England Team Captain : क्रिकेट इतिहासातील सर्वात जुना संघ असणाऱ्या इंग्लंडला एकमेव एकदिवसीय चषक जिंकवून देणारा कर्णधार इयॉन मॉर्गन (Eoin Morgan) येत्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. 


क्रिकेट जिथे सर्वात आधी सुरु झालं अशा देशाचा विचार केल्यास इंग्लंडचा नाव सर्वात आधी घेतलं जातं. पण असं असूनही क्रिकेट विश्वचषक सुरु होऊनही कित्येक वर्षे इंग्लंडला विश्वचषक जिंकता आला नाही. पण ही अद्भुत कामगिरी करुन दाखवली इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने (Eoin Morgan) 2019 साली. न्यूझीलंड संघाला अंतिम सामन्यात मात देत इंग्लंडने हा विश्वचषक जिंकला होता. पण मॉर्गन आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती (Eoin Morgan Retirement) घेण्याचा विचार करत असल्याची माहिती समोर येत आहे. द गार्जियन वृत्तसंस्थेने याबाबत त्यांच्या रिपोर्टमध्ये माहिती दिली आहे. मागील काही काळापासून मॉर्गन खराब फॉर्ममध्ये असल्याने तो हा निर्णय़ घेईल अशी चर्चा आहे. आयपीएलमध्येही त्याच्या खराब कामगिरीमुळे केकेआर संघाचा कर्णधार असणारा मॉर्गन यंदा संघातही नव्हता. त्यानंतर आता तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करु शकतो.



बटलरचा पर्याय


मॉर्गनची खराब कामगिरी सुरु असताना दुसरीकडे अफलातून कामगिरी सुरु ठेवली आहे, ती म्हणजे इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर (Joss Buttler). यंदा आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून तीन शतकं ठोकत ऑरेंज कॅप मिळवणारा बटलर अजूनही चांगल्या फॉर्ममध्ये आहे. त्यामुळे तो इंग्लंडचा एकदिवसीय तसंच टी20 संघाचा कर्णधार होण्याची दाट शक्यता आहे. भारत आणि इंग्लंड यांच्यातील एकमेव कसोटी मॅच झाल्यानंतर भारत आणि इंग्लंड मर्यादीत षटकांचे टी20 आणि एकदिवसीय़ सामने खेळेल. याचवेळी बटलर संघाचा कर्णधार होऊ शकतो.


हे देखील वाचा-