NEP Vs NED Test : क्रिकेटमध्ये असं पाहिलंय का? तीन सुपर ओव्हरचा थरार, नेपाळ-नेदरलँड्स सामन्यात हाय व्होल्टेज ड्रामा, अखेर कोणी बाजी मारली?
Netherlands vs Nepal Super Overs : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या टी-20 ट्राय सिरीज 2025 मध्ये एक ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला.

Netherlands vs Nepal Super Overs : स्कॉटलंडमधील ग्लासगो येथे सुरू असलेल्या टी-20 ट्राय सिरीज 2025 मध्ये एक ऐतिहासिक सामना पाहायला मिळाला. जेव्हा नेपाळ आणि नेदरलँड्स यांच्यातील दुसरा टी-20 सामना केवळ बरोबरीत राहिला नाही, तर तीन सुपर ओव्हरनंतर सामन्याचा निकाल लागला. क्रिकेट इतिहासातील हा पहिला टी-20 सामना ठरला, ज्यामध्ये तीन सुपर ओव्हर खेळवण्यात आले, ज्यामुळे क्रिकेटच्या मैदानात चाहत्यांना हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. हा रोमांचक सामना टिटवुड मैदानावर खेळवण्यात आला.
A scorecard that needs to be seen to be believed as The Netherlands and Nepal need THREE Super Overs to separate them 🤯#NEDvNEP 📝: https://t.co/0E9G1sRmm7
— ICC (@ICC) June 17, 2025
📸 @KNCBcricket pic.twitter.com/OInzbhdqgB
एक, दोन नाही... थेट तीन सुपर ओव्हर!
या सामन्यात नेदरलँड्सने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 7 गडी गमावून 152 धावा केल्या. नेपाळच्या फिरकीपटूंनी, विशेषतः संदीप लामिछाने आणि ललित राजवंशी यांनी शानदार गोलंदाजी केली आणि नेदरलँड्सना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले. प्रत्युत्तरादाखल, नेपाळ संघानेही 20 षटकांत 8 गडी गमावून 152 धावा केल्या, ज्यामुळे सामना बरोबरीत आला. नेपाळकडून नंदन यादवने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून धावसंख्या बरोबरीत आणली, ज्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला.
सुपर ओव्हरमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा...
पहिल्या सुपर ओव्हरमध्ये नेपाळने 19 धावा केल्या. पण नेदरलँड्सनेही प्रत्युत्तरात 19 धावा केल्या आणि सुपर ओव्हर बरोबरीत सुटला. त्यानंतर दुसरा सुपर ओव्हर खेळवण्यात आला, जिथे दोन्ही संघांनी पुन्हा समान धावा केल्या. यावेळी दोन्ही संघांनी 17-17 धावा केल्या, ज्यामुळे सामना तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये गेला. पण तिसऱ्या सुपर ओव्हरमध्ये नेपाळ संघाला आपले खाते उघडता आले नाही आणि त्याने दोन्ही विकेट गमावल्या. यानंतर, नेदरलँड्सने पहिल्या चेंडूवर षटकार मारून सामना जिंकला.
ℕ𝕖𝕥𝕙𝕖𝕣𝕝𝕒𝕟𝕕𝕤 🇳🇱 𝕤𝕖𝕒𝕝 𝕥𝕙𝕖 𝕥𝕣𝕚𝕝𝕠𝕘𝕪 𝕚𝕟 𝕤𝕥𝕪𝕝𝕖 😎
— FanCode (@FanCode) June 16, 2025
Match tied ✅
Two Super Overs tied ✅
Third Super Over: Nepal - 0 all out ✅
Netherlands finish it with a first-ball six 💥#NEPvNED #FanCode pic.twitter.com/iM24XzHOfv
...अखेर नेदरलँड्स संघाने बाजी मारली!
नेदरलँड्ससाठी या सामन्यात तेजा निदामानुरूने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 35 धावांचे योगदान दिले. त्याच वेळी, विक्रमजीत सिंगने 30 धावांची खेळी खेळली. साकिब झुल्फिकारनेही 25 धावा केल्या. दुसरीकडे, गोलंदाजीत डॅनियल डोराम सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 4 षटकांत 14 धावा देऊन 3 तर विक्रमजीत सिंगनेही 2 विकेट घेतल्या. त्याच वेळी, जॅक लिऑन-कॅशेट, बेन फ्लेचर आणि काइल क्लेन यांना 1-1 असे यश मिळाले.
हे ही वाचा -





















