IPL Trade News 2026 : अर्जुन तेंडुलकरला घ्या, पण आम्हाला तो पाहिजे... आयपीएल ट्रेडमध्ये मुंबई इंडियन्सची एन्ट्री; टॉप प्लेयरवर टाकला डाव
IPL 2026 Trade Window Update News Marathi : मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला मुंबई इंडियन्स (MI) ट्रेड करण्याच्या तयारीत आहे.

Arjun Tendulkar and Shardul Thakur IPL Trade : मुंबई इंडियन्स ही आयपीएल ट्रेडमध्ये सर्वाधिक सक्रिय राहणारी फ्रँचायझी मानली जाते. हार्दिक पांड्यापासून ते झहीर खान, ट्रेंट बोल्ट, क्विंटन डी कॉक, पार्थिव पटेल, दिनेश कार्तिक आणि प्रज्ञान ओझा यांसारख्या अनेक स्टार खेळाडूंना या संघाने ट्रेडद्वारे आपल्या ताफ्यात सामील करून घेतले आहे. आता आयपीएल 2026पूर्वी सध्या संजू सॅमसन आणि रवींद्र जडेजा यांच्या संभाव्य ट्रेडची सर्वाधिक चर्चा सुरू आहे. अशा पार्श्वभूमीवर आता मुंबई इंडियन्सही पुन्हा एकदा ट्रेड मार्केटमध्ये सक्रिय झाली आहे.
मुंबई इंडियन्सची शार्दुल ठाकूरवर नजर
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याला मुंबई इंडियन्स (MI) ट्रेड करण्याच्या तयारीत आहे. मुंबईचा प्लॅन असा आहे की, अर्जुनला लखनऊ सुपर जायंट्सकडे (LSG) पाठवून शार्दुल ठाकूरला आपल्या संघात सामील करायचे आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, लखनऊ सुपर जायंट्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शार्दुल ठाकूर आणि अर्जुन तेंडुलकर यांच्या ट्रेडसंदर्भात चर्चा सुरु आहे. ही डील थोडी वेगळी आहे, म्हणजे खेळाडूंची थेट अदलाबदल न होता, ही एकप्रकारची ऑल-कॅश ट्रान्सफर डील असू शकते.
बीसीसीआय देणार अधिकृत माहिती
आयपीएलच्या नियमानुसार कोणत्याही ट्रेड डीलची अधिकृत घोषणा भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) करते. त्यामुळे दोन्ही फ्रँचायझी सध्या मौन बाळगून आहेत. मुंबई क्रिकेट वर्तुळातील सूत्रांनी सांगितले आहे की, हा एक्स्चेंज स्वॅप लवकरच जाहीर होऊ शकतो. त्याचबरोबर, 15 नोव्हेंबर रोजी रिटेन आणि रिलीज खेळाडूंची यादी देखील प्रसिद्ध होणार आहे.
शार्दुल ठाकूरचा लखनऊ सुपर जायंट्समधील प्रवास
शार्दुल ठाकूर गेल्या वर्षी झालेल्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड राहिला होता. मात्र, आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी लखनऊ सुपर जायंट्सने त्याला बेस प्राइस 2 कोटी रुपयांत रिप्लेसमेंट खेळाडू म्हणून घेतले. त्याने लखनऊसाठी 10 सामने खेळले, ज्यात केवळ 18 धावा केल्या, पण 13 विकेट्स घेतल्या. विशेष म्हणजे त्याने नवीन चेंडूसह प्रभावी गोलंदाजी केली आणि संघाला सुरुवातीला विकेट्स मिळवून दिल्या.
आयपीएलमधील अर्जुन तेंडुलकरची कामगिरी
अर्जुन तेंडुलकर मागील काही हंगामांपासून मुंबई इंडियन्सच्या संघाचा भाग आहे. गेल्या दोन लिलावांमध्ये त्याला बेस प्राइस 20 लाख रुपये मध्ये घेतले गेले. 26 वर्षीय डावखुरा ऑलराउंडरला मागील हंगामात एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. आतापर्यंत त्याने एकूण 5 सामने खेळले असून 13 धावा आणि 3 विकेट्स घेतल्या आहेत.
मोठी संधी की आणखी एक आव्हान?
या ट्रेडची सुरुवात कोणी केली हे स्पष्ट नाही, पण दोन्ही फ्रँचायझी यावर गंभीर चर्चा करत आहेत. काही वर्षांपूर्वी अर्जुनने मुंबईचा संघ सोडून गोवा संघात प्रवेश केला होता आणि तेव्हापासून त्याने 21 प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. मात्र, मुंबईसारख्या बलाढ्य संघात प्लेइंग इलेव्हनमध्ये जागा मिळवणे हे त्याच्यासाठी सदैव एक मोठे आव्हान राहिले आहे. थोडक्यात सांगायचे तर, जर ही डील फायनल झाली, तर अर्जुन तेंडुलकरसाठी ही एक नवीन सुरुवात ठरू शकतो आणि मुंबई इंडियन्सला एक अनुभवी ऑलराउंडर शार्दुल ठाकूर परत मिळू शकतो.
हे ही वाचा -





















