Pakistan Squad For Asia Cup 2025 : पाकिस्तानी सिलेक्टर्सनी टीम इंडियाची सर्वात मोठी डोकेदुखी ठरु शकणाऱ्या खेळाडूलाच संघातून वगळलं, जावेद मियाँदाद संतापला, म्हणाला...
Javed Miandad Reaction on Babar Azam : आशिया कप 2025 साठी पाकिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला आहे, पण या संघ निवडीनंतर पाकिस्तान टीम सिलेक्टरवर टीका होतं आहे.

Pakistan Squad For Asia Cup 2025 : आशिया कप 2025 साठी पाकिस्तानचा संघ जाहीर करण्यात आला आहे, पण या संघ निवडीनंतर पाकिस्तान टीम सिलेक्टरवर टीका होतं आहे. कारण म्हणजे, माजी कर्णधार बाबर आझम आणि विकेटकीपर-फलंदाज मोहम्मद रिझवान यांना संघातून वगळण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही खेळाडू पाकिस्तानकडून टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे अव्वल दोन फलंदाज आहेत. तरीदेखील निवडकर्त्यांनी त्यांना स्क्वॉडमध्ये स्थान दिलेले नाही.
मियांदादचा संताप
या निर्णयावर पाकिस्तानचा माजी दिग्गज क्रिकेटपटू जावेद मियांदाद संतापला असून त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये मियांदाद म्हणतो की, “सिलेक्टरलाच माहिती नाही ते काय करतायत. त्यांनी कधी खरंच क्रिकेट खेळली आहे का? कोणत्या पातळीवर खेळले आहेत? बाबर आझमला संघाबाहेर ठेवतायत. बाबर आझम हा महान खेळाडू आहे. क्रिकेटमध्ये चढ-उतार येतातच.
सलमान अली आगा कर्णधार
आशिया कपसाठी पाकिस्तानच्या नेतृत्वाची धुरा सलमान अली आगा याच्याकडे सोपवण्यात आली आहे. फलंदाजीत फखर जमन, साहिबजादा फरहान आणि सईम अयूब यांचा समावेश आहे. तर मोहम्मद हारिसकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी असेल. गोलंदाजीत शाहीन शाह अफरीदी, हारिस रऊफ आणि हसन अली ही वेगवान तिकडी सज्ज आहे.
भारताविरुद्ध रंगणार सामना
पाकिस्तानचा आशिया कप मोहिमेचा प्रारंभ 12 सप्टेंबर रोजी ओमानविरुद्ध होईल. त्यानंतर 14 सप्टेंबरला बहुचर्चित हाय-व्होल्टेज सामन्यात पाकिस्तानचा सामना भारताशी रंगणार आहे. पाकिस्तान ग्रुप-ए मध्ये असून या गटात भारत, ओमान आणि यूएई या संघांचाही समावेश आहे. पाकिस्तानने आपला संघ जाहीर केला आहे, पण मागील आशिया कपमध्ये खेळलेल्या अनेक खेळाडूंवर त्यांनी बाहेरचा रस्ता दाखवला आहे. दुसरीकडे भारतीय संघाची निवड अजून काही दिवसांत होणार आहे.
आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ - (Pakistan Squad For Asia Cup 2025)
सलमान अली आघा (कर्णधार), अबरार अहमद, फहीम अशरफ, फखर जमां, हारिस रऊफ, हसन अली, हसन नवाज, हुसैन तलत, खुशदिल शाह, मोहम्मद हारिस (यष्टिरक्षक), मोहम्मद नवाज, मोहम्मद वसीम ज्युनियर, साहबजादा फरहान, सैम अय्यूब, सलमान मिर्झा, शाहीन शाह आफ्रिदी आणि सुफियान मुकिम.
हे ही वाचा -





















