Asia Cup : भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी पाकिस्तानला मोठा झटका, हुकूमी एक्काच दुखापतग्रस्त
IND vs PAK : आगामी आशिया कप 2022 (Asia Cup 2022) स्पर्धेत 28 ऑगस्ट रोजी भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे.
Asia Cup 2022 : यूएईमध्ये आगामी आशिया चषक 2022 (Asia Cup 2022) याच महिन्याच्या अखेरीस सुरु होणार आहे. यामध्ये भारताचा पहिलाच सामना पाकिस्तान विरुद्ध असणार आहे. 27 ऑगस्ट रोजी दोन्ही संघ मैदानात उतरणार असून यापूर्वीच पाक संघाला मोठा झटका बसला आहे. संघातील महत्त्वाचा गोलंदाज शाहीन आफ्रिदी (Shaheen Afridi) संपूर्णपणे फिट नसल्यामुळे तो सामन्याला मुकणार असल्याची माहिती समोर येत आहे. संघाचा कर्णधार बाबर आझमने (Babar Azam) देखील या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
शाहीन आफ्रिदीला झालेल्या गुडघ्याच्या दुखापतीतून अजून सावरला नसल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे त्याची दुखापत आणखी वाढू नये यासाठी त्याला यातून सावरण्यासाठी अधिक काळ दिला जात आहे. बाबर आझमने दिलेल्या माहितीत त्याने सांगितलं की, ''आम्ही डॉक्टर्सचा सल्ला घेत आहोत. आमचा सर्व वैद्यकीय स्टाफ शाहीनची संपूर्णपणे काळजी घेत आहे''
आफ्रिदीला फिट होण्यासाठी आणखी विश्रांतीची गरज आहे हे सांगताना आझम म्हणाला,''आफ्रिदीला अजूनही विश्रांतीची गरज आहे. त्याला झालेल्या दुखापतीतून बरं होण्यासाठी अजून वेळेची गरज आहे. भविष्यातील त्याच्या खेळासाठी आम्ही त्याच्या फिटनेस आणि हेल्थवर नजर ठेवून आहोत. आम्ही तो आशिया कपपर्यंत ठिक होऊ यासाठी प्रयत्न करत आहोत.''
कसा आहे पाकिस्तानचा संघ?
आशिया चषकासाठी पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं (PCB) 15 सदसीय संघाची घोषणा काही दिवसांपूर्वीच केली आहे. बाबर आझमकडे (Babar Azam) संघाचं नेतृत्व असून शादाब खानकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे अनुभवी शोएब मलिक आणि अष्टपैलू हसन अली यांना संघात स्थान देण्यात आलेलं नाही. दोन्ही खेळाडू युएईमध्ये झालेल्या टी 20 विश्वचषकात पाकिस्तान संघाचे सदस्य होते.
आशिया चषकासाठी पाकिस्तानचा संघ (Pakistan squad for ACC T20 Asia Cup) - बाबार आझम (कर्णधार), शादाब खान (उपकर्णधार),असिफ अली, फखर जमान, हैदर अली, हॅरीस रौफ, इफ्तीखार अहमद, खुशदील शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वासिम जेएनआर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी (दुखापत), शहनवाज दहानी आणि इस्मान कदीर
हे देखील वाचा-