IND vs AUS : नॅथन लायनने रचला इतिहास, भारतात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेणारा गोलंदाज, पाहा टॉप-5 ची यादी
Ahmedabad Test : भारतात सर्वाधिक कसोटी विकेट्स घेण्याचा विदेशी गोलंदाजाचा विक्रम इंग्लंडच्या डेरेक अंडरवूडच्या नावावर होता, आता तो ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लायनच्या नावावर आहे.
Test Cricket Records : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात अहमदाबादमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन फिरकी गोलंदाज नॅथन लायनने (Nathan Lyon) मोठा विक्रम केला. तो भारतीय भूमीत सर्वाधिक कसोटी बळी घेणारा विदेशी गोलंदाज ठरला आहे. त्याने इंग्लंडचा माजी गोलंदाज डेरेक अंडरवूडला (Derek Underwood) मागे टाकत ही कामगिरी केली आहे. डेरेकने भारतात एकूण 54 कसोटी विकेट्स घेतले आहेत.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 च्या चौथ्या कसोटी सामन्यात, नॅथन लायनने प्रथम शुभमन गिलला एलबीडब्लू केले आणि डेरेकच्या भारताच्या 54 बळींच्या विक्रमाची बरोबरी केली. यानंतर सामन्याच्या चौथ्या दिवशी केएस भरतची विकेट घेत त्याने डेरेकला या यादीत मागे टाकले. त्यानंतर त्याने आर अश्विनलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले.
भारतातील नॅथनची कामगिरी
नॅथन लायनने आता भारतात 11 कसोटी सामन्यांच्या 19 डावात 56 विकेट घेतल्या आहेत. त्याने 27.35 च्या सरासरीने या विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याने पाच कसोटी सामन्यांमध्ये पाच किंवा पाचपेक्षा जास्त विकेट घेतल्या आहेत. त्याचबरोबर त्याने 10 हून अधिक विकेट्सही घेतल्या आहेत. भारतातील त्याची सर्वोत्तम गोलंदाजी इंदूरमधील शेवटच्या कसोटी सामन्यात पाहायला मिळाली, जिथे त्याने 99 धावांत 11 बळी घेतले.
भारतात सर्वाधिक विकेट्स घेणारे अन्य चार गोलंदाज
नॅथन लायननंतर इंग्लंडचा माजी फिरकीपटू डेरेक अंडरवूड हा भारतात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. डेरेकने 1972 ते 1982 दरम्यान भारतीय मैदानावर 16 सामन्यांत 54 विकेट घेतल्या. गेल्या 40 वर्षांपासून हा विक्रम त्यांच्या नावावर होता. डेरेकनंतर ऑस्ट्रेलियाचा माजी फिरकी गोलंदाज रिची बेनॉड (52 विकेट) चौथ्या क्रमांकावर, वेस्ट इंडिजचा माजी वेगवान गोलंदाज कोर्टनी वॉल्श (43 विकेट) आणि पाचव्या क्रमांकावर श्रीलंकेचा महान फिरकी गोलंदाज मुथय्या मुरलीधरन (40 विकेट) आहे.
हा खास रेकॉर्डही केला होता नावावर
काही दिवसांपूर्वीच नॅथन लायन हा भारताविरुद्धचा सर्वात यशस्वी फिरकी गोलंदाज ठरला होता. त्याने मुरलीधरनला मागे टाकलं होतं. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये नॅथन लायनने दमदार कामगिरी केली होती. सध्या त्याच्या नावावर 113 विकेट्स भारताविरुद्ध असून मुरलीधरन 105 विकेट्सनी दुसऱ्या स्थानावर आहे. तर लान्स गिब्स (63 विकेट्स) आणि डेरेक अंडरवुड (62 विकेट्स) हे तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आहेत.
भारताविरुद्ध सर्वात यशस्वी फिरकीपटू
नॅथन लायन - 106* विकेट्स
मुथय्या मुरलीधरन - 105 विकेट्स
लान्स गिब्स - 63 विकेट्स
डेरेक अंडरवूड - 62 विकेट्स
हे देखील वाचा-