Shahid Afridi on Pahalgam Terror Attack : 'नालायक आहात तुम्ही, तुमची काश्मीरमध्ये 8 लाखांची फौज...', शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला
Shahid Afridi on Pahalgam Terror Attack News : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे.

Shahid Afridi on Pahalgam Terror Attack : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. या हल्ल्यात 26 जणांना आपला जीव गमवावा लागला. यानंतर, भारत सरकारने मोठे निर्णय घेत, पाकिस्तानविरुद्ध अनेक कठोर पाऊले उचलली. यामुळे पाकिस्तान संतापला आहे.
तसेच, भारतात उपस्थित असलेल्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना परत पाठवण्यात आले आहे. याशिवाय, पाकिस्तानसोबत सिंधू पाणी करारही संपुष्टात केला. यामुळे काही माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूही संतापले आहेत आणि वादग्रस्त वक्तव्यने करत आहेत. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने भारतीय सैन्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे.
शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला
पाकिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यासाठी भारतीय लष्कराला जबाबदार धरले आहे. एका पाकिस्तानी वाहिनीवर बोलताना आफ्रिदीने "नालायक" म्हटले. आफ्रिदी म्हणाले, "जर भारतात काहीही झाले तरी त्याचा दोष पाकिस्तानवर येतो. काश्मीरमध्ये 8 लाख भारतीय लष्करी जवान तैनात आहेत. तरीही, तिथे असा हल्ला झाला आहे, ज्यावरून स्पष्ट होते की तुम्ही किती नालायक आहात. भारतीय लष्कर कोणालाही सुरक्षा देऊ शकत नाही."
View this post on Instagram
भारतीय माध्यमांवर टीका
या दहशतवादी हल्ल्याच्या कव्हरेजबद्दल माजी पाकिस्तानी क्रिकेटपटूने भारतीय माध्यमांवरही टीका केली आहे. तो म्हणाले की, "आश्चर्य म्हणजे, हल्ल्याच्या एका तासाच्या आत भारताचा मिडिया बॉलिवूड झाला. मला धक्का बसला, ते ज्या प्रकारच्या गोष्टी सांगत होते आणि बोलत होते त्यावर मी एन्जॉय करत होतो. प्रत्येक टीव्ही चॅनेल कोणत्याही पुराव्याशिवाय उघडपणे पाकिस्तानवर आरोप करत होते."
View this post on Instagram
आफ्रिदीने माजी भारतीय खेळाडूंची नाव न घेता पाकिस्तानवर आरोप केल्याबद्दल त्यांच्यावर टीका केली आहे. शाहिद आफ्रिदी म्हणाला की, ज्या दोन क्रिकेटपटूंनी टीम इंडियासाठी इतके क्रिकेट खेळले आहे, चांगले क्रिकेटपटू राहिले आहेत, ते थेट पाकिस्तानवर आरोप करतात. पण मित्रा पाकिस्तान का? मला फक्त काही पुरावा दाखव.
हे ही वाचा -
श्रीलंकेत टीम इंडिया काळी पट्टी बांधून का उतरली मैदानात? बीसीसीआयने सांगितले कारण





















