Cricket News : सगळा संघ 2 धावांवर बाद, त्यात एक रन वाईडची, घातक गोलंदाजीपुढं फलंदाजांनी गुडघे टेकले, तब्बल 424 धावांनी पराभव
Cricket News : इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या काऊंटी क्रिकेटमध्ये एक संघ अवघ्या 2 धावांवर बाद झाला. केवळ एका फलंदाजानं एक रन केली.

लंडन : इंग्लंडमध्ये काऊंटी क्रिकेट लीग सुरु आहे, या लीगमध्ये नॉर्थ लंडन सीसी आणि रिचमंड सीसी मिडेक्स या संघांमधील सामना चर्चेत राहिला. नॉर्थ लंडन सीसी या संघानं तब्बल 424 धावांनी विजय मिळवला. तर रिचमंड सीसी मिडेक्स संघ 2 धावांवर बाद झाला. नॉर्थ लंडन डॉट कॉम नुसार रिचमंड सीसी मिडेक्स संघ केवळ 2 धावा करु शकला आणि 5 ओव्हरमध्ये बाद झाला.
नॉर्थ लंडन सीसीनं पहिल्यांदा फलंदाजी करताना 45 ओव्हरमध्ये 6 विकेट 426 धावा केल्या. या बलाढ्य धावसंख्येच्या उभारणीमध्ये संघाचा सलामीवीर फलंदाज डॅनियल सिमन्सनं 140 धावांची खेळी केली. टीमचा दुसरा कोणताही खेळाडू अर्धशतक देखील करु शकला नाही. यामुळं विजयासाठी रिचमंड सीसी मिडेक्स संघापुढं मोठी धावसंख्या पार करण्याचं आव्हान होतं.
सगळा संघ 2 धावांवर बाद
रिचमंड डीसीच्या फलंदाजांनी नॉर्थ लंडन सीसीच्या गोलंदाजांपुढं गुडघे टेकले. रिचमंड सीसी हा संघ 5.4 ओव्हर खेळू शकला. संपूर्ण संघ केवळ 2 धावा करुन बाद झाला. विशेष म्हणजे त्यातील एक रन वाईड बॉलची होती. टीमसाठी केवळ एक रन टॉम पिट्राइडिस यानं एक रन केली. रिचमंड सीसी, मिडेक्सला 424 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. नॉर्थ लंडन सीसी कडून थॉमस स्पॅवटॉन आणि मॅथ्यू रोस्सन यांनी रिचमंड सीसी, मिडेक्सला बाद केलं. मॅथ्यूनं जॅमी ह्यूमनला रन आऊट केलं.
लवकरच भारत आणि इंग्लंड यांच्यात मालिका
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच कसोटी सामन्यांची मालिका सुरु होणार आहे. ही मालिका 20 जून पासून सुरु होणार आहे ती 4 ऑगस्टपर्यंत सुरु राहील. या मालिकेत भारताचं नेतृत्त्व शुभमन गिल करणार आहे. भारतीय संघाची घोषणा देखील झाली आहे. त्यापूर्वी इंग्लंडमधील काऊंटी क्रिकेटमधील या मॅचचा निकाल आश्चर्याचा धक्का देणारा आहे. गोलंदाज कशी कामगिरी करु शकतात याचं उदाहरण पाहायला मिळेल. एक संघ 2 धावांवर बाद झाला तर त्यातील 8 खेळाडू एकही रन न करता पॅव्हेलियनमध्ये परतले.
सौरव गांगुलीचा भाऊ आणि वहिनीसोबत घडली मोठी दुर्घटना, स्पीडबोट पलटली, समुद्रात बुडता बुडता वाचले





















