Hardik Pandya: गुजरातला चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पांड्याला मिळालं खास 'गिफ्ट'
IPL 2022: गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) उद्योगपती वीरा पहारियाकडून (Veera Pahariya) एक खास गिफ्ट मिळालं आहे.
IPL 2022: गुजरात टायटन्सला चॅम्पियन बनवणाऱ्या हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) उद्योगपती वीरा पहारियाकडून (Veera Pahariya) एक खास गिफ्ट मिळालं आहे. हार्दिक पांड्यानं स्वत: इंन्टाग्राम स्टोरीवर या गिफ्टचा व्हिडिओ शेअर केलाय. हार्दिकची पत्नी नताशा स्तांकोविक (Natasha Stankovic) हा व्हिडिओ बनवताना दिसत आहे. हे गिफ्ट मिळाल्यानं हार्दिक खूश दिसत आहे.
गिफ्टमध्ये काय मिळालं?
दरम्यान, हार्दिक पांड्याला मिळालेलं गिफ्ट एक पेंडेंट आहे. ज्याच्या एका बाजूला गुजरात टायटन्स आणि दुसऱ्या बाजूला आयपीएल चॅम्पियन्स कर्णधार लिहिलेलं आहे. हार्दिक पांड्यानं हे पेंडेंट गळ्यात घातल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. व्हिडिओच्या पाठीमागं गुजरात टायटन्सचं टायटल साँग ऐकू येत आहे.
हार्दिकचं उत्कृष्ट नेतृत्व
आयपीएलच्या मेगा ऑक्शनपूर्वी गुजरात टायटन्सनं हार्दिक पांड्याला ड्राफ्ट केलं होते. त्यानंतर गुजरातच्या संघाचं कर्णधारपदही त्याच्याकडं सोपवलं. गुजरातच्या या निर्णयामुळं क्रिकेट तज्ज्ञ आश्चर्यचकित झाले. अनेक माजी क्रिकेटपटू हार्दिकच्या गोलंदाजीच्या फिटनेसवर आणि कर्णधारपदावर शंका घेत होते. हार्दिक पांड्या गेल्या अनेक दिवसांपासून गोलंदाजीपासून दूर होता. तसेच त्याला कर्णधारपदाचा अनुभवही नव्हता, हे यामागचं कारण असू शकतं. पण हार्दिक पांड्यानं गुजरातला आयपीएलचा पंधरावा टायटल जिंकून सर्वांच्या प्रश्नांना पूर्णविराम लावलं.
हार्दिक पांड्याची आयपीएल 2022 मधील कामगिरी
या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत हार्दिकचा समावेश होता. त्यानं 44.27 च्या सरासरीनं 487 धावा केल्या. यादरम्यान हार्दिकचा स्ट्राईक रेटही 131.26 होता. हंगामात त्यानं एकूण ४ अर्धशतक झळकावली आहेत. तसेच गोलंदाजी करताना त्यानं प्रतिषटक 7.27 धावा दिल्या आणि 8 विकेट घेतल्या. आयपीएल 2022 च्या अंतिम सामन्यातही त्यानं सामनावीराचा पुरस्कार जिंकला.
हे देखील वाचा-