Ind vs Aus 4th Test : मेलबर्नमध्ये खेळाडूंनी नाही तर चाहत्यांनी मोडला 87 वर्ष जुना रेकॉर्ड, पाचव्या दिवशी नेमकं काय घडलं?
मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात असलेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना अतिशय रोमांचकारी स्थितीत पोहोचला आहे.
Australia vs India 4th Test : मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जात असलेला भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉक्सिंग डे कसोटी सामना अतिशय रोमांचकारी स्थितीत पोहोचला आहे, खेळाच्या पाचव्या दिवशी खेळाडूंनी नाही तर स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांनी 87 वर्षे जुना रेकॉर्ड मोडला आहे. या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाला चौथ्या डावात विजयासाठी 340 धावांचे लक्ष्य दिले आहे. बॉक्सिंग डे कसोटी सामना पाहण्यासाठी ऑस्ट्रेलियातील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत आणि ऑस्ट्रेलियात मोठ्या संख्येने असलेले भारतीय चाहतेही हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये आले आहेत.
Back-to-back half-centuries for Yashasvi Jaiswal!#AUSvIND | #MilestoneMoment | @nrmainsurance pic.twitter.com/Vqr1VqMp2C
— cricket.com.au (@cricketcomau) December 30, 2024
यावेळी मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर बॉक्सिंग डे कसोटी सामना पाहण्यासाठी एकूण प्रेक्षक संख्या 350,700 पेक्षा जास्त होती. आतापर्यंत या मैदानावर इतके प्रेक्षक कधीच आले नव्हते, जेवढे हा सामना पाहण्यासाठी आले आहेत. याआधी 1937 मध्ये या मैदानावर ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झालेल्या सामन्यात एकूण 350,534 प्रेक्षक आले होते.
ऑस्ट्रेलियातही आतापर्यंत कोणताही कसोटी सामना पाहण्यासाठी आलेल्या चाहत्यांची ही सर्वाधिक संख्या आहे. हा सामना पाहण्यासाठी पाचही दिवस आलेल्या चाहत्यांची संख्या पाहिली तर पहिल्या दिवशी 87,242 चाहते, दुसऱ्या दिवशी 85,147 चाहते, तिसऱ्या दिवशी 83,073 आणि चौथ्या दिवशी 43,867 आणि पाचव्या दिवशी या सामन्यासाठी स्टेडियममध्ये 51,371 हून अधिक चाहते उपस्थित होते.
Thank you, Melbourne.
— Cricket Australia (@CricketAus) December 30, 2024
An Australian cricketing record, an MCG record and history made ❤️ #AUSvIND pic.twitter.com/VVvfwKWd6J
जगातील कोणत्याही मैदानावर भारतीय संघ सामना खेळतो, तेव्हा स्टेडियममध्ये चाहते मोठ्या संख्येने दिसतात. असेच काहीसे यापूर्वी MCG ग्राउंडवर देखील पाहायला मिळाले होते, जेव्हा 2022 साली येथे झालेल्या टी-20 वर्ल्ड कप स्पर्धेत भारत पाकिस्तान विरुद्ध सामना खेळला होता, ज्यामध्ये एकूण 90,293 चाहते स्टेडियममध्ये सामना पाहण्यासाठी आले होते. याशिवाय याच स्पर्धेत झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात 82,507 चाहते सामना पाहण्यासाठी MCG मैदानावर आले होते.
हे ही वाचा -