India tour of Ireland: भारत आणि आयर्लंड यांच्यात रविवारी डबलिनच्या (Dublin) द व्हिलेज स्टेडियमवर (The Village) पहिला टी-20 सामना खेळवण्यात आला. पावसानं व्यत्यय आणलेल्या या सामन्यात भारतानं सात विकेट्स राखून आयर्लंडचा पराभव केला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारतानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आयर्लंडच्या डावातील पहिल्या षटकात जे घडले, ते पाहून खेळाडूंसह प्रेक्षकानाही आश्चर्याचा धक्का बसला. भुवनेश्वर कुमार (Bhuvneshwar Kumar) गोलंदाजी करत असताना त्याच्या एका चेंडूचा वेग 208 किलोमीटर प्रतितास दाखवण्यात आला. ज्यामुळं सोशल मीडियावर भुवनेश्वर कुमारची चांगलीच चर्चा रंगली आहे. 


भुवनेश्वर कुमारनं टाकलेल्या चेंडूचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या फोटोच्या एका बाजूस भुवनेश्वर कुमारनं 208 किलोमीटर प्रतितास वेगानं चेंडू टाकल्याचं दाखवलं जातंय. भुवनेश्वर कुमारनं भारताकडून गोलंदाजीची सुरुवात केली. डावातील पहिल्या चेंडूचा वेग 201 किमी प्रतितास दाखवण्यात आला. त्यानंतर चेंडूचा वेग 208 किमी प्रतितास दाखवण्यात आला. परंतु, स्पीडोमीटरच्या बिघाडामुळं हा प्रकार घडल्याची माहिती समोर आलीय. परंतु, नेटकरी याचे स्क्रीन शॉर्ट काढून सोशल मीडियावर व्हायरल करत आहेत.


ट्वीट-



ट्वीट-



ट्वीट- 



भुवनेश्वर कुमारची गोलंदाजी
या सामन्यात भुवनेश्वर कुमारनं शानदार गोलंदाजी करत पहिल्याच षटकात भारताला यश मिळवून दिलं. या सामन्यात भुवनेश्वरनं 3 षटकात 16 धावा दिल्या आणि एक विकेट घेतली. सुरुवातीला भुवनेश्वरच्या गोलंदाजीसमोर खेळणं आयर्लंडच्या फलंदाजाला कठीण जात होतं. 


भारताची 1-0 नं आघाडी
दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात विजय मिळवून भारतानं 1-0 आघाडी घेतली आहे. या मालिकेतील दुसरा सामना उद्या म्हणजेच 28 जून रोजी खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकण्याच्या उद्देशानं भारतीय संघ मैदानात उतरणार आहे. तर, या सामन्यात भारताला पराभूत करून मालिका बरोबरीत आणण्याचा आयर्लंडचा प्रयत्न असेल. 


हे देखील वाचा-