Mumbai squad for Ranji Trophy 2025 : मुंबई संघाची घोषणा! सूर्यकुमार यादव बाहेर, स्टार ऑलराउंडर झाला कर्णधार; सरफराज, शिवम दुबेसह 'या' 16 शिलेदारांना संधी
भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2025) लवकरच रंगणार आहे

Mumbai squad for Ranji Trophy 2025 : भारतीय देशांतर्गत क्रिकेटमधील सर्वात मोठी स्पर्धा असलेली रणजी ट्रॉफी (Ranji Trophy 2025) लवकरच रंगणार आहे. आगामी हंगामाची सुरुवात 15 ऑक्टोबरपासून होत आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai Cricket Association) आपल्या संघाची घोषणा केली आहे. या 16 सदस्यीय संघाचे नेतृत्व भारतीय स्टार ऑलराउंडर शार्दुल ठाकूर (Shardul Thakur) याच्याकडे सोपवण्यात आले आहे. मात्र, टीम इंडियाचा टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) याला या रणजी हंगामासाठी मुंबईच्या संघात स्थान मिळालेले नाही. मुंबईचा संघ आपल्या रणजी हंगामातील पहिला सामना 15 ते 18 ऑक्टोबरदरम्यान श्रीनगरच्या शेर-ए-कश्मीर स्टेडियमवर जम्मू-कश्मीरविरुद्ध खेळणार आहे.
मुंबई संघाची घोषणा! सूर्यकुमार यादव बाहेर
सूर्यकुमार यादव 2025-26 हंगामामध्ये मुंबईच्या रणजी ट्रॉफी संघाचा भाग होता, परंतु यावेळी त्याला वगळण्यात आले आहे. त्याला वगळण्याचे कोणतेही कारण देण्यात आलेले नाही, परंतु तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार आहे. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे असे समजते. सूर्या सध्या ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे, जिथे टीम इंडिया यजमानांविरुद्ध पाच सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे. प्रथम श्रेणी क्रिकेट विक्रमात 86 सामन्यांमध्ये त्याने 42.33 च्या सरासरीने 5758 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 14 शतके आणि 30 अर्धशतके आहेत.
स्टार ऑलराउंडर शार्दुल ठाकूर झाला कर्णधार (Shardul Thakur to lead Mumbai Team)
जम्मू आणि काश्मीरविरुद्धच्या सामन्यात शार्दुल ठाकूर मुंबई संघाचे नेतृत्व करेल. त्याच्याकडे अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, सरफराज खान आणि मुशीर खान यांचाही समावेश आहे. कार अपघातामुळे गेल्या हंगामातील बहुतेक सामने मुशीरला मुकावे लागले होते, त्यामुळे त्याच्या रणजी करंडक स्पर्धेत पुनरागमनावर सर्वांचे लक्ष असेल. आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जसाठी सलामीवीर आणि यापूर्वी भारतीय अंडर-19 संघाचे नेतृत्व करणारा आयुष म्हात्रे संघाच्या फलंदाजीलाही बळकटी देईल.
2025-26 रणजी ट्रॉफीसाठी मुंबईचा संघ (Mumbai squad for Ranji Trophy 2025) :
शार्दुल ठाकूर (कर्णधार), आयुष म्हात्रे, आकाश आनंद (यष्टीरक्षक), हार्दिक तामोरे (यष्टीरक्षक), सिद्धेश लाड, अजिंक्य रहाणे, सरफराज खान, शिवम दुबे, शम्स मुलानी, तनुष कोटियन, तुषार देशपांडे, सिल्वेस्टर डिसोझा, इरफान उमैर, मुशीर खान, अखिल हेरवाडकर, रॉयस्टन डायस.
2025-26 रणजी ट्रॉफी हंगामासाठी, मुंबईला जम्मू आणि काश्मीर, पुडुचेरी, छत्तीसगड, हिमाचल प्रदेश, हैदराबाद, राजस्थान आणि दिल्लीसह एलिट ग्रुप डी मध्ये स्थान देण्यात आले आहे.
हे ही वाचा -





















