(Source: Poll of Polls)
Ind vs Eng 5th Test : बुमराह गैरहजर, पण प्रसिद्ध-सिराजच्या जोडीसमोर इंग्रज नतमस्तक; फक्त 72 धावांत गमावल्या 6 विकेट्स, मिळाली इतक्या धावांची आघाडी
ओव्हल कसोटीत जसप्रीत बुमराह भारतीय संघात नाही, पण दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या जोडीसमोर इंग्रज नतमस्तक झाले.

England vs India 5th Test Update : ओव्हल कसोटीत जसप्रीत बुमराह भारतीय संघात नाही, पण दुसऱ्या दिवशी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णाच्या जोडीसमोर इंग्रज नतमस्तक झाले. इंग्लंडने पहिल्या डावात 247 धावा केल्या आणि टीम इंडियावर 23 धावांची आघाडी घेतली. भारताने पहिल्या डावात 224 धावा केल्या होत्या. टीम इंडियासाठी सर्वाधिक यश सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना मिळाले, दोघांनी प्रत्येकी चार-चार विकेट्स घेतल्या. इंग्लंडकडून झॅक क्रॉली (64) आणि हॅरी ब्रूक (53) यांनी अर्धशतके झळकावली.
Innings Break!
— BCCI (@BCCI) August 1, 2025
Impressive bowling display from #TeamIndia! 🙌
4⃣ wickets each for Prasidh Krishna and Mohammed Siraj
1⃣ wicket for Akash Deep
Scorecard ▶️ https://t.co/Tc2xpWMCJ6#ENGvIND | @prasidh43 | @mdsirajofficial pic.twitter.com/Xk7N26i5Wj
दुसऱ्या दिवशीचा पहिला सत्र इंग्लंडच्या नावावर राहिले. टीम इंडियाने 204/6 या स्कोरवरून दुसरा दिवस सुरू केला, परंतु अवघ्या 34 चेंडूत उरलेली चार गडी गमावून फक्त 20 धावांची भर घालू शकली.
बेन डकेट आणि झॅक क्रॉलीची तूफान सुरुवात
इंग्लंडने जबरदस्त सुरुवात केली. बेन डकेट आणि झॅक क्रॉलीने केवळ 12.5 षटकांत 92 धावा जोडल्या. डकेट 43 धावांवर बाद झाला आणि तिथून इंग्लंडचा घसरता डाव सुरू झाला. झॅक क्रॉलीने अर्धशतक पूर्ण केलं, पण तोही 64 धावांवर बाद झाला.
A much needed breakthrough for India 🔥
— Sony Sports Network (@SonySportsNetwk) August 1, 2025
And a cheeky send-off for Ben Duckett 😜#SonySportsNetwork #ENGvIND #NayaIndia #DhaakadIndia #TeamIndia #ExtraaaInnings pic.twitter.com/9YaTjcEYOn
कर्णधार ओली पोपने 22 धावा केल्या. जो रूटला सिराजने 29 धावांवर एलबीडब्ल्यू केलं. हॅरी ब्रूक शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून होता, पण त्यालाही सिराजने क्लीन बोल्ड केलं. विशेष म्हणजे क्रिस वोक्स दुखापतीमुळे फलंदाजीसाठी येऊ शकला नाही. आयसीसीच्या नियमानुसार सबस्टिट्यूट खेळाडू फक्त क्षेत्ररक्षण आणि यष्टीरक्षण करू शकतो, पण फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकत नाही.
A big wicket for #TeamIndia! 👏 👏
— BCCI (@BCCI) August 1, 2025
Mohammed Siraj strikes to dismiss Joe Root 👌 👌
Updates ▶️ https://t.co/Tc2xpWMCJ6#ENGvIND | @mdsirajofficial pic.twitter.com/XyAB2nfUTU
एक वेळ अशी होती की इंग्लंडचा स्कोर 3 बाद 175 होता आणि मोठ्या धावसंख्येची अपेक्षा होती. पण त्यानंतर 6 गडी केवळ 72 धावांत गमावले. भारतासाठी मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा यांनी प्रत्येकी 4 बळी घेतले, तर आकाशदीपने 1 विकेट घेतली.
हे ही वाचा -
















