IND vs PAK: भारताविरुद्ध सामन्यासाठी कसून सराव करतोय मोहम्मद रिझवान, नेट्समध्ये केली धडाकेबाज प्रॅक्टिस, पाहा VIDEO
IND vs PAK : 28 ऑगस्ट रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात भारत विरुद्ध पाकिस्तान हा महामुकाबला रंगणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघ अगदी कसून सराव करत आहेत.
IND vs PAK, Asia Cup 2022 : भारत विरुद्ध पाकिस्तान (India vs Pakistan) हा हायवोल्टेज सामना 28 ऑगस्टला रंगणार असून दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा असा हा सामना आहे. त्यामुळे अशा महत्त्वपूर्ण सामन्यापूर्वी दोन्ही संघातील खेळाडूंवर दबावही तितकाच असतो. त्यात पाकिस्तानचा सलामीवीर मोहम्मद रिझवान (Mohammad Rizwan) कसून सराव करताना दिसत आहे. त्याचा नेटमधील सरावाचा व्हिडीओ पाकिस्तान क्रिकेटने शेअर केला असून यात रिझवान दमदार सराव करत आहे.
मोहम्मद रिझवान याने भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यात पार पडलेल्या मागील टी20 विश्वचषकात अप्रतिम खेळी केली होती. त्याने 55 चेंडूत 79 धावा केल्या होत्या. त्याला कर्णधार बाबरने 52 चेंडूत 68 धावांची मदत करत पाकिस्तानला 10 विकेट्सनी विजय मिळवून दिला होता. त्यामुळे यंदाही रिझवानवर पाकिस्तान संघाची मोठी जबाबदारी असून भारतीय गोलंदाजांना सावधानता बाळगणं गरजेचं आहे.
पाहा रिझवानच्या सरावाचा VIDEO-
📹 A peek into Mohammad Rizwan's power-hitting drill 👊#AsiaCup2022 pic.twitter.com/UfO11yXp9C
— Pakistan Cricket (@TheRealPCB) August 23, 2022
कधी, कुठं रंगणार यंदीचा भारत-पाकिस्तान सामना?
आशिया चषकात भारत आणि पाकिस्तान 28 ऑगस्टला आमने-सामने येणार आहे. हा सामना दुबईत खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील ग्रुप सामन्यानंतर सुपर फोर सामने खेळले जाणार आहेत. त्यानंतर अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेतील अंतिम सामनाही दुबईत 11 सप्टेंबर रोजी खेळला जाणार आहे.
आशिया कपसाठी भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुडा, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, रवींद्र जाडेजा, रवीचंद्रन आश्विन, युजवेंद्र चहल, रवी बिश्नोई, भुवनेश्वर कुमार, अर्शदीप सिंह, आवेश खान.
राखीव - दीपक चाहर, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल
आशिया कपसाठी पाकिस्तान संघ
बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, फखर जमान, हैदर अली, हरिस रौफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिझवान, मोहम्मद वसीम ज्युनियर, नसीम शाह, शाहनवाज दहनी, उस्मान कादिर, मोहम्मद हसनैन.
हे देखील वाचा-