(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Wasim Jaffer On Michael Vaughan: '...तर Burnol लाव', वसीम जाफरच्या रिप्लायनं मायकल वॉनची बोलतीच बंद
IPL 2023: आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जनं (Punjab Kings) पुढच्या हंगामात भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरच्या (Wasim Jaffer) खांद्यावर फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवलीय.
IPL 2023: आयपीएल फ्रँचायझी पंजाब किंग्जनं (Punjab Kings) पुढच्या हंगामात भारताचा माजी क्रिकेटपटू वसीम जाफरच्या (Wasim Jaffer) खांद्यावर फलंदाजी प्रशिक्षकपदाची जबाबदारी सोपवलीय. दरम्यान, पंजाब किंग्जच्या प्रशिक्षकपदी निवड झाल्याबद्दल वसीम जाफरवर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. पण इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉननं (Michael Vaughan) वसीम जाफरची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. माझ्या गोलंदाजीवर आऊट झालेल्या खेळाडूला प्रशिक्षक बनवण्यात आलं, असं मायकल वॉननं म्हटलं होतं. यावर वसीम जाफरनं त्याच्या अंदाजात रिप्लाय देऊन सर्वांचं लक्ष वेधून घेतलंय.
जाफरला पंजाबचा फलंदाजी प्रशिक्षक बनवल्यानंतर वॉननं त्याच्या ट्वीटर हँडलवरून त्याची खिल्ली उडवण्याचा प्रयत्न केला. वॉननं ट्विटरवर लिहिलंय की, माझ्या चेंडूवर आऊट झालेल्या खेळाडूकडं पंजाब किंग्जनं फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवली आहे. मायकल वॉनच्या या ट्विटनंतर चाहते जाफरच्या उत्तराची वाट बघत होते. दरम्यान, जाफरनं बर्नॉल क्रिमचा फोटो टाकून मायकल वॉनची बोलतीच बंद केलीय.
ट्वीट-
https://t.co/9J2SQX3b3K pic.twitter.com/Crq47x3fvt
— Wasim Jaffer (@WasimJaffer14) November 17, 2022
जाफरवर दुसऱ्यांदा फलंदाजी प्रशिक्षकाची जबाबदारी
जाफरनं 2019 मध्येच पंजाबच्या फलंदाजी प्रशिक्षकपद स्वीकारलं होतं. तीन हंगाम तो सतत संघासोबत राहिला. त्यानंतर त्यानं 2022 हंगामाच्या ऑक्शनपूर्वी आपलं पद सोडलं. आता त्यांना पुन्हा या पदावर आणण्यात आलं आहे. जाफरशिवाय ब्रॅड हॅडिनवर पंजाबच्या संघाच्या सहाय्यक प्रशिक्षकाची जबाबदारी सोपवण्यात आलीय. दक्षिण आफ्रिकेचा माजी वेगवान गोलंदाज चार्ल लँगवेल्डला गोलंदाजी प्रशिक्षक बनवण्यात आले आहे. लँगवेल्ट यांनी याआधी या संघासोबत गोलंदाजी प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे.
पंजाबच्या संघातील 10 खेळाडू रिलीज
मयंक अग्रवाल, ओडियन स्मिथ, वैभव अरोडा, बेन्नी हॉवेल, ईशान पोरेल, अंश पटेल, प्रेरक मांकड, संदीप शर्मा, ऋतिक चटर्जी या खेळाडूंना पंजाबने रिलीज केलं. पंजाबनं एकूण 10 संघाला रिलीज केलं आहे. यानंतर संघाकडं एकूण 3 परदेशी खेळाडूंची जागा शिल्लक आहेत. पंजाबनं अजून कोणत्याच खेळाडूला ट्रेडींगमधून संघाचा भाग बनवलेलं नाही. आता टीमकडे एकूण 7.05 कोटी पर्समध्ये शिल्लक आहेत. हा पैसा त्यांना मिनी ऑक्शनमध्ये वापरता येणार आहे.
हे देखील वाचा-