Gautam Gambhir Dinner Party : टीम इंडिया बसमधून आली, पण संघात नसताना गंभीरच्या लाडक्याची प्रायव्हेट कारमधून पार्टीत हजेरी, नेमकं काय घडलं?
Harshit Rana not playing Windies Tests : वेस्ट इंडिजविरुद्ध 10 ऑक्टोबरपासून दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामना खेळला जाणार आहे.

Gautam Gambhir Dinner Party : वेस्ट इंडिजविरुद्ध 10 ऑक्टोबरपासून (India vs West Indies 2nd Test ) सुरू होणाऱ्या दुसऱ्या आणि शेवटच्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या खेळाडूंसाठी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी त्यांच्या घरी खास डिनर पार्टीचे आयोजन केले. दुसरा कसोटी सामना दिल्लीमध्ये खेळवला जाणार असल्याने, जिथे गंभीर यांचे घर आहे, तिथेच 8 ऑक्टोबर रोजी रात्री 8 वाजता ही पार्टी ठेवण्यात आली होती. टीम इंडिया आणि सपोर्ट स्टाफचे सर्व सदस्य बसने गंभीर यांच्या घरी आले होते.
हर्षित राणाची खास एन्ट्री (Harshit Rana Attends Gautam Gambhir Dinner Party Video)
या पार्टीत सर्वांचे लक्ष वेधून घेतले ते हर्षित राणाने (Harshit Rana News). तो वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा भाग नसतानाही गंभीर यांच्या घरी पोहोचला. हर्षित राणाला अलीकडेच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवडण्यात आले असून, त्यावर बरीच चर्चा रंगली होत की तो गौतम गंभीरचा लाडका आहे.
Harshit Rana arrived separately in a special car at coach Gautam Gambhir’s house for the team dinner.👌🏼 pic.twitter.com/ucse2nQL1a
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) October 8, 2025
टीम इंडिया बसमधून आली अन् हर्षित राणाची कारमधून ऐटीत एन्ट्री
विशेष म्हणजे, उर्वरित भारतीय खेळाडू टीम बसने गौतम गंभीरच्या घरी पोहोचले, तर हर्षित राणा वेगळ्या खाजगी वाहनाने पोहोचला. तो गौतम गंभीरच्या घरी त्याच्या स्वतःच्या गाडीने जेवणासाठी पोहोचला. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत हर्षित राणा टीम इंडियाचा भाग नसला तरी, गंभीरप्रमाणे तोही दिल्लीत राहतो. गंभीरने त्याला आमंत्रित करण्याचे हे एक कारण असू शकते, अशी चर्चा आहे.
#WATCH | Indian Men's Cricket team and support staff arrive at the residence of team India head coach Gautam Gambhir, in Delhi
— ANI (@ANI) October 8, 2025
He has hosted a special dinner for them ahead of the second and final Test against the West Indies, which begins on October 10 at the Arun Jaitley… pic.twitter.com/QFhSGRoQDo
कोण कोण आले होते पार्टीला? (Who came to Gautam Gambhir Dinner Party?)
गौतम गंभीर यांच्या या डिनर पार्टीला टीम इंडियाचे सर्व खेळाडू, सर्व प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफ उपस्थित होते. याशिवाय बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला हेही या संध्याकाळी सामील झाले होते. सर्व खेळाडू साध्या पांढऱ्या टी-शर्टमध्ये दिसले, मात्र शुभमन गिलने मात्र ‘अमीरी’ ब्रँडची वेगळी रंगाची टी-शर्ट परिधान केला होता. गंभीर यांनी टीमसाठी कोणता खास मेन्यू ठेवला होता, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. मात्र खेळाडूंनी डिनर करताच सर्वजण पुन्हा टीम बसने परत हॉटेलकडे रवाना झाले.
#WATCH | BCCI Vice President Rajeev Shukla arrives at the residence of team India head coach Gautam Gambhir, in Delhi
— ANI (@ANI) October 8, 2025
Gautam Gambhir has hosted a special dinner for the Indian Men's Cricket team and support staff ahead of the second and final Test against the West Indies,… https://t.co/rzx5LI0cq0 pic.twitter.com/OD8PBpIWOW
हे ही वाचा -





















