम्यान बीसीसीआय सचिव जय शाह आणि बीसीसीआचा अध्यक्ष सौरव गांगुली यांनी राहुल द्रविडसोबत बैठक केली. या बैठकीत राहुल द्रविडनं हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, बोर्ड त्याला काय ऑफर देऊ इच्छिते.  

CSK Won IPL 2021: चेन्नईचा दबदबा, फायनल सामन्यानंतर चेन्नईच्या नावावर अनेक विक्रम

 2023 पर्यंत होऊ शकतो करार
काही दिवसांपूर्वी राहुल द्रविडनं टीम इंडियाचा कोच होण्यास नकार दिला होता. बीसीसीआयनं त्याला प्रशिक्षक करण्यासाठी अनेकदा प्रयत्न केले. अखेर बीसीसीआयच्या प्रयत्नाला यश मिळत असल्याचं दिसत आहे.  द्रविडनं होकार दिला असला तरी अद्याप बीसीसीआयकडून कुठलीही औपचारिक घोषणा करण्यात आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार त्याला 2023 पर्यंतचं कॉन्ट्रॅक्ट मिळू शकतं. नुकत्याच झालेल्या श्रीलंका दौऱ्यात राहुल द्रविड भारतीय संघाचा प्रशिक्षक होता. या दौऱ्यात शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया वनडे मालिका जिंकली होती.

द्रविडचं युवा खेळाडूंना मार्गदर्शन

निवृत्ती घेतल्यानंतर द्रविडने युवा खेळाडूंना मार्गदर्शन करण्याचे काम सुरु केले आहे. तो 2016 पासून अंडर-19 टीमचा प्रशिक्षक म्हणून काम केले. त्याच्या मार्गदर्शनात भारताने सलग दोन वेळा अंडर-19 विश्वचषकाच्या फायनलमध्ये स्थान मिळवले तर  2018 मध्ये संघाने अंडर-19 विश्वचषकावर आपले नाव देखील कोरले. द्रविडच्या मार्गदर्शना मयंक अग्रवाल, कुलदीप यादव, श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ, ऋषभ पंत सारखे खेळाडू तयार झाले आहेत. आता द्रविडवर बीसीसीआयच्या बंगळुरु येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमी (NCA) च्या प्रमुखपदाची जबाबदारी देण्यात आली होती. 

गोलंदाजी प्रशिक्षकपदी पारस म्हांब्रे
टीम इंडियाच्या गोलंदाज प्रशिक्षकपदी मुंबईचे माजी खेळाडू पारस म्हांब्रे यांनी नियुक्ती होण्याची शक्यता आहे.  

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
metaverse

व्हिडीओ

Top 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट ABP Majha 04 PMRavindra Waykar on EVM : ईव्हीएमसोबत छेडछाड केल्याचा प्रश्नच येत नाही, रवींद्र वायकरांची प्रतिक्रियाABP Majha Headlines : 04 PM  : 16 June 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सRavindra Waykar : मंगेश पडिलकरजवळचा फोन निवडणूक अधिकाऱ्याचा? ड्रायव्हर बोलवण्यासाठी फोन वापरल्याचा दावा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
चंद्रहार पाटील पराभव विसरुन कामाला लागले, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट मतदारसंघाची नावं सागितली
चंद्रहार पाटील लोकसभेचा पराभव विसरुन पुन्हा मैदानात, सांगलीत विधानसभेच्या किती जागा लढवणार, थेट आकडा सांगितला 
Ravindra Waikar kin Mangesh Pandilkar : ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
ईव्हीएम अनलाॅक करणारा मोबाईल वायकरांच्या मेव्हण्याकडे; महाविकास आघाडीतील नेत्यांचा कडाडून हल्लाबोल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
NCERT पुस्तकातून बाबरी मशिदीचा उल्लेख काढला, अयोध्या वादाच्या विषयात मोठा बदल!
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
पंकजाताईंना पाहताच कुटुंबीयांनी टाहो फोडला; पंकजा मुंडेंच्याही अश्रूंचा बांध फुटला, व्हिडिओ व्हायरल
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
विधानसभेला राष्ट्रवादी एवढ्या जागांवर लढणार, प्रफुल पटेलांनी थेट आकडाचा सांगितला, महायुतीत खलबतं
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार? अनिल पाटलांनी थेट दिल्लीचा संदर्भ दिला!
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
सिक्कीमध्ये हाहा:कार, ढगफुटीमुळे प्रचंड पाऊस, महाराष्ट्रातील 28 जण संकटात अडकले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
यम्मो कंपनीच्या आईस्क्रीमध्ये बोट सापडलं; इंदापूरच्या 'फॉर्च्यून' डेअरीच्या संचालकांचा खळबळजनक दावा
Embed widget