Dale Steyn B'day: दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेन आज त्याचा 39 वा वाढदिवस साजरा करत आहे. कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या टॉप-10 खेळाडूंमध्ये त्याचा समावेश होतो. डेल स्टेनची गणना अशा वेगवान गोलंदाजांमध्ये केली जाते, ज्यांच्यासमोर फलंदाजांचा नेहमीच धाक असायचा. दरम्यान, पाकिस्तानविरुद्ध कसोटी सामन्यात 2013 मध्ये डेल स्टेननं त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी केली होती. त्यानं फक्त आठ धावा खर्च करून पाकिस्तानच्या सहा फलंदाजाला माघारी धाडलं होतं.


पाकिस्तानचा संघ 9 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर गेला होता. जोहान्सबर्ग येथे कसोटी मालिकेतील पहिला सामना खेळला गेला.  या सामन्याच्या पहिल्या दिवशी पाकिस्तानी गोलंदाजांसमोर दक्षिण आफ्रिकेचे फलंदाज फ्लॉप ठरले. आफ्रिकेचा संघ पहिल्याच दिवशी अवघ्या 253 धावा करून ऑलआऊट झाला. दुसऱ्या दिवशी आपल्या संघाच्या फलंदाजांच्या कमकुवत कामगिरीची भरपाई करण्यासाठी आफ्रिकेच्या गोलंदाजांवर दबाव होता. त्यानंतर डेल स्टेननं गोलंदाजीची धुरा सांभाळली. त्यानं दुसऱ्याच षटकात मोहम्मद हाफीजला (6 धावा) पॅव्हेलियनमध्ये पाठवले. पुढच्याच षटकात त्यानं दुसरा सलामीवीर नासिर जमशेदलाही (2 धावा) बाद केलं. त्याच षटकात तो युनूस खानलाही शून्यावर माघारी धाडण्यास तो यशस्वी झाला. अवघ्या 12 धावांवर पाकिस्तानच्या संघानं तीन विकेट गमावल्या होत्या.


डेल स्टेनची सर्वोत्तम कामगिरी
दरम्यान, डेल स्टेनला त्याच्या स्पेलमधून ब्रेक मिळाला, त्यानंतर जॅक कॅलिस आणि फिलँडरनं पुढच्या चार विकेट्स आपल्या झोळीत टाकून पाकिस्तानचं कंबरडं मोडलं. त्यानंतर दुसऱ्या स्पेलमध्ये गोलंदाजी करण्यासाठी आलेल्या डेल स्टेननं शेवटच्या तीन षटकांत तीन विकेट घेत पाकिस्तानचा डाव अवघ्या 49 धावांत गुंडाळला. या डावात पाकिस्तानचे दोनच फलंदाज दुहेरी आकडा पार करू शकले. या सामन्यात त्यानं आठ धावा खर्च करून सहा धावा केल्या. 


हे देखील वाचा-