VIDEO : राहुलचा सुपरमॅन कॅच, विकेटमागे घेतला अफलातून झेल
KL Rahul Catch : तन्जिद हसन आणि लिटन दास यांनी बांगलादेशला वादळी सुरुवात करुन दिली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार कमबॅक केले.
KL Rahul Catch : तन्जिद हसन आणि लिटन दास यांनी बांगलादेशला वादळी सुरुवात करुन दिली. पण त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी दमदार कमबॅक केले. कुलदीप यादव याने आधी तन्जिद हसन याला तंबूत पाठवले. तच्यानंतर जाडेजाने कर्णधार शांतोला तंबूचा रस्ता दाखवला. यामधून बांगलादेश सावरणार असे वाटलेच होते, की मोहम्मद सिराजने मोहंदी हसन मिराज याला बाद केले. पण सिराजच्या चेंडूवर केएल राहुल याने अप्रतिम झेल घेतला. राहुलच्या झेलचे सर्वत्र कौतुक होत आहे. केएल राहुल याने विकेटमागे हवेत उंचावत अशक्यप्राय झेल घेतला. केएल राहुलने घेतलेल्या झेलचे सोशल मीडियावर कौतुक होत आहे. क्षणभरात व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
के एल राहुलने (KL Rahul catch) बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात सुपरमॅनसारखा झेल घेतला. विकेटकीपिंग करणाऱ्या के एल राहुलने आपल्या डाव्या बाजूने झेप घेऊन अप्रतिम झेल घेतला. मोहम्मद सिराजच्या गोलंदाजीवर के एल राहुने हा झेल टिपत, बांगलादेशला तिसरा धक्का दिला. राहुलने घेतलेल्या या कॅचमुळे बांगलादेशचा मेहदी हसन अवघ्या 3 धावा करुन माघारी परतला. के एल राहुलने घेतलेल्या या अप्रतिम झेलमुळे टीम इंडियाच्या खेळाडूंनी कौतुक केलं. दुसरीकडे के एल राहुलने घेतलेल्या कॅचचा व्हिडीओ सोशल मीडियावर क्षणार्धात व्हायरल झाला. सोशल मीडियावरही के एल राहुलच्या या व्हिडीओचं कौतुक होत आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात आज पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर सामना होत आहे. भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील सामन्यात नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम फलंदाजी निवडली. बांगलादेशच्या सलामी फलंदाजांनी वादळी सुरुवात केली. 93 धावांची भागिदारी झाली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी कमबॅक केले. सिराज, जाडेजा आणि कुलदीप यांनी बांगलादेशला एकापाठोपाठ एक धक्के दिले.
Well done 👍 #KLRahul #indiavsbangladesh pic.twitter.com/q4Sg7meOm2
— Deepak Yadav (@DeltaYanki1) October 19, 2023
Superman!!!!🦹♂️#KLRahul #INDvBAN pic.twitter.com/8QgSmyFhhe
— Shreyash Kalmegh18 (@ShreyashKalmeg3) October 19, 2023
MS Dhoni was never this good with the gloves to be very honest
— Rajan pandit (@jaima7017) October 19, 2023
What a catch by KL Rahul 🔥
#indiavsbangladesh pic.twitter.com/MJqxsnuHVf
What a brilliant Take @klrahul 😍👌🙌🔥🔥 @ICC @BCCI #indiavsbangladesh #INDvBAN #CWC23 https://t.co/wSMElniTvk
— Montu Talaviya (@mon2_talaviya) October 19, 2023
Dream for Dhoni to take such a brilliant catch behind the stumps.
— Aman (@CricketSatire) October 19, 2023
Unbelievable catch by KL Rahul#INDvBAN pic.twitter.com/TFre70TjZC
#PUMADive@pumacricket @klrahul🔥 pic.twitter.com/Bghr7W4iqL
— Cine World 🌍 (@CWcricworld) October 19, 2023
WHAT A CATCH KL RAHUL.....!!!!!!!
— CricLoverShanky (@CricLoverShanky) October 19, 2023
Mohammed Siraj strikes for India...!!!
Bangladesh 129/2.#indiavsbangladesh #CWC23INDIA #KLRahul #Siraj #ViratKohli pic.twitter.com/fhFaeD4GNu
टीम इंडियाने पुणे वनडे सामन्यात दमदार कमबॅक केले. बांगलादेशच्या सलामी फलंदाजांनी वादळी सुरुवात केली होती. 14.4 षटकात 93 धावांची भागीदारी केली. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी करिष्मा दाखवला. रविंद्र जाडेजाने दोन, कुलदीप यादव आणि सिरजने एक एक विकेट घेतली. बांगलादेशच्या दोन्ही सलामी फलंदाजांनी अर्धशतके ठोकली. टी हसन, लिटन दास यांनी अर्धशतके ठोकली. हसन याने 43 चेंडूत 51 आणि लिटन दास याने 82 चेंडूत 66 धावा चोपल्या. पण त्यानंतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.