World Cup 2023 : वर्ल्डकपआधीच कांगारुंना मोठा धक्का, मॅचविनर अष्टपैलू खेळाडू स्पर्धेबाहेर
ODI World Cup 2023, Australia Team: क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होण्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे.
ODI World Cup 2023, Australia Team: क्रिकेटच्या महाकुंभाला सुरुवात होण्याआधीच ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला आहे. फिरकी गोलंदाज एश्टन एगर याला गंभीर दुखापत झाली आहे. त्यामुळे एश्टन एगर विश्वचषकातून बाहेर गेलाय. ऑस्ट्रेलियासाठी हा मोठा धक्का मानला जातोय. भारतीय खेळपट्टीवर फिरकी गोलंदाज प्रभावी ठरतात, अशा स्थितीत एश्टन एगर दुखापतीमुळे स्पर्धेला मुकला आहे. एश्टन एगर गोलंदाजीशिवाय तळाला फलंदाजी करण्यातही सक्षम होता. विश्वचषकाच्या संघात बदल करण्याचा आज अखेरचा दिवस आहे, अशा स्थितीत ऑस्ट्रेलिया कुणाला संधी देणार, याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.
पाच ऑक्टोबरपासून भारतामध्ये विश्वचषकाच्या थराराला सुरुवात होणार आहे. या रनसंग्रामाला आठ दिवस शिल्लक आहेत. त्यापूर्वीच कांगारुंना मोठा धक्का बसलाय. अष्टपैलू खेळाडू एश्टन एगर दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर गेला आहे. एश्टन एगरच्या पायाला दुखापत झाली आहे. त्यामुळे विश्वचषकाला मुकणार आहे. वर्ल्ड कप संघात बदल करण्याची आज अखेरची संधी आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया कुणाला संधी देणार? याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मार्नस लाबुशेन की संघा -
मीडिया रिपोर्ट्सनुसार, एश्टन एगरच्या जागी क्रिकेट ऑस्ट्रेलिया मार्नस लाबुशेन याला संधी देण्याचा विचार करत आहे. तर काही रिपोर्ट्सनुसार, फिरकी गोलंदाज तनवीर संघा याला संधी मिळू शकते. लाबुशेन याला संधी मिळण्याची शक्यता जास्त वर्तवली जात आहे. मॅक्सवेल आणि जम्पा फिरकीची जबाबदारी पार पाडू शकतात. त्याशिवाय लाबुशेनही फिरकी गोलंदाजी करण्यास सक्षम आहे. अशा स्थितीत फलंदाजी मजबूत करण्यासाठी लाबुशेनला संधी दिली जाऊ शकते.
Ashton Agar ruled out of this World Cup 2023. (To Fox Cricket) pic.twitter.com/BlXMDE6nGq
— CricketMAN2 (@ImTanujSingh) September 28, 2023
Marnus Labuschagne set to replace Ashton Agar in the Australian World Cup squad.
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) September 28, 2023
Travis Head retains his spot! (Code Sports). pic.twitter.com/in4GhRvBLG
ऑस्ट्रेलिया संघाचे संपूर्ण वेळापत्रक -
विश्वचषकात ऑस्ट्रेलिया संघाचा पहिला सामना भारताविरोधात होणार आहे. चेन्नईमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये आठ ऑक्टोबर रोजी होणार आहे. यानंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा सामना 12 ऑक्टोबरला लखनौमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. तर तिसरा सामना 16 ऑक्टोबरला लखनऊमध्ये श्रीलंकेविरुद्ध होईल. चौथा सामना 20 ऑक्टोबरला बेंगळुरूमध्ये पाकिस्तानविरुद्ध होईल. २५ ऑक्टोबरला दिल्लीत पाचवा नेदरलँड विरुद्ध होणार आहे. सहावा न्यूझीलंडविरुद्ध २८ ऑक्टोबरला धर्मशाला येथे तर सातवा इंग्लंडविरुद्ध ४ नोव्हेंबरला अहमदाबादमध्ये लढत होईल. आठवा सामना अफगाणिस्तानविरुद्ध ७ नोव्हेंबरला मुंबईत आणि नववा आणि शेवटचा सामना 11 नोव्हेंबरला बांगलादेश विरुद्ध पुण्यात होणार आहे.
ऑस्ट्रेलियाचे संपूर्ण वेळापत्रक
8 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत- चेन्नई
12 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका- लखनऊ
16 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध श्रीलंका- लखनौ
20 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान- बेंगळुरु
25 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध नेदरलँड- दिल्ली
28 ऑक्टोबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड- धर्मशाला में
4 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड- अहमदाबाद में
7 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध अफगानिस्तान- मुंबई में
11 नोव्हेंबर: ऑस्ट्रेलिया विरुद्ध बांग्लादेश- पुणे में.
विश्व कप स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाचे शिलेदार -
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टिव्ह स्मिथ, एलेक्स कॅरी, जोश इंगलिस, सीन एबॉट, एश्टन एगर, कॅमरन ग्रीन, जोश हेजलवुड, ट्रेविस हेड, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोयनिस, डेविड वार्नर, एडम जाम्पा आणि मिशेल स्टार्क.
आणखी वाचा :
World cup 2023 : आर. अश्विन की अक्षर पटेल, विश्वचषकात कोण खेळणार? आज पडदा उठणार!
मालिका जिंकल्यानंतर रोहितने ट्रॉफीला हातही लावला नाही, हिटमॅनने असे का केलं? कारण...
𝗠𝗶𝘀𝘀𝗶𝗼𝗻 𝗪𝗼𝗿𝗹𝗱 𝗖𝘂𝗽 𝗕𝗲𝗴𝗶𝗻𝘀.... सराव सामन्याचे संपूर्ण वेळापत्रक एका क्लिकवर, भारताचा सामना कधी ?