PAK vs NZ 1st Test: बाबर आझमचा मोठा पराक्रम! मोहम्मद युसूफचा 16 वर्षांचा विक्रम मोडला; रोहित-विराटलाही टाकलं मागं
PAK vs NZ 1st Test: पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यात कराची (Karachi) येथे पहिला कसोटी सामना खेळला जातोय.
PAK vs NZ 1st Test: पाकिस्तान आणि न्यूझीलंड (Pakistan vs New Zealand) यांच्यात कराची (Karachi) येथे पहिला कसोटी सामना खेळला जातोय. या सामन्यात बाबर आझमनं (Babar Azam) दमदार फलंदाजी करत शतक झळकावलं. हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील नववं शतक ठरलंय. या कामगिरीसह त्यानं मोहम्मद युसूफचा (Mohammad Yousuf) 16 वर्ष जुना रेकॉर्ड मोडला. तसेच भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्मालाही (Rohit Sharma) मागं टाकलंय.
या सामन्यात बाबरनं अनेक विक्रमांना गवसणी घातली. त्यानं या सामन्यात 13 धावा करताच पाकिस्तानचा माजी फलंदाज मोहम्मद युसूफचा 16 वर्ष जुना विक्रम मोडला. बाबर आता कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅट्स एकत्र करून एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू बनला आहे. याबाबतीत त्यानं युसूफचा विक्रम मोडला. युसूफनं 2006 मध्ये 33 सामन्यात 2 हजार 435 धावा केल्या होत्या. त्याचवेळी, न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत खेळण्यापूर्वी बाबरच्या नावावर 43 सामन्यात 2 हजार 423 धावांची नोंद होती.
विराट कोहली, रोहित शर्माला टाकलं मागं
बाबरनं युसूफलाच नाही तर भारताच्या रोहित शर्मा आणि विराट कोहलीलाही मागं सोडलं. हे दोघंही 2019 मध्ये एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू ठरले होते. रोहितनं त्या वर्षी 47 सामन्यांत 2 हजार 442 धावा केल्या होत्या. त्याचवेळी कोहलीनं 44 सामन्यात 2 हजार 455 धावा केल्या होत्या.
हे देखील वाचा-