Prashant Veer CSK IPL 2026 : कॅप्टन कूल समोर प्रशांत वीर सुसाट! 14 कोटींच्या खेळाडूने नेट्समध्ये नेमकं काय केलं?, MS धोनी बघतच राहिला, Video
MS Dhoni applauds Prashant Veer practice session IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीग 2026 चा हंगाम आतापर्यंतचा सर्वात संस्मरणीय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

MS Dhoni applauds Prashant Veer practice session IPL 2026 : इंडियन प्रीमियर लीग 2026 चा हंगाम आतापर्यंतचा सर्वात संस्मरणीय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यामागचं मुख्य कारण म्हणजे महेंद्र सिंग धोनी (MS Dhoni). अनेक जाणकारांच्या मते, हा त्याचा आयपीएलमधील अखेरचा हंगाम असू शकतो. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच धोनी नेट्समध्ये तरुण खेळाडूंना मार्गदर्शन करताना दिसत आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्सच्या नेट्समधील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये धोनीने युवा फलंदाज प्रशांत वीरच्या (Prashant Veer) खेळीवर दिलेली प्रतिक्रिया विशेष लक्षवेधी ठरली आहे.
प्रशांत वीरने वेधून घेतले लक्ष
नेट्समध्ये प्रशांत वीरने अप्रतिम फटकेबाजी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आयपीएल 2026 साठी त्याच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. चेन्नईने मिनी ऑक्शनमध्ये तब्बल 14.2 कोटी रुपयांना त्याची खरेदी केली आहे. विशेष म्हणजे, धोनी सहजासहजी कोणाची स्तुती करत नाहीत, त्यामुळे त्याच्या तोंडून निघालेलं एक कौतुकाचं शब्दही ड्रेसिंग रूममध्ये मोठं महत्त्वाचं मानलं जातं.
Prasanth : 🏏💥
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 21, 2026
MSD : 🗣️ SHOTTT!
The reaction from behind the stumps!#WhistlePodu #Yellove pic.twitter.com/hCKuCp9TaM
MS धोनीने केलं कौतुक
प्रॅक्टिस सेशनमधील त्या क्लिपमध्ये वीर नेट्समध्ये फलंदाजी करताना दिसतो, तर धोनी त्याच्या मागे उभे राहून त्याचं बारकाईने निरीक्षण करत आहेत. वीरने ऑफ साइडला सुंदर फटका मारताच धोनीच्या तोंडून “शॉट्ट” असा शब्द बाहेर पडतो. त्यानंतर त्याने खेळलेल्या स्कूप शॉटवर धोनी चार धावांचा इशारा देतात. लगेचच आलेल्या शानदार स्ट्रेट ड्राइव्हवरही धोनी पुन्हा एकदा “शॉट्ट” असं म्हणत त्याचं कौतुक करतो.
कॅम्पमधील अनेक युवा खेळाडू सांगतात की, धोनीचं एखादं छोटसं मार्गदर्शनही त्यांच्या आत्मविश्वासात मोठी भर घालतं. त्यामुळेच प्रशांत वीरच्या प्रत्येक नेट सेशनकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. त्याची ऑक्शन किंमत आणि कामगिरी या दोन्ही गोष्टी चेन्नई सुपर किंग्ससाठी अत्यंत महत्त्वाच्या ठरत आहेत.
चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ - (IPL 2026 CSK Full Squad)
ऋतुराज गायकवाड (कर्णधार), आयुष म्हात्रे, एमएस धोनी, संजू सॅमसन, डेवाल्ड ब्रेविस, उर्विल पटेल, शिवम दुबे, जेमी ओव्हरटन, रामकृष्ण घोष, नूर अहमद, खलील अहमद, अंशुल कंबोज, गुरजपनीत सिंग, श्रेयस गोपाल, मुकेश चौधरी, नॅशनल चौधरी, प्रवीण चौधरी, प्रशांत वीर, ए. कार्तिक शर्मा, मॅथ्यू शॉर्ट, अमन खान, सरफराज खान, मॅट हेन्री, राहुल चहर, जॅक फॉल्क्स.
हे ही वाचा -




















