एक्स्प्लोर

Lendl Simmons Retirement : वेस्ट इंडीजचा क्रिकेटपटू सिमन्सचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा, निवृत्तीची केली घोषणा

Lendl Simmons : एकदिवसीय आणि टी20 क्रिकेट प्रकारात दमदार कामगिरी करणाऱ्या लेंडल सिमन्स याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

Lendl Simmons Retirement : वेस्ट इंडीज क्रिकेटमधील (West Indies Cricket) एक दमदार फलंदाज असणाऱ्या लेंडल सिमन्स (Lendl Simmons) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. एकदिवसीय आणि टी20 क्रिकेट प्रकारात शानदार प्रदर्शन करणाऱ्या सिमन्सची कारकिर्द चांगली असून त्याचा सीपीएलमधील (CPL) त्रिनबगो नाईट रायडर्सने (TKR) त्यांच्या अधिकृत ट्वीटर हँडलवरुन ही माहिती शेअर केली आहे. सिमन्सने वनडे क्रिकेटमध्ये 2 शतकं तर 16 अर्धशतकं लगावली आहेत. आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यातही त्याचं प्रदर्शन कमाल राहिलं आहे.

 

सिमन्सने वेस्ट इंडीजसाठी एकदिवसीय क्रिकेटमधील डेब्यू पाकिस्तानविरुद्ध 2006 साली केला होता. तर आंतरराष्ट्रीय टी20 मध्ये त्याने 2007 साली डेब्यू केला. सिमन्सने 68 एकदिवसीय सामन्यांमध्ये 1 हजार 958 रन बनवले आहेत. या दरम्यान त्याने 2 शतकं आणि 16 अर्धशतकं लगावली आहेत. सिमन्सने 68 आंतरराष्ट्रीय टी20 सामन्यात 1 हजार 527 रन केले असून यामध्ये 9 अर्धशतकं त्याने लगावली आहेत. याशिवाय 8 कसोटी सामनेही त्याने खेळले आहेत. कॅरेबियन प्रीमियर लीग अर्थात सीपीएलमध्येही त्याने चांगलं प्रदर्शन केलं असून इंडियन प्रीमियर लीगमध्ये त्याने 29 सामने खेळत 1 हजार 79 रन केले आहेत. यावेळी त्याने एक शतक आणि 11 अर्धशतकं ठोकली आहेत. 100 रन हा त्याचा सर्वश्रेष्ठ स्कोर आहे.

आणखी एका वेस्ट इंडिज क्रिकेटपटूची निवृत्ती

वेस्ट इंडीजचा यष्टीरक्षक फलंदाज आणि माजी कर्णधार दिनेश रामदीन (Denesh Ramdin) याने देखील आजच (18 जुलै 2022) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. तब्बल 17 वर्षांच्या कारकिर्दीनंतर रामदीननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय. मात्र, तो जगभरातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळणं सुरूच ठेवणार आहे. दिनेश रामदीननं 2005 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं वेस्ट इंडीजकडून खेळताना 74 कसोटी, 139 एकदिवसीय आणि 71 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यातील 110 डावात त्यानं 25.00 च्या सरासरीनं आणि 80.35 स्टाईक रेटनं 2 हजार 220 धावा केल्या आहेत.  

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

Shreyas Iyer : टीम इंडियाचं विजयाच्या ट्रॅकवर कमबॅक, झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
भारताचा झिम्बाब्वेवर 7 विकेटनं विजय, श्रेयस अय्यरनं पहिल्या विजयाचं श्रेय कोणाला दिलं?
Sachin Tendulkar : 'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगत विद्यार्थी आंदोलनावर पोस्ट
'अपयश आले तरी चालते पण गैरमार्ग स्वीकारणं योग्य नाही', सचिन तेंडुलकरची वडिलांची शिकवण सांगणारी पोस्ट
IND vs ZIM: टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
टीम इंडिया पुन्हा विजयाच्या ट्रॅकवर, वैभव सूर्यवंशीचा हरारेत पुन्हा धमाका, झिम्बाब्वेला पराभूत करत मालिकेत आघाडी  
Vaibhav Sooryavanshi : अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं, बेबी बॉसचं झिम्बाब्वे विरुद्ध वादळी अर्धशतक 
अभिषेक शर्मा पुन्हा फ्लॉप, वैभव सूर्यवंशीनं हरारेचं मैदान गाजवलं,झिम्बाब्वेमध्ये बेबी बॉसची वादळी फलंदाजी

व्हिडीओ

Abhijeet Dipke PC : मला अटक होऊ शकते पण तुम्ही, अभिजीत दिपकेचं विद्यार्थ्यांना मोठं आवाहन
Sonam Wangchuk Hunger Strike : 26 दिवसांनंतर अखेर सोनम वांगचुक यांचं उपोषण मागे; मंत्री जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्या चर्चेनंतर निर्णय
Mumbai Police Threat Drugs Case : वर्दीतील ‘पावडर’मामा, विद्यार्थ्यांना धमकी Special Report
Maharashtra CJP Protets | सीजेपीच्या समर्थनार्थ महाराष्ट्रात आंदोलनं | ABP Majha Special Report
CJP Protest Vs Modi Government : सरकार आणि आंदोलकांची कोंडी कशी फुटणार? | ABP Majha Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, हरयाणा ते बंगालपर्यंत; अवघ्या देशभरात विद्यार्थ्यांचा नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ रस्त्यावर आक्रोशाचा वणवा, वकील सुद्धा आंदोलनात
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Video: सरकार म्हणाले, पेलेट गनचा वापर केला नाही; राहुल गांधींनी तिरंगा हातात असताना गंभीर जखमी झालेल्या 19 वर्षीय साहिलच्या टी शर्ट वर करून जखमा दाखवल्या, डोळा सुद्धा गेला, पोलिस भरतीचं होतं स्वप्न
Neet Paper Leak: केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, पेपरफुटी संदर्भात नवा कायदा, पुढील आठवड्यात विधेयक; 10 वर्षे कारावास, 10 कोटी रुपये दंड
EPFO : पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
पीएफ खात्यात 2025-26 चं व्याज जमा, ईपीएफओकडून खातेदारांना मेसेज,पीएफ बॅलन्स कसा चेक करायचा?
JP Nadda on CJP Meeting : 3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
3 पैकी 2 मागण्यांवर सरकार सकारात्मक; पण CJP धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यावर ठाम, बैठक संपताच जे.पी. नड्डा म्हणाले...
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
नीट परीक्षेच्या दुसऱ्या निकालात मुलीला अवघे 200 गुण, वडिलांना ह्रदयविकाराचा झटका; लेकीचा सरकारला सवाल
Pune Crime News: पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
पुण्यात पोलिस चौकीसमोरच गोळीबार; पूर्व वैमन्यासातून तरुणावर फायरिंग, अवघ्या २० मिनिटात आरोपीला घेतलं ताब्यात, नेमकं काय घडलं?
RBI : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला आरबीआयकडून 13.30 लाखांचा दंड, RBI नं सहा बँकांना ठोठावला आर्थिक दंड
Embed widget