(Source: ECI/ABP News/ABP Majha)
NZ vs IND: न्यूझीलंडचे गोलंदाज समोर येताच तळपते रोहितची बॅट; टी-20 मालिकेत भारताकडून ठोकल्यात सर्वाधिक धावा
India Tour of New Zealand: टी-20 विश्वचषकातील पराभवाची खपली भरून काढण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेलाय.
India Tour of New Zealand: टी-20 विश्वचषकातील पराभवाची खपली भरून काढण्यासाठी भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर गेलाय. या दौऱ्यात भारतीय संघ न्यूझीलंडसोबत (IND vs NZ) तीन सामन्यांची टी-20 मालिका आणि तितक्याच सामन्याची एकदिवसीय मालिका खेळणार आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारताचा नियमित कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) यांसह अनेक वरिष्ठ खेळाडूंना विश्रांती देण्यात आलीय. भारताचा स्टार ऑलराऊंडर हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) नेतृत्वाखाली भारतीय संघ शुक्रवारी न्यूझीलंडविरुद्ध पहिला टी-20 सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाच्या यादीत रोहित शर्मा टॉपवर आहे.
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहितच्या नावावर आहे. पहिल्या 5 खेळाडूंच्या यादीत तो एकमेव भारतीय खेळाडू आहे. भारत- न्यूझीलंड टी-20 मालिकेत रोहित शर्माच्या बॅटमधून 511 धावा निघाल्या आहेत. या यादीत न्यूझीलंडचा कॉलिन मुनरो दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याच्या नावावर 426 धावांची नोंद आहे. तर, मार्टिन गप्टिल 380 धावांसह तिसऱ्या क्रमांकावर आणि केन विल्यमसन 359 धावांसह चौथ्या स्थानावर आहे.
भारत-न्यूझीलंड टी-20 मालिकेत सर्वाधिक धावा करणारे फलंदाज:
क्रमांक | फलंदाज | धावा |
1 | रोहित शर्मा (भारत) | 511 |
2 | कॉलिन मुनरो (न्यूझीलंड) | 426 |
3 | मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड) | 380 |
4 | के विलियमसन (न्यूझीलंड) | 358 |
5 | रॉस टेलर (न्यूझीलंड) | 349 |
6 | केएल राहुल (भारत) | 322 |
7 | टी सीफर्ट (न्यूझीलंड) | 322 |
8 | विराट कोहली (भारत) | 311 |
कसा असेल भारताचा न्यूझीलंड दौरा?
टी-20 मालिकेपासून भारताच्या न्यूझीलंड दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला टी-20 सामना 18 नोव्हेंबर रोजी खेळला जाणार आहे. टी-20 मालिकेत हार्दिक पांड्याकडं भारतीय संघाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. त्यानंतर 25 नोव्हेंबरपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेला सुरुवात होणार आहे. एकदिवसीय मालिकेत शिखर धवनं भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसणार आहे. यापूर्वी आयर्लंड दौऱ्यात हार्दिक पांड्यानं भारतीय संघाचं नेतृत्व केलं होतं. या दौऱ्यातील दोन सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं 2-0 असा विजय मिळवला होता.
न्यूझीलंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ:
हार्दिक पांड्या (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, ईशान किशन, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, हर्षल पटेल, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, उमरान मलिक.
न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघ:
शिखर धवन (कर्णधार), ऋषभ पंत (विकेटकीपर), शुभमन गिल, दीपक हुड्डा, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, संजू सॅमसन (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकुर, शहबाज अहमद, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, अर्शदीप सिंह, दीपक चाहर, कुलदीप सेन, उमरान मलिक.
हे देखील वाचा-