Sophie Devine News : निवृत्तीचा ट्रेंड काही थांबेना... आणखी एका दिग्गज खेळाडूनी क्रिकेटला ठोकला रामराम, 19 वर्षांच्या शानदार कारकिर्दीचा शेवट
विराट कोहली, रोहित शर्मा, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ आणि निकोलस पूरन सारख्या दिग्गज खेळाडूंनी वेगवेगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.

Sophie Devine Retirement News : या वर्षी क्रिकेट दिग्गजांच्या निवृत्तीचा ट्रेंड थांबत नाहीये. विराट कोहली, रोहित शर्मा, ग्लेन मॅक्सवेल, स्टीव्ह स्मिथ आणि निकोलस पूरन सारख्या दिग्गज खेळाडूंनी वेगवेगळ्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे. या यादीत असे काही खेळाडू आहेत ज्यांनी लवकरच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. आता न्यूझीलंड क्रिकेट संघातील एका अनुभवी अष्टपैलू खेळाडूने एकदिवसीय क्रिकेटला रामराम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही खेळाडू न्यूझीलंडची कर्णधार सोफी डेव्हाईन आहे. 2025 च्या एकदिवसीय वर्ल्ड कपचे वेळापत्रक जाहीर झाल्यानंतर सोफी डेव्हाईनने हा निर्णय घेतला.
सोफी डेव्हाईनने घेतला एक महत्त्वाचा निर्णय...
न्यूझीलंड महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि अनुभवी अष्टपैलू खेळाडू सोफी डेव्हाईनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. तिने स्पष्ट केले आहे की, 2025 मध्ये भारतात होणारा महिला एकदिवसीय वर्ल्ड कप हा तिच्या कारकिर्दीतील शेवटचा असेल.
🗣️"It's a decision that has come with considerable thought and was always going to be really hard to do." @sophdevine77 on her decision to retire from ODI cricket after the @cricketworldcup🏆 pic.twitter.com/QfxcpSdKcM
— WHITE FERNS (@WHITE_FERNS) June 16, 2025
पण डेव्हाईनने असेही स्पष्ट केले आहे की, ती टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळत राहील. या अनुभवी खेळाडूला 2020 मध्ये न्यूझीलंड संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. तिच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षी दुबईमध्ये खेळला गेलेला न्यूझीलंडने टी-20 वर्ल्ड कप जिंकला होता.
न्यूझीलंड बोर्ड एक ते दोन दिवसांत महिला संघाचा केंद्रीय करार जाहीर करणार होते, त्याआधीच डेव्हाईनने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. अशा परिस्थितीत, एक गोष्ट स्पष्ट आहे की तिचे नाव आता केंद्रीय करारात राहणार नाही. तिच्याकडे आता फक्त टी-20 स्वरूपाचा करार असेल.
19 वर्षांच्या शानदार कारकिर्दीचा शेवट
2006 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी पदार्पण केल्यापासून आतापर्यंत सोफी डेव्हाईनने न्यूझीलंड महिला क्रिकेट संघासाठी 151 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये तिने फलंदाजी करताना 3990 धावा केल्या आहेत, या काळात सोफीने 16 अर्धशतके आणि 8 शतके केली आहेत. याशिवाय गोलंदाजी करताना सोफीने या फॉरमॅटमध्ये 107 विकेट्स घेतल्या आहेत. तिला जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंपैकी एक मानले जाते.
हे ही वाचा -





















