एक्स्प्लोर

Marlon Samuels: भ्रष्टाचाराविरोधात ICCची कठोर कारवाई; 'या' धडाकेबाज क्रिकेटरवर 6 वर्षांची बंदी

Marlon Samuels Been Banned From All Cricket: आयसीसीनं वेस्ट इंडिजचा माजी क्रिकेटपटू मार्लन सॅम्युअल्सवर सहा वर्षांची बंदी घातली आहे. सॅम्युअल्स भ्रष्टाचार प्रकरणात दोषी आढळले आहेत.

Marlon Samuels Been Banned From All Cricket: भ्रष्टाचाराविरोधात मोठं पाऊल उचलत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं (ICC) वेस्ट इंडिजचा (West Indies Cricket Team) माजी क्रिकेटपटू मार्लोन सॅम्युअल्स (Marlon Samuels) याच्यावर सहा वर्षांची बंदी घातली आहे. क्रिकेट सॅम्युअल्सला सहा वर्षांसाठी अमिराती क्रिकेट बोर्डाच्या (ECB) भ्रष्टाचारविरोधी संहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलं आहे. आयसीसी एचआर आणि इंटिग्रिटी युनिटचे प्रमुख अॅलेक्स मार्शल यांनी गुरुवारी सॅम्युअल्सवरील बंदीची घोषणा केली.

आयसीसी एचआर आणि इंटिग्रिटी युनिटचे प्रमुख अॅलेक्स मार्शल बोलताना म्हणाले की, "सॅम्युअल्सनं जवळपास दोन दशकं आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं आहे, त्यादरम्यान त्यांनी भ्रष्टाचारविरोधी अनेक सत्रांमध्ये सहभाग घेतला आणि भ्रष्टाचारविरोधी संहितेअंतर्गत त्यांची जबाबदारी काय आहे? हे त्यांना माहीत होतं. जरी मार्लोन सॅम्युअल्स आता निवृत्त झाला असला तरी, जेव्हा गुन्हे घडले तेव्हा सॅम्युअल्स खेळाडू होता. ही सहा वर्षांची बंदी नियमांचं उल्लंघन करणार्‍या कोणत्याही खेळाडूसाठी एक शिकवण म्हणून नक्कीच काम करेल

आयसीसीनं 2021 मध्ये केलेले आरोप 

ICC ने सप्टेंबर 2021 मध्ये सॅम्युअल्सवर आरोप लावले आहेत. त्यानुसार सॅम्युअल्सनं अमिराती क्रिकेट बोर्डाच्या भ्रष्टाचार विरोधी संहितेच्या कलम 2.4.2, 2.4.3, 2.4.6 आणि 2.4.7 चं उल्लंघन केलं आहे. हे विभाग भ्रष्टाचारविरोधी अधिकार्‍यांना भेटवस्तू, पेमेंट, आदरातिथ्य किंवा इतर फायद्यांचा अहवाल न देण्याचा संदर्भ देतात, ज्यामुळे खेळाची प्रतिमा मलीन होऊ शकते. यासोबतच तपासात सहकार्य न करणं, माहिती लपवून तपासात अडथळा आणणं किंवा विलंब करणं यांसारख्या कलमांचाही संबंध आहे.

या गुन्ह्यांमध्ये सॅम्युअल्स या वर्षी ऑगस्टमध्ये दोषी आढळला होता. मार्लन सॅम्युअल्सनं 2019 अबूधाबी T10 लीग दरम्यान भ्रष्टाचारविरोधी नियम तोडले.  T10 लीगचा चौथा सीझन अबूधाबीमध्ये 2019 मध्ये जानेवारी-फेब्रुवारी दरम्यान खेळला गेला होता. सॅम्युअल्स तेव्हा कर्नाटक टस्कर्स संघाचा भाग होता, ज्याचा कर्णधार हाशिम आमला होता. 

42 वर्षीय मार्लन सॅम्युअल्सचा वादांशी सखोल संबंध आहे. 2008 मध्ये, आयसीसीने त्याला पैसे घेणे आणि क्रिकेटची बदनामी केल्याबद्दल दोषी ठरवले आणि त्याच्यावर दोन वर्षांची बंदी घातली. आयसीसीने 2015 मध्ये त्याची गोलंदाजी बेकायदेशीर ठरवली होती आणि त्याच्यावर एक वर्षासाठी गोलंदाजी करण्यास बंदी घातली होती. 2014 मध्ये, त्याने तत्कालीन कर्णधार ड्वेन ब्राव्होच्या बोर्डासोबतच्या पेमेंट विवादामुळे भारत दौऱ्यातून माघार घेण्याच्या निर्णयालाही विरोध केला होता.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Raj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणRaj Thackeray Full Speech : वसंत मोरेंना बाजूला करत शहराध्यक्ष झालेल्या बाबरांसाठी राज ठाकरेंचं भाषणChhagan Bhujbal  : मोदींच्या सभेला राष्ट्रवादीच्या नेत्यांची दांडी? भुजबळांनी सांगितलं कारणZero Hour : निवडणुकीचा प्रचार शिगेला, प्रचाराचा सखोल आढावा झीरो अवरमध्ये

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
विधानसभेची खडाजंगी: बीड मतदारसंघात कोण बाजी मारणार, संदीप क्षीरसागर तुतारी फुंकणार की घड्याळ चालणार, ज्योती मेटेही मैदानात
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
बंद सम्राटांना बंद करण्याची वेळ आलीय, धारावी बंद करु, रिफायनरी बंद करु, अरे काय सुरु करणार ते सांगा, मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
मुंबई बाळासाहेंबाच्या सिद्धांतांचे शहर, उद्धव ठाकरेंना चॅलेंज; शिवाजी पार्कवरील शेवटच्या सभेत काय म्हणाले मोदी
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही, जयंत पाटलांचा अजित पवारांवर हल्लाबोल
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
तुमच्या आमदाराने मला पाणी पाजलं; अजित पवारांच्या वक्तव्याने सभेत हशा पिकला; नेमका काय किस्सा घडला?
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Video: 'राहुल गांधींनीच राष्ट्रवादीत जाण्याचा प्रस्ताव दिला'; माझा कट्टावर राधाकृष्ण विखे पाटलांचा गौप्यस्फोट
Rohit Pawar on Devendra Fadnavis : गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
गुंड, धमक्यांनी निवडणुका जिंकता येत नाही, फडणवीस आणि त्यांच्या चेल्याचपाट्यांनी लक्षात घ्यावं; रोहित पवारांची सडकून टीका
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
मोठी बातमी! राज्यात 18 ते 20 नोव्हेंबर शाळांना सुट्टी; शिक्षकांच्या गैरहजेरीमुळे शासनाचा मोठा निर्णय
Embed widget