Danish Kaneria on Umran Malik : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यांमध्ये स्थान मिळालेल्या उमरानला त्या मालिकेत खेळण्याची संधी मिळाली नाही. आता आयर्लंड दौऱ्यात मात्र पहिल्या सामन्यातच त्याला अंतिम 11 मध्ये स्थान मिळालं. पण पहिल्याच सामन्यात त्याने टाकलेल्या एकमेव षटकात 14 धावा फलंदाजांनी ठोकल्या, ज्यामुळे त्याचे चाहते नाराज असून काहीजण टीकाही करत आहेत. अशामध्ये पाकिस्तानचा माजी फिरकीपटू दानिश कनेरिया (Danish Kaneria)  याने उमरानची बाजू घेत के 'केवळ एका ओव्हरमधून तुम्ही खेळाडूची क्षमता ठरवू शकत नाही', अशी प्रतिक्रिया दिली आहे.


दानिशने त्याच्या यू-ट्यूब चॅनलवर बोलत असताना ही प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, ''आपल्याला समजून घ्यावं लागेल की, हा त्याचा पहिला सामना होता. त्यात सामना 12 षटकांचा असल्यावर नक्कीच गोलंदाजांवर दबाव असणार, तुम्ही एका षटकातून कोणत्याही खेळाडूची क्षमता ठरवू शकत नाही. त्याला अजून संधी मिळाल्यावर तो नक्कीच चांगली कामगिरी करेल. याआधी त्याने चांगली कामगिरी केल्यामुळे त्याला संघात स्थान मिळालं आहे.'' 


उमरानने गाजवली आयपीएल


आयपीएलचा पंधरावा हंगाम सुरू होण्याआधी सनरायझर्स हैदराबादनं उमरान मलिकला चार कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं. आयपीएल 2022 मध्ये उमराननं उत्कृष्ट गोलंदाजी केलीय. या हंगामात त्याचा सरासरी वेग 145 ते 150 किमी प्रतितास इतका होता. त्यानं आयपीएलच्या मागच्या हंगामात 157 किमी प्रतितासाच्या वेगानं टाकला होता. उमरान मलिकनं 14 सामन्यांत एकूण 22 विकेट घेतल्या आणि सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत तो टॉप-5 मध्ये सामील झाला.


हे देखील वाचा-