ENG vs IND: भारतीय कसोटी संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात भारत इंग्लंडशी एकमात्र कसोटी सामना खेळला जाणार आहे. बर्मिंगहॅमच्या (Birmingham) एजबस्टन क्रिकेट ग्राउंडवर येत्या 1 जुलैपासून या सामन्याला सुरुवात होणार आहे. यापूर्वीच कर्णधार रोहित शर्माची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आढळल्यानंतर भारतीय संघाला मोठा धक्का बसलाय. त्याच्याजागी मयांक अग्रवालची (Mayank Agarwal) संघात वर्णी लागलीय. बीसीसीआय रोहित शर्माच्या फिटनेसवर बारीक लक्ष ठेवून आहे. 


मयांक अग्रवालची कसोटी कारकिर्द
मयांक अग्रवालनं भारतासाठी 21 कसोटी सामने खेळले आहेत. ज्यात 41. 33 च्या सरासरीनं 1 हजार 488 धावा केल्या आहेत. यामध्ये चार शतकांचा समावेश आहे. तो इंग्लंड विरुद्धच्या या कसोटी सामन्यात खेळला तर त्याचा हा इंग्लंड विरुद्ध पहिलाच कसोटी असेल. त्यानं भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियामध्ये सर्वाधिक कसोटी सामने खेळले आहेत. त्यानं 2018 आणि 2021 दरम्यान आस्ट्रेलियाविरुद्ध पाच कसोटी सामने खेळताना 273 धावा केल्या आहेत.


बर्मिंगहॅम कसोटीत भारतीय संघाचं कर्णधारपद कोणाकडं?
रोहित शर्मा न खेळल्यास संघाची धुरा कोणाच्या हाती असेल? याबाबत बीसीसीआयनं अद्याप कोणतीही घोषणा केली नाही. मात्र, वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कर्णधाराच्या शर्यतीत पुढं आहे. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंतचा दावाही मजबूत मानला जात आहे. पाचव्या कसोटीसाठी विराट कोहलीला संघाची कमान सोपवावी, असं चाहते आणि अनुभवी खेळाडूंचं मत आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारत या मालिकेत 2-1 नं आघाडी घेतली. भारताला मालिका आपल्या नावावर करण्याची संधी मिळावी, असं चाहत्यांचं म्हणणं आहे.


बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा?
बर्मिंगहॅम कसोटी सामना भारतासाठी किती महत्वाचा आहे? हे भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी काही दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं होतं. "बर्मिंगहॅम कसोटी सामना जिंकण्या व्यतिरिक्त  वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशी गुणतालिका भारतीय संघासाठी महत्वाची असणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी भारतीय संघ जोर लावेल." डब्ल्यूटीसी गुणतालिकेतील भारताचं स्थान साधारणता श्रीलंका आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणाऱ्या कसोटी मालिकेवर अवलंबून राहणार आहे. 



हे देखील वाचा-