एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

MPL 2024 : एक नंबर! रत्नागिरीने सलग दुसऱ्या वर्षी पटकावले MPL चे विजेतेपद  

Maharashtra Premier League, 2024 : फायनलमध्ये रत्नागिरी जेट्सची नाशिक संघावर मात, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या महाराष्ट्र प्रीमियर लीग स्पर्धेत सलग दुसऱ्या वर्षी रत्नागिरीचा दबदबा

Maharashtra Premier League, 2024 : किरण चोरमले(३५धावा),  निखिल नाईक(नाबाद ३६) यांनी केलेल्या महत्वपूर्ण खेळीसह सत्यजीत बच्छाव(४-३१) याने केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर रत्नागिरी जेट्स संघाने ईगल नाशिक टायटन्स संघाचा 24 धावांनी पराभव केला. या विजयासह नाशिकने  सलग दुसऱ्या वर्षी एमपीएल स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.   

पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम फेरीत सुमारे ३०००० पुणेकरांनी आपली उपस्थिती लावली होती. यावेळी लोकप्रिय गायक अभिजीत सावंत यांनी आपली गाणी सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले . ईगल नाशिक टायटन्स संघाने रत्नागिरी जेट्स संघाला प्रथम फलंदाजीस आमंत्रित केले. सामन्यात रत्नागिरी जेट्स संघाने अंतिम लढतीत ईगल नाशिक टायटन्सवर निर्विवाद वर्चस्व गाजवले.
 
रत्नागिरीचे सलामीचे फलंदाज कर्णधार अझीम काझी(८), दिव्यांग हिंगणेकर(४), सत्यजीत बच्छाव(५) हे झटपट बाद झाले. अझीमला मुकेश चौधरीने झेल बाद करून रत्नागिरी संघाला पहिला धक्का दिला. हरी सावंतने त्याचा अप्रतिम झेल टिपला. त्यानंतर पाठोपाठ दिव्यांग हिंगणेकरला हरी सावंतने पायचीत बाद केले. रत्नागिरीने पहिल्यांदाच सत्यजीतला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीस उतरविले. पण हा बदल यशस्वी ठरला. समाधान पांगरेने सत्यजीतला झेल बाद केले. आक्रमक फटके मारण्याच्या प्रयत्नात धीरज फटांगरे २७ धावावर बाद झाला. किरण चोरमले व अभिषेक पवार यांनी पाचव्या विकेटसाठी २८चेंडूत ४४ धावांची भागीदारी करून संघाचा डाव सावरला.  किरण चोरमलेने २३चेंडूत ३५धावांची संयमी खेळी केली. त्यात त्याने ३चौकार व २षटकार मारले. त्याला अभिषेक पवारने २२चेंडूत ३षटकारासह २८धावांची खेळी करून साथ दिली.  हे दोघेही आक्रमक फटकेबाजीच्या प्रयत्नात बाद झाले. त्यानंतर निखिल नाईकने २५चेंडूत ३चौकार व १षटकाराच्या नाबाद ३६धावांची खेळी करून संघाला १६० धावांचे आव्हान उभे करून दिले. 

१६० धावांचा पाठलाग करताना ईगल नाशिक टायटन्स संघाला २० षटकात ९बाद १३६धावाच करता आल्या. रत्नागिरी जेट्सच्या सत्यजीत बच्छाव(४-३१), दिव्यांग हिंगणेकर(२-१३), कुणाल थोरात(२-१९)यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीपुढे भरवशाचे फलंदाज मंदार भंडारी(७), अर्शिन कुलकर्णी(९), साहिल पारीख(०), कौशल तांबे(९) हे स्वस्तात तंबूत परतले. टप्प्याटप्प्याने विकेट पडत राहिल्यामुळे ईगल नाशिक टायटन्स संघ ४ बाद ३३ असा बॅकफुटवर गेला.  त्यानंतर मुकेश चौधरीने एकाबाजूने लढताना  ३५चेंडूत २चौकार व ४षटकाराच्या मदतीने सर्वाधिक ५० धावा, अथर्व काळे १५ यांनी धावा काढून थोडासा प्रतिकार केला. 

एमसीएचे अध्यक्ष रोहित पवार म्हणाले की, एमपीएलच्या अंतिम सामन्याने केवळ लीगच्या वाढत्या लोकप्रियतोवर शिक्कामोर्तब केले नाही, तर स्थानिक क्रिकेटप्रेमींमध्येदेखील क्रिकेट किती खोलवर रुजले आहे हे दाखवून दिले. दुसऱ्या पर्वाच्या यशाने लीगने आणखी एक मैलाचा दगड गाठला. भविष्यात लीगचे असे अनेक यशस्वी पर्व होतील. टी २० विश्वचषक स्पर्धेतील भारत वि.बांग्लादेश सामना असताना देखील अंतिम सामन्याला सुमारे ३००००पुणेकरांनी हजेरी लावून आनंद लुटला. त्यामुळे त्यांचे मी आभार मानतो. तसेच, बीसीसीआयने हि स्पर्धा भरविण्यास परवानगी दिल्याने त्यांचेदेखील आभार व्यक्त करतो. 

रत्नागिरी जेट्सच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संघातील खेळाडूंना पाठिंबा दिला. गतविजेत्या रत्नागिरी जेट्स संघाने ईगल नाशिक टायटन्सवर वर्चस्व गाजवत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले.  

स्पर्धेतील विजेत्या रत्नागिरी जेट्स संघाला करंडक व ५०लाख रुपये, तर उपविजेत्या ईगल नाशिक टायटन्स संघाला करंडक व २५लाख रुपये अशी पारितोषिके देण्यात आली.  स्पर्धेचे पारितोषिक वितरण महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे (एमसीए)चे अध्यक्ष रोहित पवार,  एमसीएचे मानद सचिव ऍड. कमलेश पिसाळ, सहसचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज आणि एमपीएलचे चेअरमन सचिन मुळे यांच्या हस्ते करण्यात आले. याशिवाय एमसीए ऍपेक्स पदाधिकारी  कल्पना तापीकर, शुभेंद्र भांडारकर, सुहास पटवर्धन, सुनील मुथा, विनायक द्रविड, केशव वझे, राजू काणे, सुशील शेवाळे, रणजीत खिरीड, अजय देशमुख व एमसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. 

संक्षिप्त धावफलक
रत्नागिरी जेट्स: २० षटकात ८बाद १६०धावा(किरण चोरमले ३५(२३,३x४,२x६), निखिल नाईक नाबाद ३६(२५,३x४,१x६), अभिषेक पवार २८, मुकेश चौधरी ३-३०, हरी सावंत २-२५, अर्शिन कुलकर्णी १-११, समाधान पांगरे १-२२) वि.वि.ईगल नाशिक टायटन्स: २० षटकात ९बाद १३६धावा(मुकेश चौधरी ५०(३५,२x४,४x६), अथर्व काळे १५, हरी सावंत ११, प्रशांत सोळंकी नाबाद ११, सत्यजीत बच्छाव ४-३१, दिव्यांग हिंगणेकर २-१३, कुणाल थोरात २-१९); सामनावीर - सत्यजीत बच्छाव; 

इतर पारितोषिके 
सर्वोत्कृष्ट फलंदाज(चंदू बोर्डे ऑरेंज कॅप): अंकित बावणे(४१५धावा, पीबीजी कोल्हापूर टस्कर्स); 
सर्वोत्कृष्ट गोलंदाज(वसंत रांजणे पर्पल कॅप): सत्यजीत बच्छाव(२५ विकेट); 
फेअर प्ले अवॉर्ड: ईगल नाशिक टायटन्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Shirsat on Eknath Shinde | न बोलता करेक्ट कार्यक्रम करण्यात एकनाथ शिंदे एक नंबरवर!Eknath Shinde PC 3 PM | दोन दिवसांपासून गप्प असलेले एकनाथ शिंदे आज मौन सोडणार ABP MajhaABP Majha Marathi News Headlines 02 PM TOP Headlines 02 PM 27 November 2024Uddhav Thackeray Group : बैठकीत EVM गोंधळासह पराभुतांचा मविआत न लढण्याचा सूर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
ऑस्ट्रेलियाला घरात घुसून हादरा देणाऱ्या कॅप्टन बुम बुम बुमराहला आता मोठी 'लाॅटरी' लागली!
Sanjay Raut: 'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
'तर देशात भाजपला 25 जागा मिळतील...', महाराष्ट्र-हरियाणा निवडणुकीचा निकाल आम्हाला मान्य नाही, राऊतांचे EVMवर प्रश्नचिन्ह
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
मोठी बातमी! इकडे एकनाथ शिंदेंची प्रेस, तिकडे मोदींकडून देवेंद्र फडणवीसांच्या नावाला पसंती; शपथविधीची तारीखही जवळपास निश्चित
PAN 2.0 : क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? जुनं पॅन कार्ड वैध राहणार का? जाणून घ्या सविस्तर माहिती 
क्यू आर कोडसह पॅन 2.0 जारी झाल्यानंतर पॅन क्रमांक बदलेलं का? नव्या प्रकल्पाबाबतच्या प्रश्नांची उत्तरं
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मला कुठलंही मंत्रिपद नको; जरांगेंना टोला, हाकेंनी सांगितला विजयी झालेल्या ओबीसी आमदारांचा आकडा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
मोठी बातमी! महाआघाडीत बिघाडीची शक्यता; शिवसेना ठाकरेंच्या बैठकीत महापालिकेला स्वबळाची भाषा
IND Vs AUS 2nd Test : ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
ॲडलेड कसोटीपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार खेळाडू पिंक बॉल कसोटीतून बाहेर, कोण घेणार जागा?
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवत हार्वेस्टर- मजुरांचे पैसे फेडण्याची वेळ, धानखरेदी रखडल्यानं शेतकऱ्यांमध्ये रोष
Embed widget