एक्स्प्लोर

Ajinkya Rahane : 40 वर्षांच्या पारस डोगराची युवा खेळाडूंना लाजवणारी कामगिरी, अजिंक्य रहाणेचा अफलातून कॅच पकडला, पाहा व्हिडीओ

Paras Dogra : मुंबईचा कॅप्टन अजिंक्य रहाणे दुसऱ्या डावात 16 धावा करुन बाद झाला. याला जम्मू काश्मीरचा कर्णधार पारस डोगरा कारणीभूत ठरला.

मुंबई :देशात रणजी ट्रॉफीचे सामने सुरु झाले आहेत. मुंबई आणि जम्मू काश्मीर यांच्यातील लढत कालपासून सुरु झाली आहे. मुंबईनं टॉस जिंकल्यानंतर पहिल्या डावात जम्मू काश्मीरच्या गोलंदाजांपुढं त्यांचा निभाव लागला नाही. त्याप्रमाणं दुसऱ्या डावात देखील मुंबईचे फलंदाज चांगली कामगिरी करु शकले नाहीत. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर यांनी चांगली सुरुवात केली मात्र त्यांना मोठी खेळी करण्यात अपयश आलं. अजिंक्य रहाणे जम्मू काश्मीरचा गोलंदाज उमर नाझीर मीर याच्या गोलंदाजीवर बाद झाला. जम्मू काश्मीरचा कॅप्टन पारस डोगरानं घेतलेल्या अफलातून कॅचमुळं अजिंक्य रहाणेला मैदानाबाहेर जावं लागलं. 

पारस डोगरानं घेतला अजिंक्य रहाणेचा अफलातून कॅच 

जम्मू काश्मीरच्या संघानं मुंबईच्या तुलनेत दमदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी, क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी यामध्ये जम्मू काश्मीरचे खेळाडू वरचढ राहिले आहेत. मुंबईचा कॅप्टन अजिंक्य रहाणे या मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला याला जम्मू काश्मीरचा कॅप्टन पारस डोगरा कारणीभूत ठरला. पारस डोगरानं हवेत उडी मारत अजिंक्य रहाणेचा कॅच घेतला. यामुळं मुंबईला मोठा धक्का बसला. 

मुंबईचा डाव ठाकूर अन् कोटियननं सावरला

मुंबईच्या पहिल्या डावात शार्दूल ठाकूरच्या कामगिरीमुळं  संघाला समाधानकारक धावा करता आल्या होत्या. मुंबईनं पहिल्या डावात 120 धावा केल्या त्यामध्ये शार्दूल ठाकूरच्या अर्धशतकाचा समावेश आहे. दुसऱ्या डावात देखील शार्दूल ठाकूर आणि तनुष कोटियननं दमदार खेळी करत डाव सावरला. शार्दूल ठाकूर आणि तनुष कोटियन या दोघांनी 57 धावांची भागिदारी केल्यानं मुंबईनं दुसऱ्या डावात समाधानकारक धावसंख्येपर्यंत मजल मारली आहे.   

जम्मू काश्मीरचा प्रभावी मारा तर मुंबईचे खेळाडू पुन्हा अपयशी 

दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांनी मुंबईला चांगली सुरुवात करुन दिली.  रोहित शर्मा 28 धावा करुन बाद झाला तर यशस्वी जयस्वालनं 26 धावा केल्या. दोघांनी मुंबईच्या संघाला चांगली सुरुवात करुन दिली मात्र मोठी खेळी करण्यात ते अपयशी ठरले. त्यानंतर अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर यांनी देखील चांगली सुरुवात केली मात्र ते मोठी खेळी करण्यात अपयशी ठरले. शिवम दुबे दुसऱ्या डावातही एकही धाव करु शकला नाही. दुसरीकडे जम्मू काश्मीरच्या गोलंदाजांनी पहिल्या डावाप्रमाणं दुसऱ्या डावातही प्रभावी मारा केला. ऑकिब नॅबी, उमर नझीर मीर आणि युधवीर सिंग यांनी प्रभावी मारा करत मुंबईला संकटात टाकलं. 

पारस डोगरानं घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ:

इतर बातम्या : 

Rohit Sharma : रोहित शर्मा आक्रमक सुरुवातीनंतर पुन्हा फसला, हिटमॅन जम्मू काश्मीरच्या जाळ्यात अडकला, मुंबईला मोठा धक्का

Rohit Sharma Ranji Trophy: रोहित शर्मा फॉर्ममध्ये परतला; विकेट घेणाऱ्या साडेसहा फुटी बोलरला धू धू धुतला, VIDEO

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Waghya Dog Controversy : रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवा, संभाजीराजे छत्रपतींची मागणी, राजेंच्या मागणीनंतर ओबीसी समाज आक्रमकTop 50 Superfast News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 March 2025 : 6 PM : ABP MajhaSanjay Raut On Kunal Kamra News : मग मलबारहिलवर बुलडोझर फिरवा, कुणाला कामराच्या ऑफिस तोडफोडीनंतर राऊतांचा संतापABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 5PM 25 March 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai : मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
मुंबईत येत्या आठवड्यात मोठ्या प्रमाणावर गोमांस येऊ शकते, भाजप आमदाराचा विधानसभेत दावा
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
ईद मुबारक... भाजपकडून 32 लाख 'सौगात ए मोदी' किटचे वाटप; रमजाननिमित्त मुस्लिम बांधवांना भेट
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, आर्थिक नुकसान टाळण्यासाठी जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
New Bank Rules : 1 एप्रिलपासून बँकांचे नियम बदलणार, थोडं दुर्लक्ष पडेल महागात, जाणून घ्या महत्त्वाचे बदल 
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात;  तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
स्पोर्ट्सबाईक झाडावर आदळून भीषण अपघात; तीन तरुणांचा जागीच मृत्यू, कुटुंबावर शोककळा
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
ओम साई राम... भीषण अपघाताचे फोटो समोर; पत्नीला ठीकठाक पाहून सोनू सूदने घेतले देवाचे नाव
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
'XL साइज कंडोम घेऊन ये..', अब्जाधीश उद्योगपतीच्या बायकोची बॉयफ्रेंडकडे मागणी; संतापलेल्या पतीची घटस्फोटाची मागणी
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
गुढी पाडव्याचा मुहूर्त ; ट्रक, ट्रॅव्हल्ससह व्यवयायिक वाहनांवर आता मराठीतच संदेश; परिवहन मंत्र्यांचे RTO ना निर्देश
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं आणि रोख रक्कम घेऊन जाता येते? यासाठी नेमके नियम कोणते? 
Rules To Carry Gold From India : भारतातून विदेशात किती सोनं घेऊन जाता येतं? यासाठी नेमके नियम कोणते? 
Embed widget