एक्स्प्लोर

Jos Buttler: बटलरची बॅट शांत व्हायचं नावचं घेईना! आता मोडलाय धोनीचा 17 वर्ष जुना षटकारांचा विक्रम

Jos Buttler Breaks MS Dhoni Most Sixes Record: इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) चांगलाच फॉर्मात आहे.

Jos Buttler Breaks MS Dhoni Most Sixes Record: इंग्लंडचा यष्टीरक्षक फलंदाज जोस बटलर (Jos Buttler) चांगलाच फॉर्मात आहे. इंडियन प्रीमियर लीग 2022 (IPL 2022) मध्ये ऑरेंज कॅप जिंकणाऱ्या बटलरची बॅट शांत होण्याचं नाव घेत नाही. नेदरलँड्सविरुद्धच्या तीन सामन्यांच्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय मालिकेत त्यानं आक्रमक फलंदाजी करत अनेक मोठे विक्रम मोडीत काढले आहेत. नेदरलँड्सविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान बटलरनं महेंद्रसिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) 17 वर्षे जुना विक्रमही मोडलाय. एकदिवसीय मालिकेत बटलरनं यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक षटकार मारण्याचा विश्वविक्रमाची रचलाय. याआधी हा विक्रम धोनीच्या नावावर होता.

नेदरलँड्सविरुद्ध बटलरची चमकदार कमागिरी
बटलरनं नेदरलँड्सविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत एकूण 19 षटकार ठोकले. धोनीनं 2005 मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एका एकदिवसीय मालिकेत 17 षटकार मारले होते. धोनीपाठोपाठ एबी डिव्हिलियर्सचा क्रमांक लागतो, एबी डिव्हिलियर्सनं 2015 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध 16 षटकार ठोकले होते. या यादीत बटलरचं चौथ्या क्रमांकावर आहे.

एकदिवसीय मालिकेत सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज-

क्रमांक फलंदाज एकूण षटकार
1 जोर बटलर (इंग्लंड) 19 
2 महेंद्र सिंह धोनी (भारत) 17
3 एबी डिव्हिलियर्स (दक्षिण आफ्रिका) 16
4 जोस बटलर (इंग्लंड) 15

 

वेस्ट इंडीजविरुद्ध 14 षटकार मारण्याचा विक्रम
बटलरने 2019 मध्ये वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत 14 षटकार मारले होते. बटलरने या मालिकेतील तीन सामन्यांत 185.07 च्या स्ट्राईक रेटनं एकूण 248 धावा केल्या. या मालिकेत तो एकदाही बाद झाला नाही. बटलरनं 19 षटकारांसह 14 चौकारही मारले आहेत. या शानदार कामगिरीसाठी बटलरला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आलं आहे.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 हजार 281 चेंडूत चार हजार धावा
जोस बटलरनं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 3 हजार 281 चेंडूत 4,000 धावांचा टप्पा पार केला. या यादीत पाकिस्तानचा माजी फलंदाज शाहीद आफ्रिदी दुसऱ्या क्रमांकावर आहे. शाहीद आफ्रिदीनं 3 हजार 930 चेंडूत 4,000 धावा केल्या होत्या. त्यानंतर 4 हजार 128 चेंडूत 4,000 धावा पूर्ण करणारा डेव्हिड वॉर्नर तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारताचा विस्फोटक माजी फलंदाज वीरेंद्र सेहवाग चौथ्या क्रमांकावर आहे. सेहवागनं 4 हजार 131 चेंडूत चार हजार धावांचा टप्पा गाठला होता. सर्वात कमी चेंडूवर 4,000 धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा स्टार खेळाडू क्विंटन डी कॉक पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये 4 हजार 255 चेंडूत चार हजार धावा केल्या होत्या. 

आयपीएल 2022 मध्ये जोर बटलरची उत्कृष्ट खेळी
आयपीएल 2022 मध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना अनेक विक्रमाला गवसणी घातली. तसेच आयपीएल 2022 मध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाचा मानही त्यानं मिळवला. या हंगामात त्यानं 17 सामने खेळले आहेत. ज्यात 149.05 च्या सरासरीनं 863 धावा केल्या आहेत. विशेष म्हणजे, या हंगामात जोस बटलरनं चार शतक आणि चार अर्धशतकही ठोकले आहेत. या उत्कृष्ट कामगिरीमुळं त्याला ऑरेंज कॅप विजेता म्हणून गौरवण्यात आलं.

हे देखील वाचा-

महत्त्वाच्या बातम्या

National Sports Awards : मोठी बातमी : यंदा कोणालाच खेलरत्न पुरस्कार नाही, 17 जणांना अर्जुन पुरस्कार, एकाही क्रिकेटपटूला एकही अवॉर्ड नाही, पाहा संपूर्ण यादी!
मोठी बातमी : यंदा कोणालाच खेलरत्न पुरस्कार नाही, 17 जणांना अर्जुन पुरस्कार, एकाही क्रिकेटपटूला एकही अवॉर्ड नाही, पाहा संपूर्ण यादी!
IND vs SL 1st Test DAY-4 Live : दुसऱ्या डावात टीम इंडिया 193 धावांवर ऑलआऊट! श्रीलंकेसमोर 372 धावांचं लक्ष्य; आता प्रत्येक चेंडू ठरणार निर्णायक, जाणून घ्या LIVE अपडेट्स
दुसऱ्या डावात टीम इंडिया 193 धावांवर ऑलआऊट! श्रीलंकेसमोर 372 धावांचं लक्ष्य; आता प्रत्येक चेंडू ठरणार निर्णायक, जाणून घ्या LIVE अपडेट्स
Rishabh Pant 100 sixes in Tests : अद्भूत, अविश्वसनीय...कसोटीत 100 षटकार ठोकणारा ऋषभ पंत पहिला भारतीय, तर जागतिक तिसरा क्रिकेटपटू; यादीत कुणाकुणाचा समावेश?
अद्भूत, अविश्वसनीय...कसोटीत 100 षटकार ठोकणारा ऋषभ पंत पहिला भारतीय, तर जागतिक तिसरा क्रिकेटपटू; यादीत कुणाकुणाचा समावेश?
IND vs SL 1st Test : आऊट देताच केएल मैदानाबाहेर निघाला, पडिक्कल म्हणाला, अरे थांब...; पुढे जे घडलं, ते पाहून सगळे हसत बसले, VIDEO
आऊट देताच केएल मैदानाबाहेर निघाला, पडिक्कल म्हणाला, अरे थांब...; पुढे जे घडलं, ते पाहून सगळे हसत बसले, VIDEO

व्हिडीओ

Maharashtra Weather Rain Updates: पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
Laxman Hake PC : ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय
Devendra Fadnavis On Tukaram Mundhe FDA: तुकाराम मुंढेंच्या धडक कारवाईवर फडणवीस पहिल्यांदाच बोलले
Anand Dave Pune : श्रीमंत दगडूशेठ गणपतीची मूर्ती थेट शनिवार वाड्यात बसवा सगळे प्रश्न सुटतील
Nashik Potholes Special Report:नाशिकच्या खड्ड्यांवरुन राजकारण तापलं, राऊतांची टीका, महाजनांचा पलटवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
El Nino : El Nino : अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
अल निनो मजबूत! भारतात दुष्काळाचा धोका 70% पर्यंत वाढला; पिकांचं नुकसान अन् महागाईचा भडका उडण्याची भीती, सर्वसामान्यांच्या ताटावर होणार परिणाम?
Abhijeet Dipke: चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
चिमुकल्या विद्यार्थ्यांना वर्गात झाडू मारताना पाहून अभिजीत दिपके संतापले, शिक्षकांना सुनावलं, म्हणाला....
Twisha Sharma Death Case: ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
ट्विशा शर्मा मृत्यूचं गूढ उकललं! सीबीआय चार्जशीटमधून सत्य समोर, वहिनीला केलेला शेवट मेसेज अन् काही मिनिटात...
Buldhana Crime News: वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
वरिष्ठांचा दबाव अन् कामाचा ताण असह्य झाला, झेंडावंदन होताच डॉक्टर घरच्या शेतात गेले अन् आयुष्यच संपवलं, बुलढाण्यातली खळबळजनक घटना
Laxman Hake on OBC Reservation: मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
मनोज जरांगेंची भाषा जात वर्चस्वाची, ओबीसींनी ज्यांना मतदान केलं त्या सत्ताधाऱ्यांनी तुम्हाला निर्वस्त्र केलंय: लक्ष्मण हाके
Abhijeet Dipke Protest Hingoli : दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
दारू पिऊन वर्गात झोपणारा तो मुख्याध्यापक अखेर निलंबित; अभिजीत दिपकेंच्या दौऱ्यापूर्वीच निलंबन, तरीही दिपके बसले आंदोलनाला कारण...
Sanjay Raut : 'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
'देवेंद्रजी हळूहळू इकडचं काम आवरतील आणि दिल्लीत...', फडणवीस महाराष्ट्रातून दिल्लीत जाण्याबाबत राऊतांनी केलं मोठं वक्तव्य, म्हणाले, 'मूळ घर आवरावं लागतं...'
Nathuram Godse Pune: नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
नथुराम गोडसे, गोपाळ गोडसे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सक्रिय सदस्य होते; सात्यकी सावरकरांची न्यायालयात कबुली
Embed widget