एक्स्प्लोर

County Championship: आणखी एक भारतीय खेळाडू इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये खेळणार! 

Jayant Yadav County Championship: भारतीय अष्टपैलू खेळाडू जयंत यादव आता काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळताना दिसणार आहे.

Jayant Yadav County Championship: भारतीय अष्टपैलू खेळाडू जयंत यादव आता काउंटी चॅम्पियनशिपमध्ये खेळताना दिसणार आहे. सध्या सुरू असलेल्या काउंटी चॅम्पियनशिपच्या अखेरच्या तीन सामन्यात वॉर्विकशायरनं (Warwickshire) जयंत यादवला करारबद्ध केलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जयंत यादव 12 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या सोमरसेटविरुद्ध एजबॅस्टन येथे घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यापूर्वी वॉर्विकशायरच्या संघात सामील होईल.

भारताचा वेगवान गोलंदाज सिराज (वॉर्विकशायर), चेतेश्वर पुजारा (ससेक्स), वॉशिंग्टन सुंदर (लँकेशायर), क्रुणाल पांड्या (वॉर्विकशायरसाठी 50 षटकांचा सामना), उमेश यादव (मिडलसेक्स), नवदीप सैनी (केंट) आणि शुभमन गिल (ग्लॅमॉर्गन काउंटी मॅच) यांच्यानंतर जयंत यादव हा 2022 मध्ये इंग्लिश देशांतर्गत क्रिकेट हंगामासाठी करारावर स्वाक्षरी करणारा आठवा भारतीय खेळाडू ठरलाय.

ट्वीट-

जयंत यादवची प्रतिक्रिया
"हा माझा पहिला काउंटी चॅम्पियनशिपचा अनुभव असेल आणि मी शेवटच्या तीन सामन्यांसाठी संघात सामील होण्यासाठी उत्सुक आहे. जेव्हा मला विचारले गेले की, मला वॉर्विकशायरमध्ये सामील व्हायचे आहे, तेव्हा मी नाही म्हणू शकलो नाही. या वर्षाच्या सुरुवातीला माझी सहावी कसोटी खेळल्यानंतर, मला विश्वास आहे की, हे तीन सामने मला भविष्यात अधिक संधी मिळण्यासाठी आणि माझ्या खेळात सुधारणा करण्यास मदत करतील. मी एजबॅस्टन येथे कधीही खेळलो नाही. परंतु, मी या स्टेडियमबद्दल खूप छान गोष्टी ऐकल्या आहेत." वॉर्विकशायरसोबत झालेल्या करारावर यादव म्हणाला की, "मी वॉर्विकशायर काउंटी क्रिकेट क्लब आणि बीसीसीआय या दोघांचे आभार मानू इच्छितो आणि मी पुढील आठवड्यात वॉर्विकशायरला पोहोचण्यास उत्सुक आहे." 

जयंत यादवची कारकिर्द
यादवनं आतापर्यंत 64 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 173 विकेट घेतल्या असून 2,194 धावा केल्या आहेत. भारतासाठी सहा कसोटी सामन्यांमध्ये यादवनं 29.06 च्या सरासरीनं 16 विकेट घेतल्या आहेत आणि 31 च्या सरासरीनं 248 धावा केल्या आहेत.

हे देखील वाचा- 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget