Sanju Samson Dublin Ireland vs India 1st T20I : भारत आणि आयर्लंड (India vs Ireland) आयर्लंडच्या डबलीन क्रिकेट स्टेडियमवर पहिला टी20 सामना खेळवला गेला. भारताने सामना 7 विकेट्सने जिंकला. यावेळी नाणेफेक जिंकत भारताने गोलंदाजी निवडली होती. सामन्यात हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद सोपवण्यात आलं असून अंतिम 11 मध्ये उमरान मलिकने पदार्पण केलं. विशेष म्हणजे आयपीएल गाजवणाऱ्या संजू सॅमसनला मात्र संघात स्थान मिळालेलं नाही. यामुळेच त्याचे चाहते कमालीचे भडकले होते.

  


संजूने भारतासाठी अखेरचा टी20 सामना फेब्रुवारी 2022 मध्ये खेळला होता. तर अखेरचा एकदिवसीय सामना जुलै 2021 मध्ये खेळला होता. त्यानंतर आता आयर्लंड दौऱ्यात तो संघात आहे. पण पहिल्या टी20 सामन्यात संघात ऋतुराज गायकवाड, ईशान किशन, दीपक हुडा, सूर्यकुमार यादव आणि दिनेश कार्तिक या फलंदाजांना संधी मिळाली होती. यामध्ये संजूचं नाव नसल्याने त्याचे फॅन्स भडकले आहेत. ट्वीटरवर संजूचे फॅन्स विविध पोस्ट शेअर कर बीसीसीआयवर टीका करत आहेत. 






भारताचा सात विकेट्सने विजय


भारत विरुद्ध आयर्लंड  (India vs Ireland) यांच्यातील पहिल्या टी20 सामन्यात पावसाने व्यत्यय आणल्यानंतरही अखेर सामना पार पडला. दोन्ही संघाना 12-12 षटकं खेळायला देण्यात आली. ज्यात आयर्लंडने108 धावा करत भारतासमोर 109 धावांचे लक्ष्य ठेवले होते. जे भारताने दीपक हुडाच्या नाबाद 47 धावांच्या जोरावर तीन गडी गमावत भारताने 9.2 षटकात पूर्ण केलं आहे.  


अशी आहे भारताची अंतिम 11


ईशान किशन, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, हार्दिक पांड्या (कर्णधार), दिनेश कार्तिक (विकेटकिपर), अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल,आवेश खान, उमरान मलिक.


हे देखील वाचा-