PAK vs ENG: जेम्स अँडरसनचा 'मॅजिक बॉल', रिझवानलाही कळालं नाही की तो कधी क्लीन बोल्ड झाला, पाहा व्हिडिओ
James Anderson Magic Ball: मुल्तानमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं पाकिस्तानचा (Pakistan vs England) 26 धावांनी धुव्वा उडवला.
James Anderson Magic Ball: मुल्ताच्या (Multan) मुल्तान क्रिकेट स्टेडियमवर (Multan Cricket Stadium) खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडच्या संघानं पाकिस्तानचा (Pakistan vs England) 26 धावांनी धुव्वा उडवला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं तीन सामन्याच्या कसोटी मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली. बेन स्टोक्सच्या (Ben Stokes) नेतृत्वाखाली इंग्लंडच्या संघानं मालिकेवर कब्जा केला असून अखरेचा सामना केवळ औपचारिकता म्हणून खेळला जाणार आहे. दरम्यान, या सामन्यात इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसननं (James Anderson) पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवानला (Mohammad Rizwan) टाकलेल्या चेंडूची सोशल मीडियावर (Social Media) जोरदार चर्चा रंगलीय. अँडरसनच्या या चेंडूला नेटकरी 'मॅजिक बॉल' म्हणून संबोधित आहेत. अँडरसनच्या गोलंदाजीचं कौतुक केलं जात आहे.
मुल्तान कसोटीच्या तिसऱ्या दिवशी लंच टाईमनंतर 16व्या षटकातील पाचव्या चेंडूवर जेम्स अँडरसननं मोहम्मद रिझवानला मॅजिक बॉल टाकून क्लीन बोल्ड केलं. अँडरसनचा हा चेंडू इतका चांगला होता की, मोहम्मद रिझवानलाही कळालं नाही की, तो कधी क्लीन बोल्ड झाला.
व्हिडिओ-
The genius of James Anderson pic.twitter.com/EXaxSYh7Ul
— . (@paceandbounce_) December 11, 2022
इंग्लंडनं मुल्तान कसोटी सामना जिंकला
मुल्तानमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात इंग्लंडनं पाकिस्तानचा पराभव करून इतिहास रचला. इंग्लंडनं तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेवर 2-0 असा कब्जा केलाय. मुल्तान कसोटी सामन्यात पाकिस्तान मजबूत स्थितीत दिसत होता. परंतु कसोटीच्या चौथ्या दिवशी असे काही आश्चर्यकारक घडलं की, इंग्लंडनं सामन्यात जबरदस्त पुनरागमन केले आणि काही वेळातच सामना जिंकला. हा सामना पाकिस्ताननं 26 धावांनी गमावला. या विजयासह इंग्लंडच्या संघानं मालिका खिशात घातलीय.
पाकिस्तानची प्लेईंग इलेव्हन:
अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (विकेटकिपर), आगा सलमान, सौद शकील, मोहम्मद नवाज, फहीम अश्रफ, झाहिद महमूद, मोहम्मद अली, अबरार अहमद.
इंग्लंडची प्लेईंग इलेव्हन:
झॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप (विकेटकिपर), जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (कर्णधार), विल जॅक्स, ऑली रॉबिन्सन, जॅक लीच, मार्क वुड, जेम्स अँडरसन.
हे देखील वाचा-