एक्स्प्लोर

IND vs AUS, Nagpur Test : नागपुर कसोटीची उत्सुकता शिगेला, 40 हजारांहून तिकिटांची विक्री

IND vs AUS : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी मालिकेला उद्यापासून (9 फेब्रुवारी) सुरुवात होत असून पहिला सामना नागपुरात खेळवला जात आहे.

Border Gavaskar Trophy :  भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना नागपुरात होणार आहे. नागपुरात गुरुवार म्हणजेच 9 फेब्रुवारीपासून दोन्ही संघांमधील हा सामना सुरू होणार आहे. या WTC गुणतालिकेच्या दृष्टीने महत्त्वाच्या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. विशेष म्हणजे पहिल्या कसोटी सामन्यासाठी चाहत्यांमध्येही उत्साह कमालीचा आहे. नागपूर कसोटीसाठी आतापर्यंत सुमारे 40 हजार तिकिटांची विक्री झाली आहे, यावरुन अंदाज लावता येईल की क्रिकेटप्रेमींमध्ये किती मोठ्या प्रमाणात उत्साह आहे.

पहिला कसोटी सामना नागपुरात रंगणार

भारत-ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेसाठी चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात खेळवला जाणार आहे. तर मालिकेतील दुसरा कसोटी सामना 17  फेब्रुवारीपासून दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. पण त्यापूर्वी दोन्ही संघांना पहिला कसोटी सामना जिंकून मालिकेत आघाडी घ्यायची आहे. भारतीय संघ यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतशिवाय मैदानात उतरणार आहे. त्याचवेळी ऑस्ट्रेलियन संघात जोश हेडलवूड आणि मिचेल स्टार्कसारखे नामवंत वेगवान गोलंदाज नसतील. याशिवाय अष्टपैलू कॅमेरून ग्रीनचे खेळणे संशयास्पद मानले जात आहे.

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा काय म्हणाला?

सामन्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, "संघनिवड ही एक समस्या आहे आणि कारण सध्या असं दिसून येतं आहेकी बरेच खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. सांघिक दृष्टिकोनातून हे खूप महत्त्वाचं आहे, आम्हाला प्रत्येक खेळपट्टी पाहावी लागेल आणि सर्वोत्तम अंतिम 11 निवडावे लागेल. आम्ही यापूर्वीही असंच करत आलो आहोत आणि भविष्यातही असच करू.

ईशान कि केएस भरत कोणाला मिळणार संधी?

नागपूर कसोटीसाठी टीम इंडिया प्लेईंग इलेव्हनमध्ये केएस भरतचा समावेश करू शकते. तो सहाव्या किंवा सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येऊ शकतो. आंध्र प्रदेशच्या या खेळाडूने देशांतर्गत सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने प्रथम श्रेणी सामन्यांच्या 135 डावांमध्ये 4707 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने 9 शतकं आणि 27 अर्धशतकं केली आहेत. त्याने लिस्ट ए च्या 64 सामन्यात 1950 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, ईशान किशनला गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करता आली नाही, त्यामुळे त्याच्या प्लेईंग इलेव्हनमध्ये सामील होण्याची शक्यता कमी आहे.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma Retirement: रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
रोहित शर्माच नव्हे, टीम इंडियाचे 'हे' 6 दिग्गजही घेऊ शकतात निवृत्ती; कधीही होऊ शकते मोठी घोषणा
BCCI On Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
रोहित शर्मा 2027 च्या वर्ल्डकपआधीच वनडेमधून निवृत्ती घेणार? काय खरं, काय खोटं? BCCI नं स्पष्टच सांगितलं...
Rohit Sharma Retirement: 'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
'रोहित, विराटची गरज नाही, असं भासवण्यासाठी प्रयत्न सुरूयेत?'; आर. अश्विननं गंभीर-अगरकरांना सुनावलं
Sir Garry Sobers : क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!
क्रिकेट जगताला मोठा धक्का; महान अष्टपैलू सर गॅरी सोबर्स यांचं निधन, 89 व्या वर्षी घेतला अंतिम श्वास!

व्हिडीओ

SIR Form Pune Update : भाजप नगरसेविकेच्या कार्यालयात भरून घेतले जातायत फॉर्म
Mahesh Kale On Majha Katta : विठ्ठलाशी नातं, वडिलांची शिकवण, कधीही न ऐकलेले महेश काळे 'माझा' कट्ट्यावर
NEET Exam Paper Scam : NEET फेरपरीक्षेच्या निकालावर प्रश्नचिन्ह! | ABP Majha Special Report
Ramdas Kadam On Sunil Tatkare : तटकरे माझ्या घराला गटार म्हणता, गटार काय ते दाखवेन : रामदास कदम
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parliament Monsoon Session: पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
पावसाळी अधिवेशनापूर्वी सर्वपक्षीय बैठक; विरोधी खासदारांचा अवघ्या 15 मिनिटांतच सभात्याग; मान्यता नसतानाही टीएमसीच्या फुटीर खासदारांच्या उपस्थितीचा निषेध
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
'सफदरजंग सरकारी रुग्णालयावर विश्वास नाही, जर सोनम यांना काहीही झालं, तर...' पत्नी गीतांजली यांचा अत्यंत गंभीर आरोप, तिकडं सोनम वांगचुक यांचाही उद्याच्या आंदोलनासाठी अत्यंत भावूक संदेश
Gold Silver Rates: सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
सोन्या- चांदीच्या घसरणीचा ट्रेंड कायम! आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील? वाचा ताजे दर
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
जम्मूतील पूंछ आणि किश्तवारमध्ये साखर झोपेतच ढगफुटीचा थरकाप, 8 जणांचा जीव गेला, सहा बेपत्ता, 250 वाहने धडाधड वाहून गेली; केदारनाथ मार्गावर भूस्खलन, 14 राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा
PV Sindhu : पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर करेक्ट कार्यक्रम
पीव्ही. सिंधूने इतिहास रचला; जपान ओपन जिंकणारी ठरली पहिली भारतीय महिला; बलाढ्य प्रतिस्पर्ध्याच्या घरच्याच मैदानावर चार वर्षांनंतर करेक्ट कार्यक्रम
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
व्हॅन ड्रायव्हरसोबत लफडं, सात वर्षापूर्वी लव्ह मॅरेज केलेल्या बायकोनं स्कूल मालक नवऱ्याच्या दुधात झोपेच्या गोळ्या घातल्या; मध्यरात्री प्रियकर आणि गारुड्याला बोलावून बेडवर मण्यार साप सोडून ठार मारलं
Beed Crime: 'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
'पायावर नाही... मुंडक्यावर मारा'; बीडमध्ये नगरसेवकाने जुन्या भांडणाचा राग काढला, तरुणावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने वार
Dharashiv FDA Raid News: धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
धाराशिवमध्ये शालेय पोषण आहारात आढळल्या अळ्या; FDA चे अधिकारी शाळेत पोहोचले अन्...
Embed widget