Team India ODI Record: वेस्ट इंडीजविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारत विश्वविक्रमाला घालणार गवसणी; ऑस्ट्रेलिया, पाकिस्तानलाही टाकणार मागं
Team India ODI Record: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेला येत्या 6 फ्रेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन एकदिवसीय आणि तितक्याच टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे.
Team India ODI Record: भारत विरुद्ध वेस्ट इंडीज मालिकेला येत्या 6 फ्रेब्रुवारीपासून सुरुवात होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात तीन एकदिवसीय आणि तितक्याच टी-20 सामन्यांची मालिका होणार आहे. भारत आणि वेस्ट इंडीज यांच्या सुरुवातीला एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे. या मालिकेच्या पहिल्याच सामन्यात भारतीय क्रिकेट संघाच्या नावावर विश्वविक्रमाची नोंद होणार आहे. हा भारताचा 1000 वा एकदिवसीय सामना असेल. आतापर्यंत कोणत्याही संघानं 1000 सामने खेळले नाहीत. 1000 सामने खेळणारा भारत पहिला क्रिकेट संघ ठरणार आहे. भारताच्या 1000 व्या एकदिवसीय सामन्याचे नेतृत्व रोहित शर्मा करणार आहे.
भारतानं पहिला एकदिवसीय सामना कधी खेळला?
भारतानं 13 जुलै 1974 रोजी अजित वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली इंग्लंडविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. माजी कर्णधार सौरव गांगुलीनं भारतीय क्रिकेट संघाच्या 500 व्या सामन्याचे नेतृत्व केलं होतं. त्यानंतर महेंद्र सिंह धोनीनं भारताच्या 700, 800 आणि 900 व्या सामन्यात संघाचं कर्णधारपद संभाळलं होतं. येत्या 6 फ्रेब्रुवारीला भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यात मोटेरा स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळला जाणार आहे. हा भारताचा 1000 वा एकदिवसीय सामना असेल. या सामन्यात रोहित शर्मा भारतीय क्रिकेट संघाच्या कर्णधाराची जबाबदारी पार पाडणार आहे.
सर्वाधिक एकदिवसीय सामने खेळण्याच्या यादीत भारत अव्वल
भारतानं आतापर्यंत एकूण 999 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यापैकी भारतानं 518 सामने जिंकले आहेत. तर, 431 सामने गमावले आहेत. भारतानंतर ऑस्ट्रेलियानं आतापर्यंत 958 एकदिवसीय सामने खेळले आहेत. ज्यामध्ये 581 विजय आणि 334 पराभव पत्कारले आहेत. या यादीत पाकिस्तानचा संघ तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्ताननं आतापर्यंत 936 एकदिवसीय सामना खेळले आहेत. ज्यात 490 जिंकले आहेत, तर 417 पराभूत झाले आहेत.
हे देखील वाचा-
- IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा 'बॅक अप प्लॅन' तयार
- ...तर सचिन तेंडुलकरने 1 लाखांहून अधिक धावा केल्या असत्या, शोएब अख्तरचं मोठं वक्तव्य
- ICC U-19 World Cup : टीम इंडिया अंडर-19 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत, पुढील लढत ऑस्ट्रेलियाशी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha