एक्स्प्लोर

रांचीमध्ये धोनीची सेंद्रीय शेती, ट्रॅक्टर चालवतानाचा व्हिडीओ व्हायरल

कोरोना व्हायरसमुळे अनेक खेळांच्या आयोजनाला ब्रेक लागला आहेत. क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू आपापल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. महेंद्रसिंह धोनी तर शेती करताना दिसत आहे.

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये धोनी शेतात ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. सोबतच तो ऑरगॅनिक अर्थात सेंद्रीय शेती करत असल्याचं म्हटलं जात आहे.

कोरोना व्हायरसमुळे क्रिकेटसह इतर खेळांचं आयोजन सध्या थांबलं आहे. आयपीएल स्पर्धाही अनिश्चितकाळासाठी स्थगित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत क्रिकेट विश्वातील दिग्गज खेळाडू आपापल्या कुटुंबासोबत वेळ घालवत आहेत. महेंद्रसिंह धोनी तर शेती करताना दिसत आहे.

View this post on Instagram
 
Exclusive Video Of Mahi Bhaiya Enjoying Doing Organic Farming !! ❤

A post shared by MS Dhoni Fans Club (@dhoni.bhakt) on

फार्म हाऊसमध्ये धोनीची शेती आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्ज या संघाचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी लॉकडाऊनपासूनच रांचीमध्ये आपल्या कुटुंबासोबत आहे. त्याने काही दिवसांपूर्वीच फार्म हाऊसमध्ये शेती करण्यासाठी एक ट्रॅक्टर खरेदी केला होता. आता याच ट्रॅक्टरचा वापर तो सेंद्रीय शेतीसाठी करत आहे.

आठ लाखांचा ट्रॅक्टर इन्स्टाग्रामवर 'धोनी भक्त' नावाच्या अकाऊंट हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये धोनी एकटा ट्रॅक्टर चालवताना दिसत आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, "सेंद्रीय शेतीची मजा लुटताना माही भाईचा एक्स्लूझिव्ह व्हिडीओ." धोनीने महिंद्राचा स्वराज 963 एफई ट्रॅक्टर खरेदा केली होता, याची किंमत आठ लाखांच्या घरात आहे.

सोशल मीडियावर धोनीच्या हा व्हिडीओला फारच पसंती मिळत आहे आणि चाहते सातत्याने कमेंट्स करत आहेत. याशिवाय धोन बहुतांश वेळा फार्म हाऊसमध्ये मुलगी झिवासोबत बाईक रायडिंगही करतो.

View this post on Instagram
 
❤️

A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 08 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMajha Vitthal Majhi Wari EP 01 : माझा विठ्ठल माझी वारी 2024 ABP MajhaABP Majha Headlines : 07 PM 28 जून 2024 Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Budget  2024 : बजेटवरून सरकार-विरोधक आमने-सामने! ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
NEET-UG Paper Leak : नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
नीट पेपर लीक प्रकरणी मोठी अपडेट, हजारीबागच्या प्राचार्य-उपप्राचार्याला सीबीआयने ठोकल्या बेड्या
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
आता कल्ला होणारच ! तो पण ‘रितेश देशमुख’च्या स्टाईलने... BIGG BOSS मराठीचा नवा प्रोमो
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
कर्कश हॉर्न अन् सायलेन्सरवर चालवला बुलडोझर; मुंबई वाहतूक पोलिसांनी धडक मोहीम
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
पुणे पोलिसांचा सिनेस्टाईल पाठलाग; दरोड्याच्या प्रयत्नातील दोघांना पकडलं, तिघे फरार
और एक फायनल...एक कप की ओर
और एक फायनल...एक कप की ओर
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
आमदारकी जाताच शिंदेंच्या नेत्यानं घेतली ठाकरेंची भेट; दानवेंच्या केबिनमध्ये 'घरवापसीची पे चर्चा'
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
INDW vs SAW : शेफाली वर्माचा झंझावत, सर्वात वेगवान द्विशतक ठोकले, वीरेंद्र सेहवाग स्टाईलने केला पराक्रम 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
IND vs SA  : भारतासमोर दक्षिण आफ्रिकेचं आव्हान, कुणाची ताकद जास्त, पाहा हेड टू हेड रेकॉर्ड 
Embed widget