एक्स्प्लोर

MCA Election: एमसीएच्या अध्यक्षपदाचा तिढा सुटला! पवार-शेलार पॅनलकडून अमोल काळेंच्या नावाची घोषणा, संदीप पाटील विरुद्ध लढणार

Mumbai Cricket Association Election 2022: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अध्यक्षपदाचा तिढा सुटला आहे.  

Mumbai Cricket Association Election 2022: मुंबई क्रिकेट असोसिएशन (MCA) अध्यक्षपदाचा तिढा सुटला आहे.  शदर पवार (Sharad Pawar)- आशिष शेलार (Ashish Shelar) पॅनलकडून अमोल काळेंच्या (Amol Kale) नावाची घोषणा करण्यात आलीय. अध्यक्षपदासाठी अमोल काळे विरुद्ध संदीप पाटील (Sandeep Patil) अशी लढत पाहायला मिळणार आहे. 

अमोल काळे संदीप पाटील विरुद्ध लढणार
एमसीए कार्यकारिणीच्या निवडणुकीत पवार-शेलार यांच्या संयुक्त पॅनेलकडून अध्यक्षपदाची निवडणूक कोण लढवणार? याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात होते. एमसीएच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीबाबत वार आणि शेलार मिळून काय निर्णय घेतात? याकडं संपूर्ण महराष्ट्राचं लागलं होतं. अखेर पवार-शेलार यांच्या पॅनेलकडून अमोल काळेंच्या नावाची घोषणा करण्यात आलीय. आशिष शेलार या निवडणुकीतून माघार घेणार असल्याचं जवळपास निश्चितचं मानलं जातं होतं. कारण शेलार बीसीसीआयच्या खजिनदारपदावर बिनविरोध निवडून येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अमोल काळे आणि संजय नाईक या दोघांकडून अध्यक्षपदासह विविध पदांसाठी अर्ज करण्यात आला होता.

आशिष शेलार बीसीसीआय निवडणुकीच्या रिंगणात
भाजप नेते आशिष शेलार हे आता बीसीसीआय निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. खजिनदार पदासाठी शेलारांनी अर्ज भरला असल्याचं बीसीसीआयचे (BCCI) उपाध्यक्ष राजीव शुक्ला (Rajiv Shukla) यांनी सांगतिलं आहे.

रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता
भारताच्या 1983 च्या एकदिवसीय विश्वचषक विजेत्या संघाचे सदस्य रॉजर बिन्नी यांनी मंगळवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केलाय. महत्वाचं म्हणजे, रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होण्याची शक्यता असल्याची माहिती बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी दिली. दरम्यन, 18 ऑक्टोबर रोजी मुंबईत होणाऱ्या बोर्डाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत रॉजर बिन्नी सौरव गांगुलींची (Sourav Ganguly) जागा घेतील, हे जवळपास निश्चित मानलं जातंय. 

मुंबई क्रिकेट असोसिएशनबाबत महत्वाची माहिती
मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएला पूर्वी बॉम्बे क्रिकेट असोसिएशन म्हणून ओळखलं जायचं. ही मुंबई आणि त्याच्या आसपासच्या ठाणे आणि नवी मुंबईसारख्या क्रिकेटची प्रशासकीय संस्था आहे. एमसीएच्या कार्यक्षेत्रात पश्चिम उपनगरामधील डहाणू, मध्य उपनगरातील बदलापूर आणि खारघर तसेच नवी मुंबईचा समावेश आहे.

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
Advertisement
metaverse

व्हिडीओ

CM Eknath Shinde, Devendra Fadnavs आणि अजित पवार यांची 'वर्षा' बंंगल्यावर बैठकABP Majha Marathi News Headlines 07 AM TOP Headlines 26 June 2024Majha Gaon Majha Jilha : गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 07 AM: 25 June 2024TOP 100 Headlines : सकाळच्या 100 बातम्यांचा वेगवान आढावा : 25 June 2024 : 07 AM :  ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivaji Maharaj: महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
महाराष्ट्रात आजघडीला शिवाजी महाराजांची निव्वळ उथळ भक्ती, राजकारणापुरता शिवरायांचा वापर: विजय देशमुख
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
कळवा-मुंब्रा विधानसभेत नजीब मुल्ला विरुद्ध जितेंद्र आव्हाड? निवडणुकीआधीच आरोप-प्रत्यारोपामुळे राजकीय वातावरण तापलं
Adult Web Series On OTT : फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
फक्त 'मस्तराम'च नाही तर 'या' वेब सीरिजमध्येही हॉट सीन्सचा भडिमार, कुटुंबासह चुकूनही पाहू नका
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
कोकण रेल्वेत तोंडावर चहा फेकला, 'जय श्री राम'च्या घोषणा देण्यास सांगितलं, तक्रार मागे घेण्यासाठी भाजप आमदाराचा दबाव; मुस्लिम कुटुंबाची हायकोर्टात धाव
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
मेंदूला पोषण, आठवणीला जागरण; रोहिणी खडसेंनी मंत्री चंद्रकात पाटलांना पाठवले बदाम, व्हिडिओ व्हायरल
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
लोकसभा निवडणुकांवेळी शरद पवारांचा फोन; नाना पाटेकरांनी निकालानंतरच उलगडला किस्सा
Amol Mitkari : प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
प्रत्येकाला जर 100 जागा हव्या असतील तर स्वबळावर लढावं लागेल, अमोल मिटकरींचं महत्वपूर्ण वक्तव्य
Pune : पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
पुण्यात ड्रग्ज घेणाऱ्या दोन्ही तरूणांची ओळख पटली, मुंबईचा तरूण आर्किटेक्ट तर दुसरा सॉफ्टवेअर इंजिनिअर
Embed widget