R Ashwin : मोठी बातमी! रविचंद्रन अश्विनची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, गाबा कसोटीनंतर घोषणा
R Ashwin Announces Retirement : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना ब्रिस्बेनमध्ये अनिर्णित राहिला.
R Ashwin Announces Retirement : भारताचा महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने (Ravichandran Ashwin Announces Retirement) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गाबा (Ind vs Aus 3rd Gabba Test)येथे झालेल्या कसोटी सामन्यानंतर अश्विनने ही घोषणा केली. अश्विनचा आतापर्यंतचा रेकॉर्ड चांगला आहे. गोलंदाजीसोबतच त्याने फलंदाजीतही कमाल करून दाखवली आहे. अश्विनने कसोटी तसेच एकदिवसीय क्रिकेटमध्येही उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीनंतर पत्रकार परिषदेत त्याने निवृत्ती जाहीर केली.
𝙏𝙝𝙖𝙣𝙠 𝙔𝙤𝙪 𝘼𝙨𝙝𝙬𝙞𝙣 🫡
— BCCI (@BCCI) December 18, 2024
A name synonymous with mastery, wizardry, brilliance, and innovation 👏👏
The ace spinner and #TeamIndia's invaluable all-rounder announces his retirement from international cricket.
Congratulations on a legendary career, @ashwinravi99 ❤️ pic.twitter.com/swSwcP3QXA
विशेष म्हणजे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना सुरू असताना आज सामना संपताच रविचंद्रन अश्विन निवृत्त होणार असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. सामना अनिर्णित राहण्याची घोषणा होताच. काही वेळाने अश्विन आपला कर्णधार रोहित शर्मासोबत आला आणि त्याने निवृत्तीची घोषणा केली. आता तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळणार नाही. मात्र उर्वरित दोन कसोटी सामन्यांमध्येही तो संघासोबत राहील, अशी अपेक्षा आहे. अश्विनने जड अंत:करणाने निवृत्ती जाहीर केली. मात्र तरीही तो आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे.
अश्विनची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
अश्विनच्या कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने भारतासाठी 106 कसोटी सामने खेळले आहेत. या कालावधीत त्याच्या नावावर 537 विकेट्स आहेत. आपल्या कारकिर्दीत 37 वेळा 5 विकेट्स आणि 8 वेळा दहा विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला आहे. त्याने भारतासाठी 116 एकदिवसीय सामने खेळले असून 156 बळी घेतले आहेत. यासोबत 65 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले असून 72 बळी घेतले आहेत. मात्र, काही काळ अश्विन फक्त कसोटी खेळत होता.
अश्विनचे सर्वोत्तम रेकॉर्ड
अश्विनच्या उत्कृष्ट विक्रमाबद्दल बोलायचे तर, त्याने 11 वेळा सामनावीराचा पुरस्कार जिंकला आहे, जो कोणत्याही खेळाडूसाठी सर्वाधिक आहे. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो सध्या सातव्या क्रमांकावर आहे. पण जर आपण सक्रिय खेळाडूंबद्दल बोललो तर अश्विन पहिला येतो. त्याने 37 वेळा एका डावात 5 विकेट्स घेतल्या आहेत. या यादीत तो दुसऱ्या क्रमांकावर आहे.
In a shock announcement, India’s ace spinner calls time on his international career effective immediately.#WTC25 | #AUSvIND | Details 👇https://t.co/jTKliMQAwI
— ICC (@ICC) December 18, 2024
अश्विनची कसोटीतील शतकं
103 रन विरुद्ध वेस्टइंडीज, मुंबई, 2011
124 रन विरुद्ध वेस्टइंडीज, कोलकाता, 2013
113 रन विरुद्ध वेस्टइंडीज, नॉर्थ साउंड, 2016
118 रन विरुद्ध वेस्टइंडीज, सेंट लूसिया, 2016
106 रन विरुद्ध इंग्लंड, चेन्नई, 2021
113 रन विरुद्ध बांग्लादेश, चेन्नई, 2024
R Ashwin retires from International Cricket VIDEO : आर अश्विनची निवृत्तीची घोषणा