(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NZ vs SL : श्रीलंकेचं न्यूझीलंडसमोर 285 धावांचं आव्हान, भारतासाठीही सामना महत्त्वाचा
New Zealand vs Sri Lanka : क्राइस्टचर्च कसोटी सामन्यात श्रीलंका संघाचा दुसरा डाव 302 धावांवर आटोपला, त्यानंतर न्यूझीलंड संघाला विजयासाठी 285 धावांचे लक्ष्य मिळालं आहे.
New Zealand vs Sri Lanka, 1st Test : न्यूझीलंड (New Zealand) आणि श्रीलंका (Sri Lanka) यांच्यातील टेस्ट सीरिज खेळवली जात आहे. दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील आज पहिला सामना क्राइस्टचर्च येथे सुरु आहे. सामन्यात श्रीलंका संघाचा दुसरा डाव 302 धावांवर आटोपला आहे. त्यानंतर यजमान न्यूझीलंडला सामन्याच्या चौथ्या डावात विजयासाठी 285 धावांचं लक्ष्य मिळालं आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत पोहोचण्याच्या पार्श्वभूमीवर ही कसोटी मालिका श्रीलंकेसोबतच आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
श्रीलंका आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज क्राइस्टचर्च येथे खेळवला जात आहे. या सामन्यात किवी संघासमोर विजयासाठी 285 धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. जर श्रीलंकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या (WTC) अंतिम फेरीच्या शर्यतीत टिकायचे असेल तर त्यांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकावा लागेल. जर या सामन्यात श्रीलंकेला पराभवाचा सामना करावा लागला किंवा सामना अनिर्णित राहिला तर टीम इंडिया ऑस्ट्रेलियासोबत फायनलमध्ये प्रवेश करेल असेल.
Set for a thrilling finish tomorrow!
— ICC (@ICC) March 12, 2023
Can Sri Lanka keep their #WTC23 hopes alive with a win? Or will New Zealand hold firm at Hagley Oval?
Watch the #NZvSL series live with a Black Caps Pass on https://t.co/CPDKNxoJ9v 📺 pic.twitter.com/evwIcOYlaN
बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2023 ची चौथी कसोटी भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अहमदाबादमध्ये सुरू आहे. जर भारत हा कसोटी सामना हरला किंवा सामना अनिर्णित राहिला तर श्रीलंकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये प्रवेश करण्यासाठी न्यूझीलंडविरुद्धचे दोन्ही सामने जिंकावे लागतील.