Mohammed Shami News : गंभीरने संघात घेतलं नाही, पण मोहम्मद शम्मीला कमबॅकची दुसरी संधी मिळाली, आता या टूर्नामेंटमध्ये माजवणार कहर
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सध्या सातत्याने चर्चेत आहे.

Bengal announces squad for Ranji Trophy 2025-26 : भारतीय क्रिकेट संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी (Mohammed Shami) सध्या सातत्याने चर्चेत आहे. वेस्ट इंडीजविरुद्धच्या (India vs West Indies) मालिकेत संधी न मिळाल्यानंतर आणि ऑस्ट्रेलिया दौर्यासाठी जाहीर झालेल्या वनडे संघातूनही त्यांचे नाव वगळण्यात आले, त्यानंतर त्यांच्या करिअरबद्दल अनेक प्रश्न उपस्थित होत होते. मात्र आता शमी पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन करण्यास सज्ज आहेत. 35 वर्षीय हा अनुभवी वेगवान गोलंदाज तब्बल 28 महिन्यांपासून कसोटी क्रिकेटपासून दूर होता, पण आता तो पुन्हा लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये परतणार आहे. येत्या रणजी ट्रॉफी 2025 साठी बंगालच्या 17 सदस्यीय संघात शमीची निवड करण्यात आली आहे.
अभिमन्यू ईश्वरनकडे नेतृत्व (Abhimanyu Easwaran To Lead Bengal Team Ranji Trophy)
त्याच्यासोबत आकाशदीपलाही संघात स्थान मिळाले आहे. या संघाचे नेतृत्व अभिमन्यू ईश्वरनकडे सोपविण्यात आले आहे, जो बराच काळ टीम इंडियामधील पदार्पणाची वाट पाहत आहे. तो इंग्लंड दौर्यावर भारतीय संघाचा भाग होता, मात्र वेस्ट इंडीज मालिकेसाठी त्याची निवड झाली नव्हती. दरम्यान, यष्टिरक्षक-फलंदाज अभिषेक पोरेलला उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. शमी आणि आकाशदीपच्या उपस्थितीमुळे बंगालचा संघ अधिक ताकदीचा दिसत आहे. विशेष म्हणजे, शमीने भारतासाठी शेवटचा टेस्ट सामना जून 2023 मध्ये खेळला होता. अलीकडेच तो दिलीप ट्रॉफीच्या उपांत्य फेरीतही खेळताना दिसला होता.
मोहम्मद शमीचा प्रथम श्रेणीतील विक्रम कसा आहे?
मोहम्मद शमीने भारतासाठी एकूण 64 कसोटी सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 229 विकेट्स घेतल्या आहेत. एकूण प्रथम श्रेणी (रेड-बॉल) क्रिकेटमध्ये, शमीने 90 सामन्यांमध्ये 340 विकेट्स घेतल्या आहेत. तो शेवटचा भारताकडून जून 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत खेळला होता. तेव्हापासून त्याला कसोटी संघात स्थान देण्यात आलेले नाही. शमी आता 15 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या रणजी ट्रॉफीमध्ये बंगालकडून खेळेल. बंगालचा पहिला सामना उत्तराखंडविरुद्ध आहे, तर संघ 25 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या सामन्यात गुजरातशी सामना करेल.
बंगालचा संपूर्ण रणजी संघ (Bengal announces squad for Ranji Trophy 2025-26) :
अभिमन्यू ईश्वरन (कर्णधार), अभिषेक पोरेल (उपकर्णधार), सुदीप कुमार घारमी, अनुस्तुप मजुमदार, सौरभ कुमार सिंग, सुदीप चॅटर्जी, सुमंत गुप्ता, विशाल भाटी, सूरज सिंधू जैस्वाल, शाकीर हबीब गांधी, मोहम्मद शमी, आकाश दीप, इशान पोरेल, काझी जुनैद सैफी, राहुल प्रसाद, सुमित मोहंता आणि विकास सिंग.
हे ही वाचा -
















