LLC : गुजरात जायंट्स की भिलवाडा किंग्स? इंडिया कॅपिटल्ससोबत कोण खेळणार फायनल? कधी, कुठे पाहाल सामना?
Legends League Cricket : लीजेंड्स लीग क्रिकेटमध्ये आज गुजरात जायंट्स आणि भिलवाडा किंग्ज या दोन्ही संघामध्ये एलिमिनेटर सामना रंगणार आहे.
LLC2, Gujrat Giants vs Bhilwara Kings : जागतिक क्रिकेटमधील माजी दिग्गज क्रिकेटर सध्या भारतात लीजेंड्स लीग क्रिकेट (Legends League Cricket) स्पर्धेचे सामने खेळत आहेत. अत्यंत रंगतदार होणारी ही स्पर्धा आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. इंडिया कॅपिटल्सचा संघ अंतिम फेरीत पोहोचला असून आज गुजरात जायंट्स आणि भिलवाडा किंग्स (Gujrat Giants vs bhilwara kings) यांच्यात एलिमिनेटर सामना रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ फायनलमध्ये इंडिया कॅपिटल्सशी भिडणार आहे.
आज सामना पार पडणाऱ्या दोन्ही संघामध्ये क्रिकेट जगतातील माजी दिग्गज खेळाडू असून गुजरात संघाचं नेतृत्त्व वीरेंद्र सेहवागकडे तर भिलवाडा किंग्सचं नेतृत्त्व इरफान पठाण करणार आहे. आजचा सामना होणाऱ्या दोन्ही संघामध्ये दमदार खेळाडू असल्याने आपले आवडते क्रिकेटर पुन्हा एकदा मैदानावर पाहायला मिळतील, तर आज नेमके कोणते खेळाडू मैदानात उतरु शकतात, यासाठी दोन्ही संघाचे संभाव्य अंतिम 11 पाहूया...
अशी असू शकते अंतिम 11
गुजरात जायंट्सचे संभाव्य अंतिम 11 - वीरेंद्र सेहवाग (कर्णधार), पार्थिव पटेल (विकेटकीपर), केविन ओ ब्रायन, तिलकरत्ने दिलशान, लेंड्ल सिमन्स, थिसारा परेरा, रियाद एमरिट, ग्रीम स्वान, केपी अपन्ना, मिचेल मॅक्लेघन आणि अशोक डिंडा.
भिलवाडा किंग्जचे संभाव्य अंतिम 11 - मोर्ने विक, विलियम पोटरफिल्ड, इरफान पठाण (कर्णधार), शेन वॉटसन, राजेश बिश्नोई, युसूफ पठाण, जेसल करिया, टिनो बेस्ट, श्रीसंत, मॉन्टी पानेसर, फिदेल एडवर्ड्स, दिनेश साळुंके, सुदीप त्यागी
कधी, कुठं पाहायचा सामना?
लीजेंड्स लीग क्रिकेटचा आजचा सामना (03 सप्टेंबर) संध्याकाळी 7.30 वाजता जोधपुरच्या : बरकतुल्लाह खान स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. यापूर्वी अर्धातास आधी नाणेफेक होईल. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.
5 ऑक्टोबरला रंगणार फायनल
लीजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या सीजनमध्ये 4 संघानी सहभाग घेतला होता. इंडिया कॅपिटल्स, गुजरात जायंट्स, भिलवाडा किंग्स आणि मणिपाल टायगर्स अशी या संघाची नावं असून ग्रुप स्टेजमध्ये हे चारही संघ प्रत्येकी 6-6 सामने खेळले. प्रत्येक दोन संघांमध्ये दोन सामने खेळवले गेले. आता इंडिया कॅपिटल्स फायनलमध्ये गेला असून आजचा जिंकणारा संघ आणि इंडिया कॅपिटल्समध्ये अंतिम सामना 5 ऑक्टोबर रोजी रंगणार आहे.