निर्णायक सामन्यापूर्वी टीम इंडियाची डिनर पार्टी, उनाडकटने शेअर केले फोटो
Jaydev Unadkat House Party : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्याची टी 20 मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे. चौथा सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत बरोबरी केली.
Jaydev Unadkat House Party Team India After Winning South Africa : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पाच सामन्याची टी 20 मालिका 2-2 अशी बरोबरीत आहे. चौथा सामना जिंकत भारतीय संघाने मालिकेत बरोबरी केली. अखेरचा सामना खेळण्यासाठी भारतीय संघ बेंगळुरुमध्ये पोहचलाय. त्याआधी राजकोटमध्ये भारताच्या एका खेळाडूने टीम इंडियाला घरी आमंत्रित केले होते. संपूर्ण संघासाठी डिनर पार्टीचं आयोजन केले होते.
वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याने राजकोटमधील विजयानंतर टीम इंडियाला डिनर पार्टीसाठी आमंत्रण दिले होते. कोच राहुल द्रविडसह टीम इंडिया जयदेव उनाडकटच्या घरी पोहचली होती. जयदेव उनाडकट याने सोशल मीडियावर टीमसोबतचे फोटो शेअर केले आहे.पोस्टमध्ये जयदेव उनाडकटने लिहिले, रात्रीच्या जेवणानंतरचे फोटो आहे. हाऊस पार्टी.
It was a good day! #MeninRajkot 💙 pic.twitter.com/UfWGGHhb55
— Jaydev Unadkat (@JUnadkat) June 19, 2022
दरम्यान, राजकोट जिंकल्यानंतर भारतीय संघ अखेरच्या टी20 सामन्यासाठी बंगळुरूला पोहोचली आहे. बीसीसीआयने त्याचा व्हिडीओही पोस्ट केलाय. निर्णायक सामना जिंकून मालिका विजयाच्या निर्धाराने दोन्ही संघ मैदानात उतरतील. आजपर्यंत भारताने घरच्या मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी-20 मालिका कधीच जिंकले नाही. दक्षिण आफ्रिकेने यापूर्वी दोनदा भारताचा दौरा केला आहे. यामध्ये भारताचा पराभव झालाय. आजचा सामना जिंकून भारतीय संघ इतिहास रचणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात भारताची कामगिरी
दक्षिण आफ्रिकेचा संघ तिसऱ्यांदा टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतात आलाय. दरम्यान, 2015/16 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील संघाला 2-0 असा पराभव स्वीकारावा लागला होता. या तीन सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना पावसामुळं रद्द झाला. त्यानंतर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली, 2019/20 मध्ये मालिका 1-1 अशी बरोबरीत राहिली. या मालिकेतील अखेरचा सामना पावसामुळं रद्द झाला.
ऋषभ पंतकडं इतिहास रचण्याची संधी
पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत भारतानं दोन तर, दक्षिण आफ्रिकेच्या संघानं दोन सामने जिंकले आहेत. यामुळं या मालिकेतील पाचवा सामना जिंकणार संघ मालिका खिशात घालेल. भारतानं हा सामना जिंकला तर दक्षिण आफ्रिकेला घरच्या मैदानावर टी-20 मालिकेत हरवण्याची ही पहिलीच वेळ असेल. तसेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात टी-20 मालिका जिंकणार ऋषभ पंत पहिला कर्णधार ठरेल.मालिकेच्या सुरुवातीला भारतीय गोलंदाजांची कामगिरी निराशाजनक होती. मात्र, गेल्या दोन सामन्यांपासून सर्व गोलंदाज लयीत असल्याचे दिसत आहे.
भारत- दक्षिण आफ्रिका हेट टू हेड रेकार्ड
भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात आतापर्यंत एकूण 19 सामने खेळले गेले. त्यापैकी भारतीय संघानं 11 सामने जिंकले आहेत. तर, आठ सामन्यात पराभव पत्कारावा लागलाय. महत्वाचं म्हणजे, भारतीय संघानं मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध साठ सामने खेळले आहेत. त्यापैकी तीन सामने जिंकले आहेत. तर, पाच सामन्यात पराभव स्वीकारला आहे.