Ranji Trophy 2022 Final Day 2: दुसऱ्या दिवसाअखेर मध्य प्रदेशचा संघ 251 धावांनी पिछाडीवर, मुंबईची कामगिरी कशी?
Ranji Trophy 2022 Final Day 2: मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यातील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जातोय
Ranji Trophy 2022 Final Day 2: मध्य प्रदेश आणि मुंबई यांच्यातील रणजी ट्रॉफीचा अंतिम सामना बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जातोय. या सामन्यात नाणेफेक जिंकून मुंबईच्या संघानं मध्य प्रदेशला प्रथम गोलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. मुंबईनं पहिल्या डावात 374 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरलेल्या मध्य प्रदेशच्या संघानं या सामन्यातील दुसऱ्या दिवसाअखेर एक विकेट्स गमावून 123 धावा केल्या आहेत. हिमांशू मंत्रीच्या रूपानं मध्य प्रदेशच्या संघाला पहिला धक्का बसलाय. तुषार देशपांडेच्या चेंडूवर तो एलबीडब्ल्यू झाला. हिमांशूनं 50 चेंडूत 31 धावा केल्या. मध्य प्रदेशचा संघ 251 धावांनी पिछाडीवर आहे.
सर्फराज खान आणि यशस्वी जैस्वालची चमकदार कामगिरी
मुंबईची धावसंख्या 374 वर पोहचवण्यात सर्फराज खान आणि यशस्वी जैस्वालचा मोलाचा वाटा आहे. या सामन्यात सर्फराज खाननं 134 धावांची तर, यशस्वी जैस्वालनं 78 धावांची खेळी केली. मध्य प्रदेशकडून गौरव यादवनं सर्वाधिक चार विकेट्स घेतल्या. ज्यामध्ये सर्फराजचाही समावेश आहे.
राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणला टाकलं मागं
सर्फराज खानने रणजी ट्रॉफीच्या चालू हंगामात चांगली कामगिरी केली आहे. मध्य प्रदेशविरुद्ध अंतिम सामन्यात मुंबईच्या संघाला धावांची आवश्यकता असताना सर्फराजनं शतक ठोकलंय. विशेष म्हणजे, सर्फराजनं रणजी ट्रॉफीतील मागील 12 सामन्यात सात शतक आणि पाच अर्धशतक झळकावलं आहे. या हंगामात त्यानं आतापर्यंत 800 हून अधिक धावा केल्या आहेत. अशी कामगिरी करणारा तो एकमेव फलंदाज आहे. यासह त्यानं भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड आणि व्हीव्हीएस लक्ष्मणला मागं टाकलंय.
हे देखील वाचा-