(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs WI : वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारताचा 'बॅक अप प्लॅन' तयार
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील आगामी सामन्यांसाठी बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच भारताचा एकदिवसीय आणि टी20 संघ जाहीर केला आहे.
IND vs WI : भारत आणि वेस्टइंडीज (IND vs WI) यांत्यात फेब्रुवारीत एकदिवसीय सामन्यांना (ODI Series) सुरुवात होणार आहे. त्यानंतर टी-20 मालिकाही खेळवली जाणार आहे. भारताने यासाठी संघाची (Team India) घोषणा केली आहे.पण आता या संघात आणखी दोन खेळाडू जोडले जाणार असून या दोघांना स्टँड बाय खेळाडू म्हणून घेतले जाणार असल्याची माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
या समोर आलेल्या माहितीनुसार कोरोनाच्या संकटामुळे कधीही कोणत्या खेळाडूंना माघार घ्यावी लागल्यास अधिकचे खेळाडू असण्यासाठी या दोन खेळाडूंना स्टँड बाय म्हणून घेतले जाईल. या खेळाडूंची नावं आहेत, शाहरुख खान (Shahrukh Khan) आणि आर. साई किशोर (R Sai Kishore) हे दोघेही वेस्टइंडीजविरुद्धच्या मालिकेसाठी स्टँड-बाय खेळाडू म्हणून संघासोबत असतील. या दोघांनीही स्थानिक सामन्यांमध्ये अप्रतिम प्रदर्शन दाखवलं असून शाहरुखने आयपीएलमध्येही खेळ दाखवला आहे. शाहरुख खान फलंदाजीत फिनीशर असून साई किशोर लेफ्ट आर्म स्पिनर आहे.
वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा एकदिवसीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सुर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत (विकेटकिपर), दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंगटन सुंदर, रवि बिश्नोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान
वेस्ट इंडिज विरुद्ध भारताचा टी20 संघ
रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवि बिश्नोई, अक्षर पटेल, यजुवेंद्र चहल, वॉशिंगटन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वरकुमार, आवेश खान, हर्षल पटेल.
वेस्ट इंडिजच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक
एकदिवसीय मालिका -
6 फ्रेबुवारी 2022 - अहमदाबाद
9 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
12 फेब्रुवारी 2022 - अहमदाबाद
टी-20 मालिका
15 फ्रेब्रुवारी 2022 - कोलकाता
18 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
20 फेब्रुवारी 2022 - कोलकाता
हे देखील वाचा-
- Team India : 'या' पाच खेळाडूंनी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खराब कामगिरीमुळे वेस्ट इंडिज विरुद्ध संधी गमावली, यादीत दिग्गज गोलंदाजांचीही नावं
- Team India : भारतीय क्रिकेटसाठी कठीण काळ, रवी शास्त्रींकडून राहुल द्रविडला 'खास' सल्ला
- IND vs WI: जाडेजाला संघात स्थान का नाही? बीसीसीआयनं सांगितलं कारण
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha