NED vs ENG : डेविन मलानचा षटकार थेट झाडाझुडपात, फिल्डिंग करणारे शोधत राहिले, पाहा व्हिडीओ
Ball Search in NED vs ENG 1st ODI : इंग्लंड आणि नेदरलँड (NED vs ENG) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक अजब गजब आणि आश्चर्यचकीत करणारी घटना घडली आहे.
Ball Search in NED vs ENG 1st ODI : इंग्लंड आणि नेदरलँड (NED vs ENG) यांच्यातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात एक अजब गजब आणि आश्चर्यचकीत करणारी घटना घडली आहे. इंग्लंडचा विस्फोटक फलंदाज डेविड मलान (Dawid Malan) याने लगावलेला षटकार थेट स्टेडिअमबाहेरील झाडाझुडपात गेला. चेंडू शोधण्यासाठी मैदानाचा स्टाफ आणि नेदरलँडच्या खेळाडूंना (Netherlands Players) झाडाझुडपात जावे लागलेय.
इंग्लंड आणि नेदरलँड यांच्यामध्ये एम्सटलवीन शहरातील वीआरए क्रिकेट स्टेडियममध्ये सामना सुरु आहे. या सामन्यात मलान याने लगावलेला एक षटकार थेट मैदानाबाहेर असणाऱ्या झाडाझुडपात गेला. हा चेंडू शोधण्यासाठी खेळाडू आणि मैदानाच्या स्टाफला जावे लागले. चेंडू शोधण्यासाठी गेलेल्या खेळाडूंचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. ICC नेही चेंडू शोधतानाचा नेदरलँडच्या खेळाडूंचा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केलाय.
The ball hunt is 🔛 #NEDvENG pic.twitter.com/phxGuUx2z5
— ICC (@ICC) June 17, 2022
इंग्लंडची फलंदाजी सुरु असताना नवव्या षटकात मलान याने हा कारनामा केलाय. पीटर सीलार याच्या एका चेंडूवर मलान याने खणखणीत षटकार लगावला. मलानच्या फटक्यात इतकी ताकद होती की, चेंडू मैदानाबाहेर असलेल्या झाडाझुडपात गेला. चेंडू शोधण्यासाठी आता मैदानाचा स्टाफ गेला. पण त्यांना खूप वेळ चेंडू मिळालच नाही. त्यानंतर फिल्डिंग करणारे नेदरलँडचे खेळाडूही चेंडू शोधण्यासाठी गेले. या प्रकरणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.
Drama in Amstelveen as the ball ends up in the trees 🔍 pic.twitter.com/MM7stEMHEJ
— Henry Moeran (@henrymoeranBBC) June 17, 2022
इंग्लंडचा विश्वविक्रम, 489 धावांचा डोंगर उभारला -
डेविड मलान, जोस बटलर आणि फिल साल्ट यांच्या वादळी शतकाच्या बळावर इंग्लंड संघाने एकदिवसीय क्रिकेटमध्ये विश्वविक्रम केलाय. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांत चार गड्यांच्या मोबदल्यात 498 धावांचा डोंगर उभारलाय. 500 धावांचा माईलस्टोन थोडक्यात राहिला. एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत तब्बल 21 वेळा 400 पेक्षा जास्त धावांचा पाऊस पडलाय. यामध्ये पाचवेळा इंग्लंड संघाने 400 पेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. तर श्रीलंकाने दोन वेळा असा पराक्रम केलाय. भारत आणि दक्षिण आप्रिका संघानेही पाचवेळा 400 पेक्षा जास्त धावांचा डोंगर उभारण्याची किमया केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडला प्रत्येकी एक एक वेळा असा पराक्रम करता आलाय.