एक्स्प्लोर

अॅशेस मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला धक्का; टिम पेनने सोडले कर्णधारपद, 'Sexting'प्रकरण भोवले

Tim Paine टिम पेनने ऑस्ट्रेलियन कसोटी क्रिकेट संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. अॅशेस मालिका तोंडावर आली असताना टिम पेनने हा निर्णय जाहीर केला आहे.

Tim Paine Quits As Australia Test Captain  प्रतिष्ठेच्या अॅशेस मालिकेआधीच ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाला मोठा धक्का बसला आहे. कसोटी संघाचा कर्णधार टिम पेन याने कर्णधारपदाचा राजीनामा दिला आहे. एका महिलेला अश्लील फोटो आणि मेसेज पाठवले असल्याचा आरोप टिम पेन याच्यावर लावण्यात आला होता. या आरोपाचे गांभीर्य लक्षात घेऊन ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने चौकशी सुरू केली. त्यानंतर आता टिम पेनने शुक्रवारी आपल्या कर्णधारपदाचा राजीनामा दिला. उपकर्णधार पॅट कमिन्स कडे आता अॅशेस मालिकेत संघाची धुरा सोपवली जाण्याची शक्यता आहे. 

टिम पेन यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपाचे प्रकरण वर्ष 2017 मधील आहे. या दरम्यानच टिम पेनला सात वर्षानंतर कसोटी संघात पुनरागमन करण्याची संधी मिळाली होती. त्यावेळी टिम पेनला क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट टास्मानियाने क्लिन चीट दिली होती. 

टिम पेनने पत्रकार परिषदेत म्हटले की, हे प्रकरण संपले असावे असे मला वाटले. त्यामुळे माझे संपूर्ण लक्ष या संघाच्या बांधणीवर होते. मात्र, माझे खासगी मेसेज हे सार्वजनिक झाले असल्याचे मला नुकतेच समजले आहे. वर्ष 2017 मध्ये माझ्याकडून झालेल्या कृत्यामुळे  ऑस्ट्रेलियाच्या कर्णधारपदावर राहण्यासाठी पात्र नाही असे टिम पेनने म्हटले. मी पत्नी, माझे कुटुंबीय आणि अन्य जणांना दु:ख दिल्याबद्दल मी माफी मागतो. या खेळाच्या प्रतिष्ठेला धक्का पोहचवल्याबद्दलही माफी मागत असल्याचे त्यांनी म्हटले.

येत्या काही दिवसांमध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दरम्यान प्रतिष्ठेची समजली जाणारी अॅशेस मालिका सुरू होणार आहे. पहिली कसोटी 8 डिसेंबर रोजी ब्रिस्बेन येथे खेळवण्यात येणार आहे. कर्णधारपदाचा राजीनामा दिला असला तरी पेन ऑस्ट्रेलियन संघात कायम असणार आहे. क्रिकेट बोर्डाने टिम पेनचा राजीनामा स्वीकारला आहे. 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने काय म्हटले?

क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे प्रमुख रिचर्ड फ्रेडेन्स्टेन यांनी म्हटले की, टिम पेन यांचा हा वैयक्तिक निर्णय आहे. काही वर्षांपूर्वी या प्रकरणात पेन याला क्लिन चीट देण्यात आली होती. मात्र त्याच्या निर्णयाचा सन्मान करत असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे. 

टिम पेन याला 2018 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या संघाचे कर्णधारपद सोपवण्यात आले होते. चेंडूशी छेडछाड केल्याचे प्रकरण समोर आल्यानंतर स्टिव्ह स्मिथच्या जागी त्याची कर्णधारपदी वर्णी लावण्यात आली. सन 2019 मध्ये झालेल्या अॅशेज मालिकेतही टिम पेनने कर्णधारपदाची धुरा सांभाळली. टिम पेनने एकूण 23 कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाचे नेतृत्व केले. यामध्ये 11 सामन्यांमध्ये विजय आणि 8 सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. तर, चार सामने अनिर्णित राहिले. 

संबंधित वृत्त:

AB de Villiers Retirement : मिस्टर 360 डिग्री... साऊथ आफ्रिकेचा धडाकेबाज फलंदाज एबी डिविलियर्सची निवृत्तीची घोषणा

टी-20 विश्वचषकात मैदान गाजवणारा मॅथ्यू वेड क्रिकेटला करणार अलविदा; 'या' स्पर्धेनंतर घेणार संन्यास


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha

महत्त्वाच्या बातम्या

Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : यशस्वी जैस्वाल श्रीलंकेच्या 7 खेळाडूंचा घोळक्यात घुसला, हेल्मेटने टक्कर दिली; गंभीरही बघत बसला, 45 सेकंदाचा राड्याचा VIDEO
यशस्वी जैस्वाल श्रीलंकेच्या 7 खेळाडूंचा घोळक्यात घुसला, हेल्मेटने टक्कर दिली; गंभीरही बघत बसला, 45 सेकंदाचा राड्याचा VIDEO
IND vs SL 2nd TEST Day-1 LIVE : पहिले राहुल, मग जैस्वाल... श्रीलंकेने भारताला दिले दोन झटके; लंचपर्यंत 88 धावांवर 2 विकेट, गिल-पडिक्कलवर मोठी जबाबदारी
पहिले राहुल, मग जैस्वाल... श्रीलंकेने भारताला दिले दोन झटके; लंचपर्यंत 88 धावांवर 2 विकेट, गिल-पडिक्कलवर मोठी जबाबदारी
Ind vs SL 2nd Test Yashasvi Jaiswal : आऊट देताच जैस्वालने बाहेरचा रस्ता धरला, श्रीलंकेच्या खेळाडूने डिवचताच पुन्हा माघारी आला, हेल्मेटने टक्कर दिली, भारत-श्रीलंकेच्या सामन्यात राडा, VIDEO
आऊट देताच जैस्वालने बाहेरचा रस्ता धरला, श्रीलंकेच्या खेळाडूने डिवचताच पुन्हा माघारी आला, हेल्मेटने टक्कर दिली, भारत-श्रीलंकेच्या सामन्यात राडा, VIDEO
AUS beat BAN 2nd Test : 11 तास, 30 विकेट्स अन् एका डावाने विजय; ऑस्ट्रेलियाने दीड दिवसात कसोटी जिंकली, बांगलादेशची दाणादाण, स्टार्कच्या 10 विकेट्स
11 तास, 30 विकेट्स अन् एका डावाने विजय; ऑस्ट्रेलियाने दीड दिवसात कसोटी जिंकली, बांगलादेशची दाणादाण, स्टार्कच्या 10 विकेट्स

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Video: 'पेपरफुटीत ज्यांचं नावं आलं ते गुजरातला फरार झालेत, तुम्हाला स्क्रीनशॉटसह पुरावा देतो..' शरयूनं बेधडक राहुल गांधींना MPSCच्या विद्यार्थ्यांच्या व्यथा सांगितल्या
Rohit Pawar on PAs Girl Death: पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
पीएच्या अल्पवयीन मुलीचा संशयास्पद मृत्यू; रोहित पवारांनी घेतली पोलिसांची अन् डॉक्टरांची भेट; घटनेबाबत माहिती देताना म्हणाले....
Kolhapur Crime: चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
चार वर्षाच्या लेकीला अन् दीड वर्षाच्या चिमुरड्या लेकाला संपवून आईनं स्वत:च्या गळ्याला दोरी लावली; कोल्हापुरातील घटनेनं हळहळ
PM Modi :'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'एका नवीन कालचक्राची सुरुवात', पंतप्रधान मोदींकडून भारताच्या अंतराळ प्रवासाचे कौतुक; राष्ट्रीय अंतराळ दिनानिमित्त विशेष व्हिडीओ शेअर करत दिल्या शुभेच्छा!
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
'भ्रष्टाचार आणि अंमली पदार्थांसाठी सिंगापूरसारखा कायदा करून फासावर लटकवा..' देशातील अब्जाधीश उद्योगपतीची तामिळ सीएम विजय यांच्याकडे थेट मागणी, 5 पर्याय सांगितले
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
गेल्या 10 वर्षात केंद्र सरकारमधील रिक्त पदे दुप्पटीवर, सरकारी कंपन्यांमधील जवळपास निम्मे कर्मचारी कंत्राटी, रेल्वेतील रिक्त जागा शुन्यावरून 16 टक्क्यांवर, रेल्वे - संरक्षण क्षेत्रात 5 लाखांवर पदे रिक्त
Baramati News: रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
रोहित पवारांच्या पीएच्या मुलीचा रहस्यमय मृत्यू; आईसोबत भांडण झाल्यानंतर घरातून बाहेर पडली अन्...
Chhatrapati Sambhajinagar Boy Jumps Down From Khavdya Mountain: गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
गौण खनिज आणि 150 कोटींचा दंड; छत्रपती संभाजीनगरमधील खवड्या डोंगराबाबत धक्कादायक माहिती
Embed widget