मैत्रीण अचानक माझ्या रुममध्ये घुसली अन्...; अमित मिश्राची झालेली 3 तास चौकशी, नेमकं काय घडलेलं?, स्वत:च सांगितलं!
Amit Mishra Sexual Assault Case: 2015 मध्ये अमित मिश्रावर लैंगिक, शारीरिक छळ आणि गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता.
Amit Mishra Sexual Assault Case: भारतीय क्रिकेट संघाचा माजी खेळाडू अमित मिश्राची एक मुलाखत व्हायरल होत आहे. या मुलाखतीत त्याने 2015 मध्ये बंगळुरूमध्ये घडलेल्या एका प्रकरणावर भाष्य केले. 2015 मध्ये अमित मिश्रावर एका महिलेचा लैंगिक, शारीरिक छळ आणि गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी अमित मिश्राला 3 तासांच्या चौकशीनंतर सोडून दिले होते. मात्र या प्रकरणाची खूप चर्चा रंगली होती. याबाबत आता अमित मिश्राने खुलासा केला आहे.
नेमकं काय प्रकरण होतं?
2015 मध्ये त्याच्या एका महिला मैत्रिणीने अमित मिश्रावर केवळ शारीरिक आणि लैंगिक छळच नाही तर त्याच्यावर अत्याचार केल्याचा आरोप केला होता. भारतीय क्रिकेटपटूने हॉटेलच्या खोलीत तिच्यासोबत गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप महिलेने केला आहे. यावर अमित मिश्रा म्हणाला, मी त्या मुलीला 2 वर्षांपासून ओळखत होतो आणि ती माझी मैत्रीण होती. ती बंगळुरूची रहिवासी होती, पण तिला चुकीच्या लोकांसोबत पाहिल्यानंतर मी तिच्याशी बोलणे बंद केले. तिने मला वारंवार फोन करून त्रास दिला. जेव्हा मी माझ्या मित्रासोबत जेवण करून हॉटेलमध्ये परतलो, तेव्हा ती मुलगी माझ्या परवानगीशिवाय माझ्या खोलीत घुसली होती. त्या मुलीला माझ्या खोलीत पाहून मी घाबरलो. मी सर्वप्रथम मॅनेजरला फोन केला होता. जर मी त्या दिवशी मॅनेजरला फोन केला नसता, तर मला खूप काही त्रासाला सामोरे जावे लागले असते. मी मॅनेजरला सीसीटीव्ही कॅमेरे बंद करू नका असे सांगितले. तसेच मॅनेजर बोलावून त्या मुलीला बाहेर काढले.
मला फसवण्याचा प्रयत्न-
सदर मुलीने हॉटेलमध्ये कसा प्रवेश केला, याबाबतही अमित मिश्राने खुलासा केला आहे. ती मुलगी हॉटेलची सदस्य असावी किंवा हॉटेलमध्ये काम करण्यासाठी आली असावी. त्यावेळी तिने माझ्या खोलीबाबत विचारले आणि रुममध्ये प्रवेश केल्याचं अमित मिश्राने सांगितले.
अमित मिश्रा शुभमन गिलबाबत काय म्हणाला?
शुभमन गिलला कर्णधारपद देण्याबाबत तुमचे मत काय?, असा सवाल अमित मिश्राला मुलाखतीत विचारण्यात आला. यावर मला वाटत नाही की त्याला कर्णधार बनवायला हवे. मी तिथे असतो तर मी त्याला कर्णधारपद दिले नसते. मी त्याला आयपीएलमध्ये पाहिले आहे, त्याला कर्णधार कसं केलं, मला माहित नाही. त्याला कर्णधारपदाची कल्पनाही नाही, असं अमित मिश्रा म्हणाला.
संबंधित बातमी:
शुभमन गिलला कर्णधारपद कसं दिलं?, त्याला अनुभवही नाहीय; टीम इंडियाच्या माजी खेळाडूचं परखड मत