Denesh Ramdin Retires: 17 वर्षांच्या कारकिर्दीनंतर दिनेश रामदीनचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा
Denesh Ramdin Retirement: वेस्ट इंडीजचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदीननं आज (18 जुलै 2022) आतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केलीय.
Denesh Ramdin Retirement: वेस्ट इंडीजचा यष्टीरक्षक फलंदाज दिनेश रामदीननं (Denesh Ramdin) आज (18 जुलै 2022) आतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याची घोषणा केलीय. तब्बल 17 वर्षांच्या कारकिर्दीनंतर रामदीननं आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केलाय. मात्र, तो जगभरातील देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत खेळणं सुरूच ठेवणार आहे.
दिनेश रामदीन काय म्हणाला?
"मला हे सांगताना दु:ख होत आहे की, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेत आहे. मागील 14 वर्षांत माझे सर्व स्वप्नं पूर्ण झाली. लहानपणीपासूनच माझं त्रिनिदाद, टोबेगो आणि वेस्टइंडीजसाठी खेळण्याचं माझं स्वप्न होतं. माझ्या कारकिर्दीत मला जगभर फिरायला मिळालं.विविध देशातील आणि विविध संस्कृतीतील मित्र बनवता आले. मला माझ्या देशाचाही अभिमान वाटतो"
रामदीनची इन्स्टाग्राम पोस्ट-
">
दिनेश रामदीनची आंतरराष्ट्रीय कारकिर्द
दिनेश रामदीननं 2005 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानं वेस्ट इंडीजकडून खेळताना 74 कसोटी, 139 एकदिवसीय आणि 71 टी-20 सामने खेळले आहेत. एकदिवसीय सामन्यातील 110 डावात त्यानं 25.00 च्या सरासरीनं आणि 80.35 स्टाईक रेटनं 2 हजार 220 धावा केल्या आहेत. ज्यात दोन शतक आणि पाच अर्धशतकाचा समावेश होता. तर, कसोटी क्रिकेटमध्ये 25.87 सरासरीनं आणि 48.74 च्या स्ट्राईक रेटनं 2 हजार 898 धावा केल्या आहेत. ज्यात चार शतकांचा आणि 15 अर्धशतकांचा समावेश आहे. याशिवाय टी-20 क्रिकेटमध्ये त्याच्या नावावर 636 धावांची नोंद आहे. टी-20 क्रिकेटमध्ये त्याला फक्त एकच अर्धशतक झळकावता आलंय.
हे देखील वाचा-