IND vs AUS 3rd ODI : चेपॉकमध्ये भारत-ऑस्ट्रेलिया प्लेईंग-11 मध्ये बदल करणार का? पाहा दोन्ही संघाची संभाव्य 11
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज (22 मार्च) चेपॉक स्टेडियमवर खेळवला जाईल.
IND vs AUS 3rd ODI Possible Playing11 : भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज (22 मार्च) दुपारी 1.30 वाजता सुरू होईल. चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉक येथे दोन्ही संघ भिडतील. चेपॉकची खेळपट्टी सहसा फिरकीला अनुकूल असते पण सध्याच्या वातावरणात या वेळी वेगवान गोलंदाजांनाही चांगला सीम आणि स्विंग मिळेल असं म्हटलं जात आहे. त्यामुळे दोन्ही संघ शेवटच्या सामन्यातील त्यांच्या प्लेईंग-11 मध्ये काही बदल करु शकतात...
टीम इंडियात बदल होण्याची शक्यता फारच कमी आहे. दुसऱ्या सामन्यात भारताला एकदिवसीय क्रिकेट इतिहासातील सर्वात वाईट पराभव पत्करावा लागला असला तरी, भारतीय संघ व्यवस्थापन विशाखापट्टणममध्ये खेळलेल्या प्लेईंग-11 लाच मैदानात उतरवू शकते. म्हणजे पाच फलंदाज, दोन फिरकीपटू अष्टपैलू, एक वेगवान अष्टपैलू, दोन वेगवान गोलंदाज आणि एक फिरकी गोलंदाज. दरम्यान भारतीय संघात जर काही बदल होऊ शकतो, तर तो म्हणजे कुलदीप यादवच्या जागी युझवेंद्र चहलचा प्रयत्न केला जाऊ शकतो. सूर्यकुमार यादवच्या जागी ईंशान किशनला संधी देण्याबाबतही चर्चा आहे. पण शक्यतो टीम इंडिया सूर्याला प्लेईंग-11 मध्ये कायम ठेवू शकते.
टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग-11 : रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव / युझवेंद्र चहल, मोहम्मद शमी.
ऑस्ट्रेलियामध्ये बदल होण्याची दाट शक्यता
ऑस्ट्रेलियाच्या संघात दोन बदल नक्कीच पाहायला मिळू शकतात. डेव्हिड वॉर्नर आणि ग्लेन मॅक्सवेल फिट असल्यास ते प्लेइंग-11 मध्ये दिसू शकतात. अशा परिस्थितीत मार्नस लबुशेनला बाहेर बसवले जाऊ शकते. जर कर्णधार स्टीव्ह स्मिथला चेपॉकची खेळपट्टी फिरकीसाठी अनुकूल वाटली, तर तो शॉन अॅबॉट आणि नॅथन एलिसच्या जागी अॅश्टन अॅगरला संधी देऊ शकतो. अशा स्थितीत कांगारू संघाकडे दोन फिरकी अष्टपैलू, एक फिरकी गोलंदाज, एक वेगवान गोलंदाज, तीन जलद गोलंदाजी अष्टपैलू आणि चार फलंदाजांचा प्लेईंग-11 मध्ये सहभाग असू शकतो.
ऑस्ट्रेलियची संभाव्य प्लेईंग-11 : डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टॉइनिस, अॅलेक्स कॅरी, अॅडम झम्पा, शॉन अॅबॉट / अॅश्टन अगर, मिचेल स्टार्क
हे देखील वाचा-